आजचं मार्केट – ४ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ४ जून २०२१

आज क्रूड US $ ७१ प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७३.०४ US $ निर्देशांक ९०.५७ आणि VIX १८.३२ होते.

१३ एप्रिल २०२१ नंतर आज आपली भेट होत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्लॉक देता येत नव्हता. पण सर्व वाचकांनी घातलेली साद देवाने ऐकली आणि या संकटातून माझी मुक्तता केली. मी सर्व वाचकांची आभारी आहे. आजपासून पुन्हा ब्लॉग सुरु करीत आहे.

आजचे क्लूज फारसे चांगले नाहीत. भारतात किंवा USA मध्ये महागाई वाढण्याचा धोका आहे. USA मधील जॉब्स डाटा सुधारला पण जॉब कमी उपलब्ध आहेत. भारतात क्रूडचे दर वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढत आहेत. पण सरकार अर्थव्यवस्थेत टाकत असलेल्या पैसा सर्व झाकून टाकत आहे. त्यामुळे USA मध्ये काय किंवा भारतात काय वाढणाऱ्या महागाईची चिंता भेडसावत आहे. सध्या वाढणारा क्रूडचा दर, आणि रुपयांची घसरण या दोन गोष्टी चिंताजनक आहेत.

ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारतातील साखरेसाठी जागतिक बाजारपेठेत मागणी वाढली तसेच सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखर क्षेत्रात तेजी येत आहे. मावाना शुगर, धामपूर शुगर,
आज USA ने भारतातून आयात होणाऱ्या सोन्याच्या दागदागिन्यांवर जे टॅरिफ लावले जात होते ते १८० दिवसांकरता सस्पेंड केले. याचा फायदा जेम्स आणि ज्युवेलरी क्षेत्रातील कंपन्यांना होईल.उदा थंगमाईल ज्युवेलर्स, कल्याण ज्युवेलर्स, TBZ यांना फायदा होईल.

आज रिझर्व्ह बँकेने आपले द्वै मासिक वित्तीय धोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. रेपोरेट ४%, रिव्हर्स रेपो रेट ३.३५%, MSF आणि बँक रेट ४.२५% वर कायम ठेवला. RBI ने आपला अकोमोडेटिव्ह स्टान्स कायम ठेवला आणि जोपर्यंत अर्थव्यवस्था कोविड १९ च्या संकटातून बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही अकोमोडेटिव्ह स्टान्स कायम ठेवू असे सांगितले.

पावसाविषयी चांगले भाकीत आणि शेतीक्षेत्राची भरीव कामगिरी यामुळे ग्रामीण क्षेत्रात चांगली मागणी असेल. तसेच जागतिक मागणी वाढल्यामुळे भारताच्या निर्यातीत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. FY २१ साठी रिअल GDP ग्रोथ -७.३% राहील असे अनुमान केले. अन्नधान्याच्या किमती वाढतील. महागाईचे अनुमान FY २१-२२ साठी ५.१% राहील. FY २१-२२ च्या पहिल्या तिमाहीसाठी ५.२%, दुसऱ्या तिमाहीसाठी ५.४%, तिसर्या तिमाहीसाठी ४.७% तर चौथ्या तिमाहीसाठी ५.३% चे अनुमान केले. आम्ही वर्षभरात लिक्विडिटीचा पुरवठा तसेच व्यवस्थित उपलब्धता यासाठी आवश्यक ती पाऊले उचलू असे सांगितले. GSAP -१ अंतर्गत Rs ४०००० कोटींचे ऑपरेशन १७ जून २०२१ रोजी केले जाईल. GSAP-२ अंतर्गत Rs १.२० लाख कोटींचे ऑक्शन करू.

अर्थव्यवस्थेची प्रगती सुरु ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. RBI रस १५००० कोटींची ON टॅप लिक्विडीटी विंडो उघडेल यातून हॉटेल उद्योग, रेस्टारंट, टुरिझम, कार-रिपेअर्स आणि कार रेंटल्स इव्हेंट आणि कॉन्फरंस ऑर्गनायझर्स, ब्युटी पार्लर्स, सलून . या क्षेत्रातील MSME आणि स्मॉल इंटरप्रायझेसना कर्ज देता येतील.

ही पॉलिसी जाहीर झाल्यावर हॉटेल पर्यटन क्षेत्रातील शेअर्स वाढते. थॉमस कुक, EIH, ताज GVK, CHALET हॉटेल्स, रॉयल ऑर्चिड्स, लेमन ट्री हॉटेल्स.

IDBI बँकेच्या बाजूने UK च्या कोर्टात निकाल लागल्यामुळे IDBI बँकेची US $ २३९ मिलियन वसुली होण्याची शक्यता आहे. हा निकाल ईसार शिपिंगच्या CYPRIOT सबसिडीअरी संबंधित आहे.

