Monthly Archives: June 2021

आजचं मार्केट – ३० जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० जून २०२१

आज क्रूड US $ ७५.१४ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७४.५० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९२.१६ USA बॉण्ड यिल्ड १.४७ VIX १३ होते.PCR १.२९ होते.

USA मधील जॉब डेटावर जागतिक मार्केट्स लक्ष ठेवून आहेत. कारण फेड आपली पॉलिसी ठरवताना या जॉब डेटाचा प्रामुख्याने विचार करेल.

सरकारनी आज रिफाईंड पाम ऑइल वरील इम्पोर्ट ड्युटी १०%ने कमी केली. याचा फायदा HUL ब्रिटानिया, नेस्ले, प्रताप स्नॅक्स अशा कंपन्यांना होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीजने ADNOC (अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी) बरोबर RUWAIS इथे मल्टिबिलियन केमिकल प्रोजक्ट उभारण्यासाठी करार केला.

चीन,जपान, कोरिया,युक्रेन येथून स्टील आयात होते. त्यावरील ऍन्टीडम्पिंग ड्युटी डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवली याचा फायदा SAIL, टाटा स्टील, JSW स्टील, यांना होईल.

VIX १३ आहे. ते अशा स्तरावर आहे की येथून ब्रेक आउट होईल किंवा ब्रेकडाऊन अपेक्षित आहे. तेव्हा आपण सावध राहून शेअर्सची निवड करावी आणि प्रॉफिट बुकिंग वेळेवर करावे.

रेल्वे १.१५ लाख कोटींची कामे आता करील.

आज युफ्लेक्स चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.त्यामुळे पॅकेजिंग क्षेत्रातील जिंदाल पॉली पॉली प्लेक्स कॉस्मो फिल्म्स, एस्सेल प्रोपॅक, टाइम टेक्नोप्लास्ट, गरवारे पॉली,मोल्डटेक या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. सुझलॉन एनर्जीचा निकाल चांगले आले लॉस कमी झाला. किटेक्स गारमेंटस या कंपनीचे निकाल असमाधानकारक होते.

सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांची निवड खाजगीकरणासाठी केल्यामुळे या बँकांच्या शेअर्समध्ये तेजी होती. बँक ऑफ अमेरिका या बँकेने मुथूट फायनान्स आणि मनापूरम फायनान्स या दोन कंपन्यांवर कव्हरेज सुरु केल्यामुळे आणि mannapuram finance टार्गेट Rs २२५ आणि मुथूट फायनान्सचे टारगट Rs १८९० दिले. त्यामुळे या दोन शेअर्समध्ये तेजी होती.

FII च्या विक्रीमध्ये लॉन्ग अनवाइंडिंग दिसत आहे पण शॉर्र्टिंग दिसत नाही.

आज मार्केटने सुरुवात तेजीत केली पण युरोपियन मार्केटस उघडल्यावर मार्केट पडत गेले आणि शेवटी मार्केट किंचित मंदीत बंद झाले.

आज DISCOM ला दिलेल्या Rs ३.०३ लाख कोटी रिझल्ट लिंक्ड पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपन्यांना देण्याच्या निर्णयामुळे आज पॉवर क्षेत्राला फायनान्स करणाऱ्या PFC REC या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

मॅक्रोटेक या कंपनीच्या प्रमोटर्सनी Rs ११९६ कोटींचे कर्ज पूर्णपणे फेडले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२४८२ NSE निर्देशांक निफ्टी १५७२१ बँक निफ्टी ३४७७२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ जून २०२१

आज क्रूड US $ ७४.४२ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.०६ USA बॉण्ड यिल्ड १.४८ VIX १३ PCR १.२८ होते.

D प्लस व्हरायन्ट सगळीकडे पसरतो आहे. त्यामुळे सर्व देश पुन्हा लॉकडाऊनची वाट चोखाळत आहेत.ओपेक+ची मीटिंग आहे त्यामुळे क्रुडमध्ये थोडी नरमाई आहे.

फेडरल मुघल, GIC हौसिंग, त्रिवेणी टरबाइन, धून स्रेरी , NALCO, वालचंदनगर, ग्रॅफाइट, तामिळनाडू पेट्रोकेमिकल्स, सुब्रोस, IRFC या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. IRCTC चे प्रॉफिट कमी झाले. मार्जिन वाढले. कंपनीने सांगितले की त्यांचा कॅटरिंग बिझिनेस ज्यात त्यांना सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळते कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून बंद आहे.

नॉर्थ अटलांटिक रूटवर खूपच सप्लाय शॉर्टेज आहे. फ्रेट रेट खूप वाढले आहेत. याचा फायदा G.E. शिपिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, श्रेयस, कोची शिपयार्ड यांना होईल.

ज्यूट बॅग्स बांगला देशामधून आयात होतात. त्याच्यावर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवली. याचा फायदा लुडलो ज्यूट, CHEVIOT, आणि ग्लॉस्टर या कंपन्यांना होईल.

सरकार मोनोएथिलिन ग्लायकॉल वर अँटी ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवणार आहे. याचा फायदा इंडियन ग्लायकॉलला होईल.
सरकार अल्युमिनियम वायरवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावण्याचा विचार करत आहे. याचा फायदा वेदांताला होईल.

सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीला मॉडर्ना या कंपनीच व्हॅक्सिन आयात करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती

सध्या इथेनॉल ब्लेंडींग ७.७९% आहे. आता धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादनासाठी इथेनॉल प्लान्ट लावले जातील.

अवंती फीड्सने USA मध्ये जे SHRIMPS निर्यात केले होते ती सालमोनेला इन्फेक्शनमुळे परत बोलवले आहे.

जिनस पॉवर, HPL इलेक्ट्रिक यांना स्मार्ट मीटर लावण्याच्या सरकारच्या धोरणाचा फायदा होईल.

हेरिटेज फूड्सचा शेअर आज तेजीत होता कारण त्यांने ‘रेडी टू ईट’ प्रोडक्टस मध्ये पदार्पण केले.

DOT ने MTNL आणि BSNL यांच्या मर्जरला सहमती दर्शवली नाही. कारण MTNL वर कर्ज जास्त आहे. कर्मचाऱ्याच्या पगारात फरक आहे. त्यामुळे MTNL चा शेअर पडला.

