आजचं मार्केट – ८ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६२.८० प्रती बॅरल ते US ६२.९१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.२३ ते US $ १= Rs ७४.५९ या दरम्यान US $ निर्देशांक ९२.३० VIX २०.५० PCR १.७४ होते. USA १० वर्षे बॉण्ड्स यिल्ड १.६७४ होते.

USA मध्ये गॅसोलीनची इन्व्हेन्टरी वाढल्यामुळे क्रुडमध्ये मंदी होती. US $ निर्देशांक मजबूत असल्यामुळे आणि फेडने आपण सध्याची पॉलिसी चालू ठेवू असे सांगितल्यामुळे सोने एका मर्यादित रेंजमध्ये होते.

स्टर्लिंग आणि विल्सन या कंपनीने Rs ४०२ कोटींच्या कर्जाची परतफेड केली. कंपनीने त्यांचा सोलर बिझिनेस अडाणी ग्रुपला विकला.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्टील, आयर्न ओअर च्या किमती वाढत आहेत. वेगवेगळ्या देशात सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारी खर्च वाढवला आहे. तसेच कन्स्ट्रक्शन सेक्टर. ऑटो सेक्टर, रेल्वे आणि निरनिराळ्या सरकारी योजना यामुळे स्टीलसाठी मागणी वाढत आहे. स्टीलच्या किमती Rs ५००० टन आणि लम्प ओअर च्या किमती Rs ५०० प्रती टन वाढवल्या. कोल्ड रोल्ड कॉइल्स, TMT बार्स आणि वायर यांच्याही किमती वाढतील.

HRC ( हॉट रोल्ड कॉइल ) याचा उपयोग ऑटो, कन्स्ट्रक्शन आणि डोमेस्टिक अप्लायन्सेस उद्योगामध्ये केला जातो. यांच्या किमती Rs ४५०० ते Rs ५००० प्रती टन वाढवल्या तर लॉन्ग स्टीलच्या किमती ( हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन उद्योगात वापरले जाते.) Rs ३००० प्रती टन वाढवल्या. युरोपमध्ये US $ १००० प्रती टन, पश्चिम आशियामध्ये US $ ९०० प्रति टन, तर चीनमध्ये US $ ८७० एवढ्या वाढल्या आहेत.

भारतातील स्टीलच्या किमतीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्टीलच्या किमतीमध्ये Rs १०००० प्रती टन एवढा फरक आहे. भारतातील किमती Rs १०००० प्रती टन एवढ्या कमी आहेत.

चीन पर्यावरणाच्या कारणामुळे स्टीलचे उत्पादन कमी करत आहे. लम्प ओअरच्या किमती Rs ५३५० फाईन्सच्या किमती Rs ४३१० एवढ्या आहेत HRC ची किंमत Rs ५७६०० आणि TMT च्या किमती Rs ५२५०० आहे. एप्रिलमध्ये या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या किमतीतील वाढीमुळे आज मेटल्स आणि विशेषतः स्टील आणि आयर्न ओअरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये लक्षणीय तेजी होती. उदा टाटा स्टील, कल्याणी स्टील, JSW स्टील. SAIL, JSPL, जिंदाल स्टील. IMF ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) ने सांगितले की मेटल इंडेक्स यावर्षी ३०% फायदा देईल.

IFFC ( इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह) ने ५० किलोच्या DAP(डाय अमोनियम फॉस्फेट) ची किंमत Rs १२०० वरून Rs १९०० केली. म्हणजेच ५८.३३% वाढवली. तसेच NPK ( नायट्रोजन फॉस्फेट पोटॅशियम) खतांच्या किमती ५५% ने वाढवल्या. कारण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फॉस्फरीक ऍसिड आणि रॉक फॉस्फेट च्या किमती वाढल्या आहेत. तसेच भारतात याची उपलब्धता कमी असल्यामुळे परदेशातून आयात करावी लागते. त्यामुळे DAP आणि NPK यांच्या किमतीत वाढ करण्यात आली.

आज २५८ शेअर्सचे सर्किट फिल्टर वाढवले.

सिलिकोमँगॅनीजच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे MOIL आणि मैथॉन अलॉईज या शेअर्समध्ये तेजी आली.
आज मेटल्स, सिमेंट, शुगर, IT आणि फर्टिलायझर्स तसेच टेस्टिंगलॅब आणि हॉस्पिटल्स या क्षेत्रात तेजी होती.

आज मी तुम्हाला इंद्रप्रस्थ गॅस या कंपनीचा HOURLY चार्ट देत आहे. हायर टॉप हायर बॉटम पॅटर्न तयार होत आहे.हा शेअर ट्रँग्यूलर कन्सॉलिडेशन मध्ये होता. लो तोडला नाही. नवीन ब्रेकआऊट होण्याची शक्यता आहे. OSCILLATERS सुद्धा हेच दाखवत आहे.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.