आजचं मार्केट – ७ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६२.३४ प्रती बॅरल ते US $ ६३.११ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.५२ ते US $१=Rs ७४.२६ या दरम्यान होते. US $ इंडेक्स ९२.२६ VIX २०.२४ PCR १.७ होते. आज रुपयाची Rs ०.८५ ने घसरण झाली.
१० वर्षे USA बॉण्ड यिल्ड १.६६६५ होते.

सरकारने AC आणि लेड लाईट साठी PLI स्कीम जाहीर केली. याचा फायदा बजाज इलेक्ट्रिकल्स, विप्रो, डिक्सन, अंबर, वोल्टास, ब्ल्यू स्टार या कंपन्यांना होईल.

गोआ कार्बनच्या पारादीप युनिटमध्ये कामकाज सुरु झाले.

आज BARBEQUE नेशन या कंपनीच्या शेअरचे NSE वर Rs ४८९.८५ आणि BSE वर Rs ४९२.०० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ५०० प्रती शेअर या भावाने दिला होता.

AB कॅपिटल च्या म्युच्युअल फंड कंपनीचा IPO लवकरच येत आहे. AB कॅपिटल त्यांचा म्युच्युअल फंडामधील स्टेक या IPO द्वारा विकेल. AB SUN AMC ची व्हॅल्यू Rs २०००० कोटी ते Rs २५००० कोटी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन Rs २.६५ कोटी आहे.

कामधेनू इस्पात आपला पेंट कारभार डीमर्ज करण्याची शक्यता आहे. ही एक DEBT फ्री कंपनी आहे.
सोलर पॅनल साठी सरकारने PLI स्कीम जाहीर केली. याचा फायदा बोरोसिल रिन्यूएबल्स, जॉन्सन हिताची यांना होईल.
IDFC I st बँकेने Rs ५७.३५ प्रती शेअर या भावाने QIP इशू केला. या बँकेचे CASA डिपॉझिट Rs ४६०२० कोटी होते.

आज RBI ने आपली द्वैमासिक वित्तीय पॉलिसी जाहीर केली. रेपोरेट ४%, रिव्हर्स रेपोरेट ३.३५% CRR ३.५% इत्यादी सर्व रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. RBI ने आपला स्टान्स अकामोडेटिव्ह ठेवला. RBI ने सांगितले की अर्थव्यवस्थेला सपोर्ट आणि नर्चर साठी आणि अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी RBI आपले लक्ष केंद्रित करेल. आर्थीक उलाढाल सामान्य होत आहे. शेती आणि संलग्न क्षेत्रातील उत्पादन समाधानकारक आहे.

RBI ने FY २१-२२ या वर्षांसाठी रिअल GDP ग्रोथचे अनुमान १०.५% ठेवले आहे. दुसऱ्या तिमाहीत ८.३% तिसया तिमाहीत ५.४% चौथ्या तिमाहीत ६.२% ठेवले आहे.

महागाईचे (CPI) अनुमान चालू वर्षाच्या Q-४ मध्ये ५% तर FY २१-२२ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५.२%, दुसया तिमाहीत ५.२% तिसऱ्या तिमाहीत ४.४% तर चौथ्या तिमाहीत ५.१% असेल. RBI ने महागाई २% ते ६% या मर्यादेत ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

लिक्विडीटी पोझिशन समाधानकारक स्तरावर ठेवली जाईल. एवढेच नव्हे तर सिस्टीममध्ये लिक्विडिटीचे पुरेसे सरप्लस राहील याची काळजी घेतली जाईल.

RBI ने राज्यसरकारांसाठी वेज आणि मीन्स ऍडव्हान्स Rs ४७०१० कोटी मंजूर केले तसेच कोविडच्या काळात इमर्जन्सी तत्वावर दिलेले Rs ५१५६० कोटी चालू ठेवले.

RBI ने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अक्विझिशन प्रोग्रॅम जाहीर केला. यामुळे लॉन्ग टर्म बॉण्ड्स यिल्ड मध्ये स्थैर्य येईल. RBI FY २१-२२ च्या पहिल्या तिमाहीत Rs १ लाख कोटीच्या सरकारी सिक्युरिटीज खरेदी करेल. RBI एप्रिल १५ २०२१ रोजी Rs २५००० कोटी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करेल.

RBI ने भारतातील सर्व फायनान्सियल इन्स्टिट्यूटसाठी Rs ५०००० कोटी पर्यंत रिफायनान्स फॅसिलिटी जाहीर केली.
TLTRO स्कीमची डेडलाईन ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली.

RBI आता लॉन्गर टर्म व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो ऑक्शन सुरु करेल. यामुळे जरी ओव्हरनाईट व्याजाचे रेट्स रिव्हर्स रेपो रेट च्या जवळपास राहतील पण जशी जशी मुदत वाढेल तसे व्याजदर वाढत जाईल.

आज मी तुम्हाला SAIL या कंपनीचा चार्ट देत आहे. SAIL ही स्टील उत्पादन क्षेत्रातली रेल्वेचे रूळ बनवणारी कंपनी आहे. या वेळेला या कंपनीची विक्री वाढली आहे आणि कर्ज कमी झाले आहे. ऍसेंडिंग ट्रँगलचा ब्रेकआऊट झाला आहे. आणि कप आणि हॅण्डल पॅटर्नचाही चांगल्या व्हॅल्युमसह ब्रेकआऊट झाला आहे. हा सेक्टर सध्या तेजीत आहे.

BSE निर्देशांक ४९६६१ NSE निर्देशांक निफ्टी १४८९१ बँक निफ्टी ३२९९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.