DCM श्रीराम च्या Rs १० दर्शनी किमतीच्या एका शेअरचे Rs २ दर्शनी किमतीच्या ५ शेअर्समध्ये स्प्लिट होणार आहे
रोड सेक्टरच्या बाबतीत PNC इन्फ्रा हा प्रीफर्ड स्टॉक आहे असे नोमुराने सांगितले आणि त्याचे टार्गेट वाढवले. क्रेडिट सुईस ने मेरीकोचे टार्गेट Rs ४९० वरून Rs ६०० केले. त्यामुळे या दोन शेअर्समध्ये तेजी होती.

इंडियन बँकेने QIP ची किंमत Rs १४२.१५ निश्चित केल्यामुळे शेअरमध्ये मंदी आली. .

आज स्टॅंडर्ड लाइफने काल ठरल्याप्रमाणे HDFC लाईफ मधील शेअर्सची ब्लॉक डील रूटने विक्री केली.
FII विक्री करत आहेत पण त्याबरोबरच DII खरेदी करत असल्यामुळे आणि किरकोळ गुंतवणुकदाराचा सहभाग चांगला असल्यामुळे मार्केट पडण्याच्या वेगाला खीळ बसली.

१ जुलै रोजी ऑटोविक्रीचे आकडे येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५४९ NSE निर्देशांक निफ्टी १५७४८ बँक निफ्टी ३५०१० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ जून २०२१

आज क्रूड US $ ७६ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२ US बॉण्ड यिल्ड रेट १.५१ VIX १३.४० आणि PCR १.३२ च्या आसपास होते.

सध्या सर्वत्र कोरोनाच्या ‘D’ व्हेरियंटचे सावट पडले आहे. हा कोरोना साखळीतील अगदी अलीकडील व्हरायन्ट आहे. तज्ञाच्या मते हा अधिक संसर्गजन्य आहे. कोविडचे नियंत्रण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया, मलेशिया (अनिश्चित काळापर्यंत लॉक डाऊन), इंडोनेशिया, बांगलादेश तर थायलंड मध्ये काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात येत आहेत.

भारतातही येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसर्या लाटेला समर्थपणे तोंड देण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे. मोठ्या प्रमाणावर मोफत लसीकरण उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याबरोबरच कडक नियंत्रणे, स्थानिक लॉक डाऊन यांचाही उपयोग केला जात आहे. लहान मुलांसाठी फायझर, आणि इतर कंपन्या लस तयार करत आहेत.

DOCON टेक ( फार्म ईजी ) या कंपनीने थायरोकेअर या कंपनीतील ६६.१४% स्टेक Rs ४५४६ कोटींना खरेदी केला. या कंपनीचे प्रमोटर वेलूमणी यांनी त्यांचा पूर्ण २८% स्टेक विकला. २६% शेअरकॅपिटलसाठी ओपन ऑफर आणली जाईल.
आज ISGEC, रेलटेल, NLC, इंडिया ग्लायकॉल, बामर लॉरी,फिनोलेक्स, ओरिएंट रिफ्रॅक्टरीज, MSTC, या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSW एनर्जी, शालिमार, SJVN ( इतर उत्पन्न ), हिंदुस्तान कॉपर यांचे निकाल सर्व साधारण होते.

आज दोडला डेअरी ( NSE वर Rs ५५०/- BSE वर Rs ५२८/-) आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( BSE आणि NSE वर Rs १००९/- ) या कंपन्यांचे चांगले लिस्टिंग झाले. ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.

ब्राझीलमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे उसाचे गाळप १४% ने कमी झाले आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती वाढत आहेत. सरकारचे निर्यातीला प्रोत्साहन, इथेनॉल निर्मितीवर जोर यामुळे आज साखरेच्या शेअर्समध्ये तेजी होती.
PM कुसुम योजनेअंतर्गत शक्ती पंप्स या कंपनीला मोठी ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे शेअरमध्ये ताजी होती.

इमामीने हेलीऑस लाइफस्टाइल मध्ये ४५% स्टेक ऑल कॅश डील बेसिसवर घेतला.

DR रेड्डीज या फार्मा कंपनीने २ DEOXY-D-ग्लुकोज या कोविड उपचारात उपयोगी असलेल्या औषधाची किंमत Rs ९९० ठेवली.

पॉवर मेक या तुलनात्मक दृष्टीने पाहिले तर लहान कंपनीला कोल इंडियाकडून Rs ९२९४ कोटींची ऑर्डर मिळाली.

एस्कॉर्टस ही ट्रॅक्टरचे उत्पादन करणारे कंपनी ट्रॅक्टरच्या किमती वाढवणार आहे. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

HDFC स्टॅंडर्ड लाईफ या कंपनीतील स्टँडर्डलाईफ ही कंपनी त्यांचा स्टेक Rs ६५८ ते Rs ६७८ प्रती शेअर या किमतीवर ७ कोटी शेअर विकून Rs ३००० कोटी गोळा करेल.

माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन बर्याच कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
(१) Rs ३.०३ लाख कोटी हे डिस्कॉमच्या रिझल्ट लिंक्ड पॉवर डिस्ट्रिब्युशन साठी द्यायची तरतूद केली.
(२) खेडोपाड्यापर्यंत ब्रॉड बँड पोहोचावा म्हणून जास्तीचे Rs १९०४१ कोटी भारत नेटला देण्याची तरतूद केली. सोळा राज्यातून PPP ( पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) योजनेखाली अंमलबजावणी होईल. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी PLI योजनेचा कालावधी प्रत्येक कंपनीसाठी असलेली मुदत संपल्यानंतर २०२५ -२०२६ पर्यंत एक वर्ष वाढवली.
(३) नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुअरन्स अकाउंटच्या माध्यमातून जी निर्यात होईल त्याच्या साठी Rs ३३००० कोटींची तरतूद केली. सरकार ECGC ( एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) मध्ये ५ वर्षाच्या काळात इक्विटी इन्फ्युज करेल. त्यामुळे Rs ८८००० कोटीचे विमासंरक्षण देता येईल.
(४) कुपोषण, शेतकऱयांचे उत्पादन वाढवणे आणि सामाजिक आरोग्य यासाठी Rs २३२०० कोटींची तरतूद केली.
(५) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली.
(६) DAP आणि P & K सबसिडीसंबंधित खुलासेवार माहिती दिली.
(७) आत्मनिर्भर भारत योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली.
(८) ५ लाख लोकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत फ्री टुरिस्ट व्हिसा दिला जाईल.या फ्री टुरिस्ट व्हिसाचा फायदा टुरिस्ट आयुष्यात एकदा घेऊ शकतो. ११००० पेक्षा जास्त टुरिस्ट गाईड, ट्रॅव्हल टुरिझम स्टेक होल्डर्स यांना आर्थीक सहकार्य दिले जाईल. या साठी दिलेल्या कर्जावर MCLR +२% व्याज आकारले जाईल.
(९) मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून २५ लाख लोकांना क्रेडिट गॅरंटी योजनेचे फायदे मिळतील.

