आजचं मार्केट – ८ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ जून २०२१

आज जागतिक मार्केट्स मध्ये नरमी होती. क्रूड US $ ७१.४० प्रती बॅरल तर रुपया ७२.८३ च्या आसपास होते.
US $ निर्देशांक ९० तर USA मध्ये बॉण्ड यिल्ड १.५६ होते.

आज जागतिक मार्केट्स मध्ये नरमी होती. DOW मंदीत होते पण NASHDAQ ०.५% वर होते. NASHDAQ तेजीत असेल तेव्हा IT आणि TECH सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी असते. UN आणि इराण यांच्या होणाऱ्या आण्विक कराराकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कालच्या डेटाप्रमाणे DII ने चांगल्या प्रमाणावर खरेदी केली पण FII ने मात्र विक्री केली.

भारतात COVIDच्या केसेस वेगाने कमी होत आहेत. तसेच व्हॅक्सिनेशनचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मार्केटमध्ये एक आशादायक वातावरण होते. कोविडच्या केसेस कमी होत असल्याने काही अपवाद वगळता बहुतेक सर्व ठिकाणी अनलॉक होत आहे/ निर्बंध कमी केले जात आहे. त्यामुळे दुकाने हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक खुली झाल्यामुळे बिझिनेसमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होत आहेत.

रेझीन बॉन्डेड THIN व्हील्स वर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याची शक्यता आहे याचा फायदा कॉर्बोरॅन्डम युनिवर्सल आणि ग्राईंडवेल नॉर्टन या कंपन्यांना होईल.

टेक्शर्ड आणि टेम्पर्ड कोटेड आणि नॉन कोटेड ग्लासवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवली जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा बोरोसिल रिन्यूएबल्स या कंपनीला होईल.

आज IRCTC हा रेल्वेशी संबंधित शेअर तेजीत होता. कोविडच्या केसेस कमी झाल्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मे २०२१ मध्ये वाढली आहे. यांच्या पाठोपाठ रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे ऑनलाईन आरक्षण करणार्याची संख्या वाढेल. या ऑनलाईन बुकिंग मध्ये IRCTC चे मार्जिन चांगले आहे. रेल्वेचा आपल्या गाड्यांची संख्या वाढवण्याचा तसेच गाड्या ३०% प्रवासी क्षमतेऐवजी ५० %प्रवासी क्षमतेवर चालवण्याचा विचार चालू आहे. तसेच कॅटरिंग सेवा/रेलनीर सेवा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या सर्व गोष्टींचा फायदा IRCTC ला होईल.

श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी चा Rs ९०९ कोटींचा IPO १४ जूनला ओपन होऊन १६ जूनला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ३०३ ते Rs ३०६ आहे.मिनिमम लॉट ४५ शेअर्सचा आहे.ही कंपनी फेरोअलॉयज आणि लॉन्ग स्टील क्षेत्रातील मोठी उत्पादक आहे. या कंपनीचे ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये प्लांट आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस या कंपन्यांना IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली. वाडिया ग्रुप त्यांच्या ‘गो एअर’ या कंपनीचा IPO ऑगस्ट २०२१ मध्ये आणणार आहेत.

टू व्हीलर E -व्हेइकलला असलेली सबसिडी Rs १५००० पर्यंत वाढवली आणि सर्व E -व्हेइकल्सवर मिळणाऱ्या सबसिडीची मुदत २०२४ पर्यंत वाढवली. या आधी ही मुदत २०२२ मध्ये संपणार होती.याचा फायदा ग्रीव्हज कॉटन, JBM ऑटो, टाटा मोटर्स यांना होईल.

हेस्टर बायोचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ही कंपनी Rs ४० कोटी खर्च करून कोव्हॅक्सीनसाठी लागणाऱ्या ‘SUBSTANCE DRUGS’ बनवण्यासाठी युनिट चालू करणार आहे.

CEAT भारतात टायरच्या किमती ८% वाढवणार आहे.

युनियन बँक, (युनियन बँक NARCL ला Rs ७८०० कोटीची कर्ज विकणार आहे). टिटाघर वॅगन या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२२७५ NSE निर्देशांक निफ्टी १५७४० बँक निफ्टी ३५०८५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ८ जून २०२१

  1. Bhagyashree

    Thanks Madam. Ur blogs are very useful for beginners . For marathi people and particularly ladies can easily get knowledge of share market through ur blogs.
    God bless u always. Stay safe and healthy .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.