आजचं मार्केट – ६ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६२.७३ प्रती बॅरल ते US $ ६३.२५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= ७३.३० ते US $१=Rs ७३.४३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.५७ VIX २१.१२ PCR १.६१ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७१ होते.

USA मधील सर्व्हिस सेक्टरचा रिपोर्ट चांगला आला. याला दोन कारणे झाली. (१) मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण (२) फिस्कल स्टिम्युलस. नॉन मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी निर्देशांक सुधारला. प्रतिकूल हवामानामुळे या निर्देशांकाला फटका बसला होता.

जपानमध्ये रिअल वेजीस आणि लोकांची क्रय शक्ती वाढली.

ओपेक+ मे- जून आणि जुलै २०२१ मध्ये उत्पादन वाढवणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे क्रूडसाठी असलेली मागणी कमी झाली. इराणमध्ये क्रूडचे उत्पादन वाढल्यामुळे क्रूड US $ ६२ प्रती बॅरलच्या जवळपास आले.

सैनिकी उपकरण उत्पादनासंबंधात रशिया आणि भारत यांच्या बोलणी सुरु आहेत. याचा फायदा BEML आणि भारत डायनामिक्स यांना होईल.

ICRA ने सांगितले की भारतातील फर्टिलायझर क्षेत्राविषयीचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह केला. मान्सून नॉर्मल असेल. खरीप हंगामाचे पीक चांगले येईल. शेतीपासून मिळणारे उत्पन्न वाढेल. सबसिडीचा बॅकलॉग नाही. उलट सरकारने Rs ६२६०२ कोटी आत्मनिर्भर ३.० पॅकेजअंतर्गत दिले. वेळेवर सबसिडी दिली. त्यामुळे शेतीसाठी आता खेळत्या भांडवलाचा तुटवडा भासणार नाही. म्हणून आज PI इंडस्ट्रीज, UPL असे शेअर्स तेजीत होते.

रेसिडेन्शियल होम मार्केट सुधारले. घरांची विक्री आणि नवीन प्रोजेक्टच्या लाँचमध्ये वाढ झाली. ७१९६३ युनिटची विक्री झाली. ही विक्री ४४%नी जास्त आहे.यामुळे शोभा प्रेस्टिज इस्टेट, ब्रिगेड या शेअर्समध्ये तेजी होती.

फ्रेट ट्राफिक कमी झाला. १२ मेजर पोर्टमध्ये कोरोनाच्या संकटामुळे अडथळे आले.

पॅनासिया बायोटेक या कंपनीने १०० मिलियन ‘स्पुटनिक V’ व्हॅक्सिन चे डोसेस बनवण्यासाठी रशियन इन्व्हेस्टमेंट डेव्हलपमेंट फंडाबरोबर करार केला. या बातमीनंतर शेअरला थेट अपर सर्किट लागले.

HDFC ही कंपनी केरळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडामध्ये ९.९% स्टेक खरेदी करणार आहे.

८०० MHZ स्पेक्ट्रम वापरण्यासाठी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ ने Rs १०३७.६० कोटींचा ‘राईट टू यूज’ करार केला. भारती एअरटेलच्या स्पेक्ट्रमचा वापर आंध्र प्रदेश, दिल्ली मुंबई या ठिकाणी रिलायन्स जिओला करता येईल.

BARBEQU नेशन या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग उद्या बुधवारी तारीख ७ एप्रिल २०२१ रोजी होईल.

एअर रिच यार्न आणि एअर रिच फॅब्रिक बनवण्यासाठी ट्रायडण्ट या कंपनीला USA मध्ये पेटन्ट मिळाले.

बजाज फायनान्स या कंपनीने सांगितले की आमच्या AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) मध्ये ४% वाढ झाली. २३ लाख नवीन ग्राहक जोडले.Rs१६००० कोटी लिक्विडीटी सरप्लस आहे. डिपॉझिट ४०% ने वाढले. लोनग्रोथ मात्र ८% ने कमी झाले .
D – मार्टची २३४ स्टोर्स आहेत. २२ नवी स्टोर्स उघडणार आहेत. स्टॉक वाढत आहेत.

एस्कॉर्टस ही कंपनी कन्स्ट्रक्शन मशिनरी विकते. या क्षेत्रात कंपनीची चांगली ग्रोथ आहे.

अडानी पोर्टची कार्गो व्हॉल्युम ग्रोथ ४१% झाली. एकूण २६ मिलियन मेट्रिक टन एवढी झाली.म्हणून या शेअरमध्ये लक्षणीय तेजी होती.

१ मे २०२१ पासून एशियन पेन्ट्स त्यांच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमधील सर्व आयटेम्सच्या किमती वाढवणार आहे.म्हणून शेअर्स तेजीत होता.

आज GM ब्रुअरीज ने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट, उत्पन्न आणि ऑपरेशनल मार्जिन वाढले कंपनीने Rs ४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

भारतातही बॉण्ड यिल्ड वाढत आहे. उद्या जाहीर होणाऱ्या RBI च्या द्वैमासिक पॉलिसीमध्ये RBI वाढणारी महागाई, अर्थव्यवस्थेची ग्रोथ आणि वाढणारे बॉण्ड यील्ड यांचा समन्वय कसा साधते याकडे मार्केटचे बारकाईने लक्ष असेल. याबरोबरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचाही यात विचार करायचा आहे.

आज मार्केट मध्ये अडानी ग्रुपचे, मेटल क्षेत्रातील तसेच मेटल क्षेत्राशी संबंधित शेअर्स तेजीत होते. आज सरकारने हॉटेल्स बार सिनेमा हॉल आणि रेस्टारंट बंद ठेवायला सांगितल्यामुळे PVR इनॉक्स लेजर, आणि हॉटेल क्षेत्राशी संबंधित शेअर्स मंदीत होते. त्याच बरोबर टेस्टिंग लॅब्स, हॉस्पिटल्स, आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स तेजित होते.

आज मी तुम्हाला टाटा कन्झ्युमर या कंपनीचा मंथली चार्ट देत आहे. हा FMCG क्षेत्रातील शेअर असल्यामुळे यांच्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे घातलेल्या निर्बंधाचे किंवा लॉकडाऊनचे कमी परिणाम होतील. या शेअरने Rs ६५४ चा लाइफटाइम हाय पार केला. आणि शेअरने ब्ल्यू स्काय टेरिटरीत प्रवेश केला. हा शेअर हाय टॉप हाय बॉटम पॅटर्नमध्ये आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९२०१ NSE निर्देशांक निफ्टी १४६८३ बँक निफ्टी ३२५०१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.