याचा फायदा इंडियन हॉटेल्स, ताज GVK, थॉमस कुक, लेमन ट्री, इजी ट्रिप प्लांनर्स महिंद्रा हॉलिडेज या आणि इतर पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांना , ITI, तेजस नेटवर्क D -लिंक,स्मार्ट लिंक स्टरलाईट टेक्नॉलॉजी या ब्रॉड बँड क्षेत्रातील, बंधन बँक ,इक्विटास स्माल फायनान्स बँक, उज्जीवन स्माल फायनान्स बँक, स्पंदन स्फूर्ती, AU स्माल फायनान्स बँक या मायक्रो फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांना होईल.

आज मार्केट गॅपअप उघडले. आणि नंतर मात्र शेवटपर्यंत पडत राहिले. मार्केटमध्ये बेअरीश बेल्ट होल्ड पॅटर्न बनला.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२७३५ NSE निर्देशांक निफ्टी १५८१४ आणि बँक निफ्टी ३५३५९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ जून २०२१

आज क्रूड US $ ७५ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास US $ निर्देशांक ९१.८० USA बॉण्ड यिल्ड १.४९ PCR १.३९ VIX १४ च्या आसपास होते.

आज USA यमधील मार्केट्स तेजीत होती. अक्सेंच्युअर या IT क्षेत्रातल्या कंपनीचे निकाल चांगले आले तसेच त्यांनी गायडन्स चांगला दिला. US $ ५७९ बिलियन च्या इंफ्राप्रोजेक्टला USA मधे दोन्ही पक्षांच्या सभासदांनी मंजुरी दिली. USA चा GDP ग्रोथ रेट ६.४% झाला. जॉबलेस क्लेम्स अंदाजापेक्षा जास्त आले.

जुलै महिन्यापासून F & O सेगमेंटमध्ये ४ शेअर्सचा समावेश झाला. AB फॅशन (२६०० चा लॉट) इंडियन हॉटेल्स ( ३९०० शेअर्स चा लॉट ) कोरोमंडल ( ६२५ शेअर्सचा लॉट) मेट्रोपोलीस हेल्थ केअर ( २०० शेअर्सचा लॉट) या प्रमाणे हे शेअर्स आहेत. निफ्टीचा लॉटही ५० निफ्टीचा करण्यात आला.

अशोक लेलँड, ONGC ,गॉडफ्रे फिलिप्स ( Rs २४ लाभांश) या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
मुकुंद लिमिटेड ही कंपनी त्यांची महाराष्ट्रातील ठाण्याजवळची ४७ एकर जमीन Rs ७५२ कोटींना विकणार आहे. रशियामधून स्टील आणि निकेल यांची निर्यात जास्त होते म्हणून रशियाने या दोन्ही धातूंवर निर्यात कर बसवला. त्यामुळे या धातूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

युनियन बँकेने BASEL III कंप्लायन्स बॉण्ड्सच्या रूटने Rs ८५० कोटी उभे केले. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.

शारदा मोटर्स ही ऑटो इक्विपमेंट उपादान करणारी फर्म आहे. ही फर्म आणि किनेटिक ग्रीन एनर्जी आणि पॉवर सोल्युशन यांनी एक जॉईंट व्हेंचर केले आहे. ते इलेक्ट्रिकल व्हेईकल आणि STATIONERY अप्लिकेशन्ससाठी बॅटरी पॅक विकसित करणार आहेत.

दीपक स्पिनर्समध्ये डॉली खन्ना या गुंतवणूकदाराने १.०६% स्टेक ( ७६५५५ शेअर्स) Rs १६७.२० प्रती शेअर या भावाने खरेदी केला. त्यामुळे या शेअरला अपर सर्किट लागले.

शिल्पा मेडिकेअरला DRDO ( डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) कडून २-DEOXY – DGLUCOSE ( याला 2 DG ) च्या उत्पादन आणि विक्रीसाठी मंजुरी मिळाली. या २DG ला DCGI ( ड्रॅग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) कडून कोविडसाठी औषध म्हणून वापरण्यासाठी इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मिळाली.

टाटा केमिकल्सची रॅलीज इंडिया ही सबसिडीअरी आहे. रॅलीजमध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवीन इंटिग्रेटेड रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर बनवण्यासाठी आणि नवीन उत्पादने लाँच करण्यासाठी योजना आखत आहे.म्हणून रॅलीज इंडियाचा शेअर तेजीत होता.

LIC हौसिंग फायनान्स या कंपनीची पेरेन्ट LIC ३.७७% स्टेक साठी Rs २३३४.७० कोटी गुंतवणार आहे. LIC ला Rs ५१४.२५ प्रति शेअर या दराने प्रेफरंशियल अलॉटमेंट केली जाईल.

मजेस्को या कंपनीत प्रमोटर्सनी १४.३१% स्टेक घेतला. पूर्वी त्यांचा स्टेक २०.२६% होता आता तो ३४.५७% झाला. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.

इंडियन बँकेने QIP इशू रूटने Rs १६५० कोटी उभारले. म्हणून इंडियन बँकेचा शेअर तेजीत होता.

SBI ने क्रिटिकल हेल्थकेअर क्षेत्रातील हॉस्पिटल्स नर्सिंग होम्स, डायग्नॉस्टिक सेंटर्स, पॅथॉलॉजी लॅब आणि लॉजिस्टिक फर्म्स यांना १० वर्षे परतफेडीची Rs १०० कोटीपर्यंत कर्ज देण्याची तरतूद असलेली आरोग्यम हेल्थकेअर बिझिनेस लोन योजना सुरु केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९२५ NSE निर्देशांक १५८६० बँक निफ्टी ३५३६४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ जून २०२१

आज क्रूड US $ ७५ प्रती बॅरल रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास US $ निर्देशांक ९१.८० USA बॉण्ड यिल्ड १.४८ होते. PCR १.११ तर VIX १५.२५ च्या आसपास होते.

