आजचं मार्केट – ७ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ जून २०२१

आज क्रूड US $ ७१.४७ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७२.८० च्या आसपास होते. इंडिया VIX १५.२४ होते.

मार्केटच्या आशादायी मनःस्थितीला सातत्याने कमी होणाऱ्या कोरोना रुगणांच्या संख्येमुळे आणि परिणामी होणाऱ्या अनलॉकिंगचा सपोर्ट मिळाला आणि मार्केटमधील तेजी कायम राहिली. आता सर्व देशांनी त्यांच्या देशात बिझिनेस करत असणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नावर कमीतकमी १५% कॉर्पोरेट कर भरावा असा करार G-७ देशांनी ठरवले. आज २०८ शेअर्सची सर्किट लिमिट बदलली/ वाढवली. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.

कोरोनाच्या रुगणांची संख्या कमी होत असल्यामुळे सर्वत्र अनलॉकिंग/ निर्बंध कमी केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी असलेली मागणी वाढेल. त्यामुळे FMCG आणि कन्झ्युमर प्रोडक्टस उत्पादन करणाऱ्या शेअर्समध्ये तेजी होती.
तसेच इथेनॉल ब्लेंडींगची समय मर्यादा अलीकडे आणल्यामुळे तसेच इथेनॉल उत्पादनासाठी दिलेल्या उत्तेजनामुळे आणि जागतिक साखरेच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी राहील. अनलॉकिंग होत असल्यामुळे हॉटेल्स रेस्टोरंट्स ओपन होतील. त्यामुळे साखरेला असलेल्या मागणीत वाढ होईल.

क्रूडच्या दराने US $७२ प्रती बॅरेलची मर्यादा पार केली. जगात सर्वत्र अनलॉकिंग होत असल्यामुळे क्रूडसाठी असलेली मागणी वाढेल. त्यामुळे क्रूडचे दर US $ ७५ ते US $ ८० प्रती बॅरल च्या दरम्यान असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या क्रूडच्या दरातील वाढीमुळे ऑइल एक्सप्लोरेशन आणि क्रूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी येईल. तसेच क्रूड वाहून नेणाऱ्या पाईप आणि इतर मशीनरी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी येईल. उदा ONGC, OIL इंडिया., HOEC, सेलन एक्स्प्लोरेशन, जिंदाल ड्रिलिंग, अबन ऑफशोअर, वेदांत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज. सध्या या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव क्रूडच्या US $ ५० ते US $५५ प्रति बॅरल या भावावर आधारित आहेत.त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सचे रीरेटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .

कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया रेल्वेची जमीन ३५ वर्षांसाठी भाड्याने घेणार आहे. त्यासाठी Rs ३५०० कोटी अपफ्रंट पेमेंट रेल्वेला कंटेनर कॉर्पोरेशन करणार आहे. या जमिनीवर कंपनीचे २४ कंटेनर डेपो असतील. यामुळे कंटेनर कॉर्पोरेशन मधील विनिवेशाचा मार्ग सोपा होईल. सरकार या कंपनीमधील १०% स्टेक डायव्हेस्ट करणार आहे. कोविड १९ च्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये उपयुक्त असणाऱ्या शिपिंग कंटेनर्ससाठी मागणी वाढली. सध्या ह्या कंटेनर्सचे उत्पादन मुख्यतः चीनमध्ये होते. भारताची निर्यात प्रामुख्याने कंटेनराईझ्ड असल्यामुळे भारताला या शिपिंग कंटेनर्सची जरूर भासणार हे ओळखून सरकारने BHEL आणि BRAITHWATE या कंपन्यांना ‘आत्मनिर्भर भारत’ या कार्यक्रमाखाली प्त्येकी १००० शिपिंग कंटेनर्स उत्पादन करण्यासाठी ऑर्डर दिल्या. तसेच कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ चाही फायदा होईल. अशा प्रकारे कंटेनर कॉर्पोरेशनचा कारभार वाढेल.

ज्या लोकांनी दोन्ही वॅक्सीनचे डोस घेतले असतील त्यांना विमान प्रवासाकरता पुन्हा RTPCR टेस्ट करावी लागू नये असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर जुलै २०२१ पासून जगातील हवाई वाहतूक वाढेल. या अपेक्षेने आज प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. उदा इंडिगो आणि स्पाईस जेट.

DHFL या कंपनीसंबंधात पिरामल कॅपिटलने सादर केलेल्या रेझोल्यूशन प्लानला NCLT ने मंजुरी दिली. त्यामुळे या दोन्ही शेअर्समध्ये तेजी होती.

सरकार न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीमध्ये १०% विनिवेश सप्टेंबर २०२१ पूर्वी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांची निवड बँक खाजगीकरणाच्या कार्यक्रमासाठी होण्याची शक्यता आहे. तसेच सरकार बँक ऑफ इंडियामधील आपला स्टेक विकण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे या बँकांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

MRF या कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल लॉकडाउनच्या परिणामामुळे सर्वसाधारण होता. पण कंपनीने Rs ९४ प्रती शेअर अंतिम लाभांश आणि Rs ५० स्पेशल लाभांश म्हणून जाहीर केला.

सुंदरम क्लेटन या कंपनीने TVS मोटर्स मधील आपला ५% स्टेक विकला.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३२८ NSE निर्देशांक निफ्टी १५७५१ आणि बँक निफ्टी ३५४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.