आजचं मार्केट – १२ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १२ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६२.७२ प्रती बॅरल ते US $ ६३.६९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.७४ ते US $१=Rs ७५.०६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.२८ VIX २२.९१ PCR १.४२ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६५९ होते.
आज US $ मध्ये मजबुती आणि US १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड १.६७ च्या जवळ असल्याने सोन्यावर दबाव होता. पण कोरोनाच्या केसेस वाढत असल्यामुळे अनिश्चितता लक्षात घेता सोन्याला थोडा सपोर्ट ही मिळाला.

सूर्य रोशनी या कंपनीला Rs ३०० कोटींची मोठी ऑर्डर मिळाली.

आज US $ मजबुत झाल्यामुळे आणि चीनच्या प्रमुखांनी असे सांगितल्यामुळे की स्टील, कॉपर, अल्युमिनियम, निकेल आणि अन्य कमोडिटीजमधील तेजीमुळे महागाई( इंडस्ट्रियल इन्फ्लेशन) वाढत आहे. यासाठी वेळ आली तर या मेटल्सचे ( स्टील, कॉपर, अल्युमिनियम, निकेल) रिझर्व्ह साठे रिलीज करू. चीनच्या सरकारने बँकांना सांगितले की तुम्ही मेटल्ससाठी कर्ज देण्याचे प्रमाण कमी करावे. या चीनच्या प्रमुखांच्या घोषणेनंतर मेटल्ससंबंधीत शेअर्समध्ये मंदी आली. मेटल्स इंडेक्समध्ये २% ते ३% घट झाली.

तसेच मार्केटवर भारतातील बहुसंख्य राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची छाया पडली. बहुसंख्य राज्यात आता निर्बंध किंवा लॉकआऊट लागू होतील आणि त्यामुळे औद्योगिक प्रगती मंदावेल. या भीतीमुळे आज मार्केट्मध्ये मोठ्या प्रमाणावर आणि बहुसंख्य शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

आज टी सी एसने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट ६.२%ने वाढून Rs ९२४६ कोटी झाले. EBIT Rs ११७३४ कोटी झाले आणि EBIT मार्जिन २६.८% . उत्पन्न Rs ४३७०५ कोटी आणि US $ उत्पन्न US $ ५९८.९ कोटी झाली. रेव्हेन्यू ग्रोथ ४.२% तर US $ रेव्हेन्यू ग्रोथ ५% झाली.

इन्फोसिस १४ एप्रिल २०२१ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल आणि आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

मार्च २०२१ मध्ये CPI ५.५२% (५.०३%) २०२१फेब्रुवारी मध्ये IIP -३.६% होते.

स्पुटनिक V च्या इमर्जन्सी यूजसाठी सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने शिफारस केली.

आज मी तुम्हाला ल्युपिनचा चार्ट देत आहे. या शेअरमध्ये रेंज ब्रेकआऊट आहे फार्मा कंपन्या सध्या तेजीत आहेत आणि रुपया US $ १= Rs ७५ झाला आहे. त्यामुळे फार्मा कंपन्यांना फायदा होईल.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७८८३ NSE निर्देशांक निफ्टी १४३१० बँक निफ्टी ३०७९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १२ एप्रिल २०२१

  1. Prafull Navanit Surpuriya

    Mam plz give me your contact no. for more enquiry related to share market.
    My contact no.-9822254190.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.