जागतिक मार्केटमधील संकेत सकारात्मक होते. IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. फेडचे निवेदन मार्केटने लक्षात घेऊन पुढील वाटचाल सुरु केली. आता मार्केटचे लक्ष जॉबलेस क्लेम्स डेटा आणि बँक ऑफ इंग्लंडच्या मॉनेटरी पॉलिसीकडे आहे

आज रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. पुढील तीन वर्षात केली जाणारी Rs ७५००० कोटींची गुंतवणूक ही आजची महत्वाची घोषणा होती. प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीज ही ऑइल क्षेत्रात काम करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध होती त्यामधून टेलिकॉम बिझिनेसमध्ये प्रवेश केला, रिलायन्स JIO हा ब्रँड सुप्रस्थापित केला. आता पुन्हा एकदा रिलायन्स ग्रीन एनर्जीमध्ये लक्ष घालत आहे. कंपनी जामनगर येथे ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्स बनवणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये ४ प्लांट्स असतील. ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी आणि त्याचे रूपांतर करण्यासाठी प्लांट उभारत आहे. या ग्रीन एनर्जी बिझिनेसमुळे लाखो नव्या नोकरीच्या संधी मिळतील. १०० गिगा VATT सोलर एनर्जी २०३० पर्यंत या प्रोजेक्टमध्ये तयार होईल. नवीन एनर्जी इको सिस्टिमला लागणारी सर्व साधनसामुग्री या चार प्लांट मध्ये तयार केली जाईल.
ऍडव्हान्स एनर्जी स्टोअरेज बॅटरीचे उत्पादन करण्यात येईल. फ्युएल सेल फॅक्टरी, सोलर फोटोव्होल्टाईक मोड्यूल फॅक्टरी, इलेक्ट्रोलाईझर फॅक्टरी जाम नगर कॉम्प्लेक्समध्ये सुरु होईल. आरामकोचे चेअरमन YASIR AL -RUMAYYAN हे रिलायन्सच्या बोर्डवर इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून काम करतील. आरामको ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ओ२C बिझिनेसमध्ये स्ट्रॅटेजिक गुंतवणूकदार असेल. आम्ही फेसबुक, गूगल आणि मायक्रोसॉफ्ट बरोबर सहकार्याचा करार करत आहोत. गणेश चतुर्थी किंवा १० सप्टेंबर २०२१ पासून बाजारात ‘JIO फोन नेक्स्ट’ उपलब्ध होईल. आम्ही 5G नेट्वर्कसाठी काम करत आहोत आणि मुंबईत 5G ची ट्रायल घेत आहोत. JIO फायबरचा विस्तार जलदगतीने होत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलायन्स रिटेलला लॉक डाऊनच्या काळात थोडा सेटबॅक मिळाला. पण अशाही परिस्थितीत रिलायन्स रिटेलने चांगली कामगिरी केली. FITCH या रेटिंग एजन्सीने रिलायन्स इंडस्ट्रीजचे लॉन्ग टर्म फॉरीन करन्सी इशुअर डिफॉल्ट रेटिंग वाढवून ‘BBB’ विथ नेगेटिव्ह आउटलूक असे केले. या AGM मध्ये शेअरहोल्डर्ससाठी काहीही नसल्यामुळे आज रिलायन्सचा शेअर पडला.

आज पासून इन्फोसिसने आपला Rs १७५० किमतीपर्यंत ५,२५,७१,४२८ शेअर्सचा Rs ९२०० कोटींचा बायबॅक सुरु केला. हा ओपनमार्केट बायबॅक आहे. याची मुदत २५ जून ते २४ डिसेंबर २०२१ असून त्याआधी जर एवढे शेअर्स बायबॅक झाले तर शेअर बायबॅक लवकर बंद करण्यात येईल.

MTNL ला दिल्लीमध्ये ५G ची ट्रायल सुरु करायला परवानगी मिळाली.

धून सेरी टी या कंपनीने तुमच्याजवळ २ शेअर्स असले तर १ शेअर बोनस जाहीर केला.

भारतीय सेना १७५० फ्यूचरिस्टिक इन्फन्ट्री कॉम्बॅट व्हेइकल्स खरेदी करणार आहे याचा फायदा अशोक लेलँड ला होईल.
अडानी ग्रुपने ऑस्ट्रलियातील CARMICHAEL खाणीतून कोळसा काढायला सुरुवात केली. आणि त्यांच्या कस्टमर्सकडे पाठवायला सुरुवात केली. या प्रोजेक्टमुळे या ऑस्ट्रेलियातील प्रांताचा आर्थीक कायापालट होईल आणि भारतातील पॉवर उत्पादकांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल. सुरुवातीला या प्रोजेक्ट्सला काही स्थानिक लोकांनी पर्यावरणाच्या कारणावरून विरोध केला होता.

आज श्याम मेटॅलिक आणि सोना कॉमस्टार या कंपन्यांचे लिस्टिंग झाले. सोना कॉम स्टार या कंपनीचे BSE वर Rs ३०२.४० तर NSE वर Rs ३०१ वर लिस्टिंग (IPO प्राईस Rs २९१.०० ) झाले.. नंतर हा शेअर Rs ३६२.८५ पर्यंत जाऊन त्याला अपर सर्किट लागले. श्याम मेटॅलिकच्या शेअरचे BSE वर Rs ३६७ तर NSE वर Rs ३८० ( IPO प्राईस Rs ३०६.००) वर लिस्टिंग झाले. ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.

इंडिया पेस्टीसाईड्स या कंपनीचा IPO दुसऱ्या दिवशी १.५४ पट भरला.

जून एक्स्पायरी अपेक्षेप्रमाणे निफ्टी १५७०० ते १५८०० या रेंज मध्ये झाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२६९९ NSE निर्देशांक निफ्टी १५७९० बँक निफ्टी ३४८२७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९१.८५ USA बॉण्ड यिल्ड १.४६ क्रूड US $ ७५.१४ च्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.१७ च्या आसपास होता. VIX १५.१८ PCR ०.८३ होते.

