आजचं मार्केट – ९ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९०.१०, USA बॉण्ड यिल्ड १.५३, क्रूड US $ ७२.४० च्या आसपास तर PCR १.३० होते. US $ १= Rs ७२.९७ होता .

USA मध्ये होणार असलेली फेडची बैठक, यूरोपमधील ECB चा धोरणात्मक निर्णय आणि उद्या जाहीर होणारा महागाईचा डेटा याची मार्केट उत्सुकतेने वाट बघत आहे. चीन आणि USA मध्ये क्रूडसाठी असलेली मागणी वाढत आहे. तसे सामान्यपणे आता काही अपवाद वगळता सर्व जगात अनलॉक होत असल्यामुळे क्रूडसाठी असलेली मागणी वाढत आहे. भारतातही लॉक डाऊन असूनही डिझेल आणि पेट्रोलच्या किमती पुष्कळ वेळा वाढवाव्या लागल्या.

तसेच अनलॉक झाल्यामुळे उद्योग धंदे, दुकाने, हॉटेल्स आणि इतर बिझिनेस एस्टॅब्लिशमेंट्स ओपन झाल्यामुळे विजेसाठी असलेली मागणी जूनच्या पहिल्या आठवड्यात वाढली. विजेचा खप १२% ने वाढला. म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात वीज उत्पादन करणाऱ्या तसेच वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कर्ज देणाऱ्या कंपन्या तेजीत होत्या. उदा REC, PFC,NHPC, SJVN, PTC,NTPC, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील तर खाजगी क्षेत्रातील अडानी पॉवर, टॉरंट पॉवर आणि टाटा पॉवर या कंपन्या तेजीत होत्या.

अडाणी पॉवरचा शेअर आज तेजीत होता. विजेचा खप सामान्यतः अनलॉक आणि वाढलेला औद्योगिक कारभार यामुळे वाढला. राजस्थान आणि महाराष्ट्र राज्य सरकार कडून जे येणे बाकी होते ती पेमेंट मिळू लागली. त्यामुळे अडाणी पॉवरला कर्ज फेडता आले. अंदाजपत्रकात पॉवर डिस्ट्रिब्युशन क्षेत्रासाठी Rs ३ लाख कोटी अलॉट केले आहेत.

सरकारने सर्व पॉवर क्षेत्राशी संबंधीत असलेल्या संस्थांना पॉवरसप्लायच्या अभावी कुठलीही औद्योगिक प्लांट्स , रेल्वे इत्यादी सर्व क्षेत्रांना पुरेसा आणि अखंडित पॉवर सप्लाय होईल या साठी पुरेशी पॉवर जनरेशन क्षमता तयार करायला सांगितले आहे. त्यामुळे आज पॉवर क्षेत्रातील कंपन्या आणि विशेषतः अडानी पॉवरमध्ये लक्षणीय तेजी होती.अडानी पॉवरचे डीलीस्टिंग होणार होते ते आता रद्द झाले, ही ईष्ट आपत्तीच ठरली. आता जरी फ्रेश डीलीस्टिंग झाले तरी ते चढ्या भावाला होईल. अडानी पॉवरचा IPO २८ जुलै २००९ ते ३१ जुलै २००९ या वेळात Rs ९० ते Rs १०० या प्राईसबँडमध्ये आला होता. हे शेअर्स IPO मध्ये Rs १०० ला अलॉट झाले.

पुष्कळ काळापासून रेल्वे आपल्याला स्पेक्ट्रमची अलॉटमेंट व्हावी अशी सरकारला विनंती करत होती. आजच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये रेल्वेला स्पेक्ट्रम अलॉट करण्यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे आज रेल्वेशी संबंधीत कंपन्यांमध्ये विशेषतः रेलटेल राईट्स मध्ये तेजी होती.

अनलॉकमुळे आणि व्हॅक्सिनेशनमुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला चांगली मागणी आली. गती, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, ब्ल्यू डार्ट, एजिस लॉजिस्टिक्स, महिंद्रा लॉजिस्टिकस, पटेल इंटिग्रेटेड , या कंपन्यांमध्ये तेजी होती.

NFL, EIL, आणि FACT याचे जॉईंट व्हेंचर असलेली रामगुंडं या फर्टिलायझर कंपनीतील गुंतवणूक सरकार वाढवणार आहे.

सोना कोयो ( JTEKT) चे प्रमोटर आता सोना कॉमस्टार या कंपनीचा Rs ५५५० कोटींचा IPO १४जून २०२१ ते १६ जून २०२१ या कालावधीत आणत आहेत. या IPO चा प्राईस बँड Rs २८५ ते Rs २९१ असून मिनिमम लॉट ५१ शेअर्सचा असेल. या इशू मध्ये फ्रेश इशू RS ३०० कोटीचा असून Rs ५२५० कोटींची ऑफर फॉर सेल असेल. ही कंपनी ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि त्यांचे पार्टस यांचे डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय करणारी मोठी कंपनी आहे.

सरकार चीनमधून आयात होणाऱ्या पर्ल इंडस्ट्रियल पिगमेंट्सवर US $ २२४ प्रति टन ते US $ ५५०० प्रती टन एवढी ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावणार आहे. याचा फायदा सुदर्शन केमिकलला होईल.

रिलायन्सच्या पार्टली पेड शेअर्सचे ( पहिल्या कॉलच्या पेमेंट नंतर) उद्या रीलिस्टिंग होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१९४१ NSE निर्देशांक निफ्टी १५६३५ आणि बँक निफ्टी ३४८०० वर बन्द झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.