आजचं मार्केट – ९ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६२.९९ प्रती बॅरल ते US $ ६३.२९ प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ७४.६९ ते US $१=Rs ७४.९३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.०४ VIX २०.२० PCR १.६४ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६२ होते.

आज USA मधील मार्केट्स तेजीत होती. जपान सोडून इतर आशियायी मार्केट्स मात्र मंदीत होती. पॉवेल यांनी सांगितले की USA अर्थव्यवस्थेला पुन्हा एक सशक्त आणि महान अर्थव्यवस्था बनवू.

भारती एअरटेलला डॉटने व्हिडिओकॉनची जुनी AGR बाकी Rs १३७६ कोटी देण्यासाठी नोटीस पाठवली. भारतीच्या म्हणण्यानुसार अशी काही बाकी देणे नाही.

अशोक लेलँडच्या स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्हने इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सिमेन्स या कंपनीबरोबर करार केला.
S H केळकर या कंपनीने ‘NOVA FRAGRANZE’ या इटालियन कंपनीत ७०% स्टेक खरेदी केला.

अल्केम लॅबने चाकण येथील नवीन युनिटमध्ये उत्पादन सुरू केले. हा शेअर तेजीत होता.

एशियन पेंट्स या डेकोरेटिव्ह पेंट्स उत्पादन क्षेत्रातील कंपनीने आता होम फर्निशिंग क्षेत्रात प्रवेश केला. हे मार्केटला फारसे पसंत पडले नाही.

L & T ला सौदी अरेबियाकडून सोलर प्लांटसाठी मोठी ऑर्डर ( Rs ५००० कोटी ते Rs ७००० कोटींच्या दरम्यान) मिळाली.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सिमेंटचे भाव वाढणार असल्यामुळे आज मिडकॅप आणि स्माल कॅप सिमेंट कंपन्यांमध्ये तेजी होती. ऊदा :- NCL इंडस्ट्रीज, दिग्विजय सिमेंट

भारतामध्ये बॉण्ड यिल्ड ६.१२ वरून ५.९९ झाले होते.. त्यामुळे बँकांमध्ये खरेदी दिसली. तसेच जास्त कंपन्या बॉण्ड्स इशू करतील आणि त्यासाठी क्रेडिट रेटिंग करून घेणे आवश्यक असते. त्यामुळे ICRA सारख्या रेटिंग एजन्सीचा फायदा होईल.

आज सिमेंट, फार्मा, टेस्टिंग लॅब, हॉस्पिटल्स, IT, सरकारी राष्ट्रीयीकृत बँका या क्षेत्रात खरेदी दिसली.

आज मी तुम्हाला मुथूट फायनान्सचा चार्ट देत आहे. सोने तारण ठेवून कर्ज देणारी ही कंपनी आहे. Rs ५५००० ते Rs ५७००० पासून सोन्याचा भाव पडत होता. त्यामुळे त्यांनी तारण म्हणून ठेवून घेतलेल्या सोन्याची किंमत कमी होते. म्हणून शेअरचा भावही पडत होता. या चार्टमध्ये निळसर रंगाची रेषा २०० DMA आहे पिवळ्या रंगाची रेषा १५० DMA चे आहे. या दोन लाईनच्यामध्ये हा शेअर बरेच दिवस कन्सॉलिडेट होत होता. HOURLY चार्ट मध्ये डबल बॉटम फॉर्म झाला.जवळ जवळ दोन आठवडे या शेअरने लो पाईंट तोडला नाही. Rs १३६० प्रती शेअर या किमतीवरून Rs १२०० प्रति शेअरपर्यंत करेक्शन झाले. या शेअरने आता प्राईस व्हॉल्युम ब्रेकआऊट दिला आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९५९१ NSE निर्देशांक निफ्टी १४८३४ बँक निफ्टी ३२४४८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.