आज ITI, NMDC, BEL या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे आणि S. चांद आणि कंपनी, डॉनिअर, इंडोटेक ट्रान्सफॉमर्स या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.शोभा या रिअल्टी क्षेत्रातील कंपनीचे निकाल असमाधानकारक होते.

हिरो मोटो कॉर्प ही ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी त्यांच्या मोटारसायकल्स आणि स्कुटर्सच्या किमतीत Rs ३००० ची वाढ करणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी होती.

MINDA ही ऑटो कॉम्पोनंट उत्पादन करणारी कंपनी उझबेकिस्तानस्थित ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादन करणाऱ्या UZ CHASYS कंपनीतील ५१% स्टेक Rs ५८ कोटींना खरेदी करणार आहे.

चहाच्या होणाऱ्या नियमित लिलावात चहाला जास्ती किंमत मिळाली. याचा फायदा जयश्री टी आणि गुडरीक या कंपन्यांना होईल.

HEINKEIN या कंपनीला युनायटेड ब्रुअरीजमध्ये १४.९९% हिस्सा Rs १४७१.२५ प्रती शेअर खरेदी करण्यासाठी सेबीने CCI ने परवानगी दिली. कम्पनीला ओपन ऑफर आणण्याच्या नियमातून सूट दिली गेली. या कंपनीमध्ये DRT (DEBT रिकव्हरी ट्रिब्युनल ) बंगलोर ने AML ऍक्ट अंतर्गत SBI च्या नेतृत्वाखालील कन्सॉरशियम साठी Rs ५८०० कोटींचे शेअर्स विकले. २५ जून पर्यंत आणखी Rs ८०० कोटीं मिळतील. . त्यामुळे आज युनायटेड ब्रुअरीजच्या शेअर्समध्ये मंदी आली.विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांची Rs ९३७१ कोटींची मालमत्ता ED ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे ट्रान्स्फर केली. त्यामुळे PNB चा शेअर तेजीत होता.

इंडिगो ही प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनी त्यांच्या बेस फेअरवर १०% डिस्काउंट ज्यांनी व्हॅक्सिन घेतले आहे अशा प्रवाशांना देणार आहे.

अडाणी पोर्टच्या म्यानमार प्रोजेक्टमधून KLP या नॉर्वेच्या पेन्शन फंडाने केलेली गुंतवणूक डायव्हेस्ट केली. कारण म्यानमार लष्कराबरोबर कंपनीचे संबंध आहेत असे KLP ला समजले. हे त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणात बसत नाही.

सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे कॉर्पोरेटायझेशन करायचे ठरवले आहे. यामुळे या बोर्डाचे व्यवस्थापन प्रोफेशनल रित्या होईल आणि संरक्षण सामग्रीचा नियमित सप्लाय होण्यास मदत होईल. याचा फायदा BEL, BEML ,भारत डायनामिक्स, HAL या सरकारी क्षेत्रातील तर वालचंदनगर इंडस्ट्रीज, झेनटेक, अस्त्र मायक्रोवेव्ह या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना होईल.

सरकारने सेंट्रल रेल्वे वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन आणि सेंट्रल वेअरहॉऊसींग कॉर्पोरेशन याचे मर्जर करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा रेल्वेशी संबंधित कंपन्यांना होईल.

व्होडाफोन ही कंपनी ५G नेट्वर्कसाठी सिस्को या कंपनीबरोबर पार्टनरशिप करणार आहे.

गुजरात राज्य सरकार पाठोपाठ आज हरयाणा सरकारने EV साठी सबसिडी योजना जाहीर केली. पहिल्या २०००० EV टू व्हिलर्सला Rs १०००० तर पहिल्या २०००० EV थ्री व्हिलर्सना Rs २५००० आणि पहिल्या EV कार्ससाठी Rs १००००० ची सबसिडी जाहीर केली. त्याच प्रमाणे रजिस्ट्रेशन चार्जेस, पार्किंग फी मध्येही सूट जाहीर केली. हरयाणा राज्य सरकार इलेक्ट्रिक व्हेईकल पार्क्स ( प्लग आणि इंटर्नल इन्फ्रास्ट्रक्चर सहीत) डेव्हलप करण्यासाठी १०० ते २०० एकर जमीन देईल. त्यामुळे सर्व इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादन करणाऱ्या कंपन्या आकर्षित होतील. पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या कार्सचे रूपांतर इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये करण्यासाठी केलेल्या भांडवली गुंतवणुकीवर सबसिडी मिळेल.

सरकारने IDBI बँकेसाठी बीड मागवल्यामुळे डायव्हेस्टमेन्टला चालना मिळाली त्यामुळे IDBI बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

उद्या शाम मेटॅलिक्स आणि सोना कॉमस्टार या दोन कंपन्यांच्या शेअर्सचे लिस्टिंग होणार आहे

आजपासून इंडियन पेस्टीसाईड्स या कंपनीचा IPO ओपन झाला आणि तो ६०% सबस्क्राईब झाला.

गेले तीनचार दिवस HUL च्या शेअरमध्ये तेजी आहे. कारण करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी करण्यासाठीत्यांनी त्यांच्या सप्लायचेनच्या क्षमतेमधे ३०% वाढ केली. तसेच ती जास्त फ्लेक्सिबल आणि जागृत केली. त्यामुळे खेडोपाड्यापर्यंत त्यांच्या उत्पादनांचा पुरवठा करता येईल आणि कंपनीचा मार्केटशेअर वाढण्यासाठी मदत होईल.
रिलायन्स इन्फ्राची त्यांचे ४ ऑपरेशनल रोड ऍसेट्स सिंगापूर स्थित ‘CUBE हायवेज’ या कंपनीला Rs १४०० कोटींना विकण्यासाठी बोलणी चालू आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३०६ NSE निर्देशांक निफ्टी १५६८६ बँक निफ्टी ३४५७४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ जून २०२१

US $ निर्देशांक ९१.९५ USA बॉण्ड यिल्ड १.४७ क्रूड US $ ७४.५० प्रती बॅरल च्या तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास होते. VIX १४.५९ PCR ०.९३ होते.