सोन्याच्या हाँलमार्किंग संबंधित नियम कडक केल्यामुळे असंघटीत क्षेत्रातून व्यापार संघटीत क्षेत्रात येईल. याचा फायदा टायटनला होईल.

APL अपोलो ट्यूब्स आणि अपोलो ट्रायकोट याचे मर्जर होणार आहे.त्यामुळे आज हे दोन्ही शेअर्स तेजीत होते.
अर्थव्यवस्था हळू हळू अनलॉक होईल या अपेक्षेमुळे मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. युनायटेड स्पिरिट्स, GM ब्रुअरीज, सोम डिस्टीलर्स, रॅडिको खेतान

ऍक्सिस बँक आणि स्पंदन स्फूर्ती यांच्यात ऍक्सिस बँकेने स्पंदना स्फूर्ती खरेदी करण्यासाठी प्राथमिक वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे स्पंदन स्फूर्तीच्या शेअरमध्ये तेजी होती .

AB फॅशन, इंडियन हॉटेल्स, कोरोमंडल आणि मेट्रोपोलीस हेल्थकेअर ह्या कंपन्या F & O सेगमेंटमध्ये जुलै सिरीजमध्ये (म्हणजे २५ जून २०२१ पासून) सामील होतील.

बुल मार्केट चालू असल्यामुळे डिमॅट अकाउंट उघडले जात आहेत तसेच ट्रेडिंग व्हॉल्युम्समध्ये वाढ झाल्यामुळे ब्रोकरेज फर्म्सच्या शेअर्समध्ये तेजी होती. इन्जेल ब्रोकिंग, रेलिगेअर, JM फायनान्सियलस, ५ पैसा .कॉम

रशियातून आयात होणाऱ्या पॉलीटेट्राफ्लोरोइथिलिनवरील ऍन्टीडम्पिंग ड्युटी ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२१०० NSE निर्देशांक निफ्टी १५६७० आणि बँक निफ्टी ३५२९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

15 thoughts on “आजचं मार्केट – ४ जून २०२१

 1. MANGESH

  khup chan aajji…..tumcha lekh aala he baghun khup khup br vatl….thank you…..ani kalgi ghya ….

  Reply
 2. मयुरेश पंडित

  प्रकृतीची काळजी घ्या. आजच्या माहितीसाठी धन्यवाद.

  Reply
 3. SHAMBHAVI MANOJ JADE

  तुम्हाला परत बघून फार बरा वाटल . एवढे दिवस मार्केट मध्ये trade करताना तुमची उणीव भासत होती कारण सगळं स्वतःच समजून घेऊन करावं लागत होत पण आता तुम्ही छान लिहिता ते वाचून व्यवस्थिरित्या कळत . तुम्हाला निरोगी आयुष्य लाभोत हिचं प्रार्थना.🙏

  Reply
 4. Sudhakar Revaji Kolhe

  अभिनंदन ताईआजी,
  लवकरात लवकर आजारातुन रिकव्हर झाल्या बद्दल तरीपण जास्त
  आराम करा व काळजी घ्या. बाकीचे तर चालतच राहणार.

  Reply
 5. Jayant Mendjoge

  आपल्याला चांगले आरोग्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. इतके दिवस थोडे चुकल्या सारखं वाटत होते. आज तुमचा blog वाचुन आनंद झाला. जयंत मेंडजोगे.

  Reply
 6. vinod dhondiram nikam

  प्रथमतः मनापासून अभिंनदन व तुम्हाला ( लाखांच्या निस्वार्थी पोशिन्द्याला ) दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
  तुमचा blog मी सतत वाचत असतो त्या प्रमाणे काही stock दीर्घ कालावधी साठी खरेदी केले होते व त्यात चागल्या प्रमाणात नफा देखील मिळाला .मात्र अलीकडे तुम्ही देत असलेल्या काही stock follow करून प्रथम एप्रिल महिन्यात EIH Parry या कंपनीचा दिलेला chart चे आधारे प्रथमता trade करून मला १६५३ रुपये मिळाले त्या नंतर सतत trade करत असून आज अखेर चांगला नफा मिळाला आहे व मिळत आहे . हे तुमच्या मार्गदर्शना मुळे झाले असून त्या बद्दल मनापासून आभार

  दिनांक १३/४/२०२१ नंतर सतत मनात रुखरुख लागली होती. मात्र तुमचा आजचा ब्लॉक वाचून फार आनंद झाला .
  काळजी घ्या तुमची व कुटुंबाची.

  Reply
 7. Uday Kashikar

  तुमचं ब्लॉग 2 महिन्यांनी वाचून खूप बरे वाटले. खूप चुकल्या सारखे वाटत होते. अचानक तुमचे विडिओ बंद झाले. आणि मनाला रुखरुख लागली.
  तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायु लाभो.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.