आज ग्लोबल संकेत चांगले होते. DOW मध्ये मार्च २०२१ नंतर प्रथमच ५०० अंकांची तेजी आली. पण क्रूडने मात्र US $ ७५ प्रती बॅरलचा टप्पा गाठला. रुपया US $१= Rs ७४.३७ ला पोहोचला. ही तेजी फेडच्या वक्तव्यामुळे आली. फेडने USA काँग्रेस समोर सांगितले की सध्या झालेली महागाई ही टीकाउ नाही. पेंट अप डिमांड आणि चालू असलेला SUMMER SEASON यामुळे आहे. मार्केटचे लक्ष २४ जूनला होणारी एक्स्पायरी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM कडे आहे.

आज USA मध्ये इंडिया-USA फार्मा समिट होती. म्हणून फार्मा क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

मारुती दुसर्या तिमाहीत पोर्टफोलिओमधील सगळ्या प्रॉडक्टसच्या किमती वाढवणार आहे. उत्पादनासाठी अत्यावश्यक असलेल्या कमोडिटीजच्या किमती वाढत असल्यामुळे आम्हाला भाव वाढवावे लागत आहेत असे कंपनीने सांगितले. त्यामुळे मारुतीच्या शेअरमध्ये आज लक्षणीय तेजी होती.

मुथूट फायनान्स या गोल्डलोन कंपनीने FINTECH स्टार्टअप PAYMATRIX मधील ५४% स्टेक घेतला. डिजिटल पेमेंट विभागाकडे मुथूट फायनान्सला आता लक्ष केंदित करायचे आहे.

सध्या अनलॉकच्या प्रक्रियेमुळे लोक पुन्हा घराबाहेरर पडू लागले आहेत. वाहनात बसल्या बसल्या संगीत ऐकण्याकडे लोकांचा कल असतो. या कंपन्यांना अधिक जाहिरातीसुद्धा मिळतात. रेडिओ सिटी आणि रेडिओ ब्रॉडकास्ट हे म्युझिक ब्रॉडकास्टचे ब्रँड आहेत. त्यामुळे म्युझिक ब्रॉडकास्टच्या शेअरमध्ये तेजी होती

गुजरात राज्य सरकारने नवीन EV धोरण जाहीर केले. गुजरात सरकार Rs ८७० कोटी सबसिडी ४ वर्षात देईल. EV खरेदी करणाऱयांना सब्सिडी मिळेल. चार्जिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणाऱ्यांना Rs १० लाखापर्यंत कॅपिटल सबसिडी मिळेल. गुजरात सरकार हायवेजवर ५०० EV चार्जिंग स्टेशन्स लावणार आहे. याचा फायदा ग्रीव्हज कॉटन, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, JBM ऑटो, मारुती यांना होईल. टू व्हीलरसाठी Rs २०००० , तीनचाकी वाहनांसाठी Rs ५००००, आणि चारचाकी वाहनांसाठी Rs १५०००० सबसिडी दिली जाईल. वाहनाची किंमत Rs १५ लाखाच्या आत असली पाहिजे .
NCLT ने KALROCK जालान यांचा जेट एअरवेजसाठी रेझोल्यूशन प्लॅन मंजूर केला. याला कंपनीला कर्ज देणार्या संस्थानी मंजुरी दिली. स्लॉट अलॉटमेंटवर DGCA आणि एव्हिएशन मंत्रालय ९० दिवसात निर्णय घेईल. जेट एअरवेजवर Rs १५५२५ कोटींचा क्लेम आहे. जेट एअरवेजच्या शेअरला अपर सर्किट लागले आणि स्पाईस जेटच्या शेअरमध्ये तेजी आली.

आज सन फार्माने CELGENEया कंपनीबरोबर चालू असलेल्या REVLIMID या पेटंटविषयी केसमध्ये CELGENE बरोबर सेटलमेंट केली.हे औषध रक्ताच्या कर्करोगासाठी उपयोगी आहे सेटलमेंटनुसार सन फार्माला CELGENE च्या LENALIDOMIDE कॅप्सूल्सच्या USA मध्ये मर्यादित QUANTITYच्या उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी असलेली पेटंट वापरण्यासाठी एका विशिष्ट तारखेपासून लायसेन्स मिळेल. तसेच जानेवारी ३१ २०२६ पासून USA मध्ये सन फार्मा GENERIC LENALIDOMIDE कॅप्सुल्सचे अमर्यादित उत्पादन करू शकेल .

इंडियन बँकेने Rs ४००० कोटींचा QIP जाहीर केला. QIP ची फ्लोअर प्राईस Rs १४२.१५ एवढी ठेवली आहे. त्याच प्रमाणे SBI ला Rs १४००० कोटी एवढे TIER I कॅपिटल भारतीय किंवा परदेशी चलनात वाढवण्यासाठी परवानगी दिली. ब्रिगेड Rs ५०० कोटी चा QIP करणार आहे.या QIP ची फ्लोअर प्राईस २७६.५० आहे. त्यामुळे इंडियन बँक स्टेटबँक आणि ब्रिगेड यांच्या शेअरमध्ये तेजी होती.

कामधेनू इस्पात त्यांचा पेंट उत्पादन करण्याचा बिझिनेस आहे. तो डीमर्ज करेल असा मार्केटचा अंदाज आहे. त्यामुळे शेअर तेजीत होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५८८ NSE निर्देशांक निफ्टी १५७७२ बँक निफ्टी ३४७४५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९२.२२ USA बॉण्ड यिल्ड १.४१ PCR १.१८ VIX १६.२२ क्रूड US $ ७४ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४ च्या आसपास होते.

आज सोने आणि इतर धातूंमध्ये मंदी होती. चीन ने आयर्न ओअरच्या स्पॉट मार्केटमध्ये होर्डिंग आणि स्पेक्युलेशनसाठी चौकशी सुरु करू असे सांगितले. तसेच इतर धातूंच्या आयातीवरील बंधने कडक केली. त्यामुळे धातुसम्बंधित शेअर्समध्ये मंदी होती.

stuअडानी पॉवर ही एस्सार पॉवरच्या १२०० MV महान प्रोजेक्टसाठी यशस्वी बीडर आहे.म्हणून शेअरमध्ये तेजी होती
रुग्णवाहिकेवरील GST सरकारने २८% वरून १२% केला. त्यामुळे मारुतीने त्यांच्या इको व्हॅन ची किंमत Rs ८८०००नी कमी केली.

व्हिडिओकॉनच्या शेअरचे डीलीस्टिंग होणार आहे. पण ते जो रेझोल्यूशन प्लॅन मंजूर केला आहे त्यानुसार होणार आहे. लिक्विडेशन व्हॅल्यू कंपनीला असलेले आणि थकलेले कर्ज फेडण्यासाठीही पुरेशी नाही. त्यामुळे शेअरहोल्डर्सना काहीही मिळणार नाही.

टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांनी सर्वात मोठे कारपोर्ट तयार केले आहे. त्यामुळे टाटा पॉवरच्या शेअरमध्ये तेजी आली.
SAIL ची कोलकाता इथे असलेली RAW मटेरियल डिव्हिजन डिसमॅनटल करणार आहेत. त्यामुळे Rs ४० कोटी एवढे कॉस्टसेविंग होईल. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

एशियन पेंट्स (डेकोरेटिव्ह पेंट्स) आणि पीडिलाइट ( फेविकॉल) यांनी आपापल्या प्रॉडक्टसच्या किमती वाढवल्या. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.

वेदांता ओडिशामध्ये कुरलोइ उत्तर येथील कोळशाच्या खाणीसाठी किमान रकमेचा बिडर आहे.

विप्रोने जानेवारीमध्ये केलेल्या पगारवाढीनंतर आता जूनमध्ये दुसरी पगारवाढ जाहीर केली आहे.

अलकेम लॅबच्या प्लांटतपासणीनंतर USFDA ने दोन त्रुटी जाहीर केल्या.

इंडिया पेस्टीसाईड्स या कंपनीचा Rs १ दर्शनी किमतिच्या शेअरचा Rs ८०० कोटींचा IPO Rs २९० ते Rs २९६ या प्राईस बँड मध्ये (५० शेअर्सचा मिनिमम लॉट) २३ जूनला ओपन होऊन २५ जूनला बंद होईल. ही कंपनी ऍग्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरर आहे.कंपनी टेकनिकल आणि फॉर्म्युलेशन्स या दोन विभागात काम करते ही कंपनी हर्बीसाईड्स, फंगीसाईड्स, टेक्निकल्स ( FOLPET, THIOCARBAMATE, इन्सेक्टीसाईड्स )आणि API यांचे उत्पादन करते. या सर्व उत्पादनांचा पीक संरक्षणासाठी उपयोग होतो. कंपनीचे प्लांट्स UP मध्ये आहेत.

अल्युमिनियम फॉईलच्या आयातीवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावली जाईल. याचा फायदा हिंडाल्कोला होईल.

सिंगापूर कोर्टाने DYSTAR ग्लोबल मधल्या ३६.७% स्टेकची किंमत Rs ३५७० कोटी ठरवली. याचा फायदा किरि इंडस्ट्रीजला होईल.

आज बँका विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकाच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.कारण या तिमाहीसाठी बहुतेक बँकांनी लॉस ऐवजी प्रॉफिट रिपोर्ट केले. या प्रॉफीटचा बराचसा हिस्सा ट्रेजरी गेन्समुळे झालेला होता. नीती आयोगाने सेंट्रल बँक आणि IOB यांची सरकारच्या स्टेकच्या डायव्हेस्टमेन्टसाठी शिफारस केली. तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात बँकिंग क्षेत्राशी संबंधित कायद्यांमध्ये सरकारी नियंत्रण थोडे सैल करण्यासाठी बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमधील मोठ्या रकमेचे NPA NPARCL उर्फ बॅड बँकेत बदली केले जातील. त्याच बरोबर फिट & प्रॉपर निकषांची निश्चित व्याख्या केली जाण्याची शक्यता आहे. E-कॉमर्स २०२० या कायद्यातही आवश्यक ते बदल केले जातील.
सेबीने PNB हौसिंगचे व्हॅल्युएशन आर्टिकल्स ऑफ असोसिएशन च्या नियमानुसार कक्षेबाहेर असल्यामुळे कार्लाइल, इतर आणि PNB हौसिंग मधील व्यवहाराला स्थगिती दिली.म्हणून PNB हौसिंगच्या शेअरला लोअर सर्किट लागले

भारती एअरटेल आणि TCS यांनी ५G साठी कोलॅबोरेशन केले त्यामुळे दोन्ही शेअर्स तेजीत होते.

आसाम राज्य सरकारने मायक्रो फायनान्स कर्जासाठी काही सवलती आणि इन्सेन्टिव्ह दिल्यामुळे आणि बंधन बँकेचा आसाम राज्यात मेजॉरिटी मार्केटशेअर असल्यामुळे बंधन बँकेला याचा फायदा होईल. म्हणून बंधन बँकेचा शेअर तेजित होता.

मार्केट आज लो पाईंटपासून ८३४ पाईंट सुधारले आणि तेजीत बंद झाले. BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५६४ NSE निर्देशांक १५७४६ आणि बँक निफ्टी ३४८७१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९१.९१ USA बॉण्ड यिल्ड १.५१ क्रूड US $ ७२.७० प्रती बॅरल, रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. PCR १.०१ होते. VIX १६ च्या आसपास होते.

आज सोने चांदी क्रूड आणि कॉपर, झिंक, अल्युमिनियम यांच्या किमती पडल्या कारण US $ मजबूत झाला. त्याचबरोबर चीनने त्यांच्या कमोडिटीच्या आयातीवर नियंत्रणे कडक केली. USA मधील मार्केट्स सावरली.

रुपया घसरत असल्यामुळे IT तसेच निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी होती.उदा वॉटर बेस, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, अवंती फीड्स, गोकुळदास एक्स्पोर्ट्स.

आज कार्लाइलने SBI कार्डसचे ४.८ कोटी शेअर्स Rs १००२ ते Rs १०४१ या रेंजमध्ये ब्लॉक डील रूटने विकले.
पॉवर ग्रीड या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. कंपनीने Rs ३ प्रती शेअर अंतिम लाभांश आणि ३ शेअरमागे १ बोनस शेअर जाहीर केला. नाटको फार्माचे निकाल मात्र असमाधानकारक होते. J & K बँकेचे निकाल चांगले आले. बँक लॉस मधून प्रॉफीटमध्ये आली.

अडाणी एंटरप्रायझेसने जयपूर, त्रिवेंद्रम, गौहाती विमानतळ टेकओव्हर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला.
D- मार्ट आणि इन्फोएज यांचा २९ सप्टेंबरपासून निफ्टीमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. IOC निफ्टीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

कोणत्याही रोगासाठी रोगप्रतिबंधक लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू अलग करून ते कोणत्यातरी होस्ट पेशींमध्ये वाढवावे लागतात. यासाठी अंड्यांचा उपयोग केला जातो. गेले ७० वर्षे ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो. वेंकीज ही अंड्यांचे उत्पादन करणारी जवळजवळ १००% मार्केटशेअर असलेली कंपनी आहे. ही कंपनी लस उत्पादनात उपयोगी पडणारी स्पेसिफिक पॅथोजेन फ्री अंड्यांचे उत्पादन करते. वेंकीज ही अंडी सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हेस्टर बायोसायन्सेस या वेगवेगळ्या माणसांसाठी आणि पशूंसाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांना पुरवते ही SPF अंडी रॅबिज, फ्लू आणि पशूंना होणाऱ्या रोगांसाठी रोगप्रतिबंधक लस उत्पादनात वापरतात. वेंकीज ही अंडी आपल्या व्हेंट्री बायॉलॉजिकलस मध्ये १९७९ पासून बनवत आहे. ही अंडी बनवण्यासाठी चांगल्या पैदाशीच्या, चांगली रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या, भरपूर आयुष्यमर्यादा असलेल्या आणि अंडी देण्याची क्षमता असलेल्या कोंबड्यांची निवड केले जाते. या कोंबड्यांच्या तीन ते चार पिढ्या वाढवल्या जातात.या दरम्यान या कोंबड्यांना कोणतेही लसीकरण किंवा अँटिबायोटिक्स दिले जात नाही. या सर्व प्रक्रियेला ६ ते ७ वर्षे लागतात. ही अंडी आयात केलेल्या अंड्यांपेक्षा अर्ध्या दरात उत्पादन .केली जाऊ शकतात. त्यामुळे वेंकीजच्या SPF अंड्यांना भारतात चांगली मागणी आहे.

कोरोनाची व्हॅक्सिन बनवण्यासाठी जगभरातून स्पेसिफिक पॅथोजेन फ्री अंड्यांना मागणी येईल. त्यामुळे वेंकीजचे निर्यातीपासून होणारे उत्पन्न वाढेल. आणि वेंकीजचा शेअर तेजीत येण्याची शक्यता आहे. डोडला डेअरीचा IPO ६ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

आज मार्केट दिवसभर मंदीच्या विळख्यात होते मार्केटची वेळ संपता संपता मात्र मार्केट मूळ स्थितीत परत आले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३४४ NSE निर्देशांक निफ्टी १५६८३ आणि बँक निफ्टी ३४५५८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ जून २०२१

आज क्रूड US $ ७४.०५ प्रती बॅरल रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९१.४५ US बॉण्ड यिल्ड १.५८ VIX १४.८० ते १५.३१ दरम्यान होते. PCR १.०५ होते.

आज USA फेड ने आपले निर्णय जाहीर केले. त्यांनी व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. व्याज दर ०.००% ते ०.२५% च्या दरम्यान राहतील असे सांगितले. त्यांनी सांगितले की आम्ही २०२३ वर्षात व्याज दर २ वेळा वाढवू. आतापर्यंत त्यांनी सांगितले होते की आम्ही २०२४ पर्यंत व्याज दरात बदल करणार नाही.

फेडने सांगितले की आम्ही QUANTATIVE EASING अंतर्गत दर महिन्याला US $ १२० बिलियनचे ऍसेट खरेदी करू.
त्यांनी महागाईचे लक्ष्य २.४% वरून ३.४% केले. GDP ग्रोथ ६.५ %ऐवजी ७% राहील असे अनुमान केले. या फेडच्या घोषणेनंतर US $ निर्देशांक आणि US बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाली. फेडने महागाई नियंत्रित करण्याऐवजी GDP ग्रोथला प्राधान्य दिले असे दिसते आहे. फेडच्या या निर्णयाचे पडसाद USA तसेच जगाच्या अन्य मार्केट्समध्ये उमटले. जागतिक मार्केट काही काळ मंदीत गेली.

आज भारतीय मार्केटमध्ये मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजित होते. उदा युनायटेड स्पिरिट्स, ग्लोबस स्पिरिट्स, रॅडिको खेतान, तसेच सिमेंट, IT, ज्युवेलरी, FMCG आणि फर्टिलायझर क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. आज मेटल्स संबंधित शेअर्स मंदीत होते.

CESC या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने आपल्या एका शेअरचे १० शेअरमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घोषित केला.

वेल स्पन इंडियाचे निकाल असमाधानकारक होते.

फेडरल बँक Rs ९१६.२५ कोटी वर्ल्ड बँक किंवा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला शेअर्स इशू करून उभारणार आहे. Rs ४००० कोटी इक्विटी आणि इतर इन्स्ट्रुमेंट्स दवारा उभारणार आहे. Rs ८००० कोटी भारतीय किंवा परदेशी चलनातील बॉण्ड्सच्या दवारा उभारणार आहे.

नाथ बायो ही कंपनी २४ जून २०२१ रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल, शेअर बायबॅक आणि लाभांशावर विचार करणार आहे
KEC इंटरनॅशनल या कंपनीला रेल्वेकडून Rs ९३७ कोटींची ऑर्डर मिळाली.

L & T इन्फोटेक ही कंपनी ‘CUE LOGIC टेकनॉलॉजि’ या डिजिटल इंजिनीअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रातील कंपनीला US $ ८.४ मिलियन ( Rs ६१.६ कोटींना) खरेदी करणार आहे.

TTK प्रेस्टिज या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले आणि कंपनीने Rs ३० प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

फार्म Easy ही कंपनी थायरोकेअर या कंपनीला Rs ७००० कोटींना खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे.

PUBLISHMEमध्ये नजारा टेकनॉलॉजी ही कंपनी मोठा स्टेक खरेदी करणार आहे. हिमाद्री केमिकल्स या कंपनीचा टेस्ला या USA मधील कंपनीबरोबर करार झाल्याच्या बातमीचा हिमाद्री केमिकल्स ने इन्कार केला.

आज टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की ट्रक टायर आणि इतर टायरच्या किमती ४% ते ५% ने वाढू शकतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३२३ NSE निर्देशांक निफ्टी १५६९१ बँक निफ्टी ३४६०५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!