आजचं मार्केट – १० जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १० जून २०२१

आज US $ निर्देशांक ९०.१६ USA मधील बॉण्ड यिल्ड १.४८ % रुपया US $१= Rs ७३.०७आणि क्रूड US $ ७२.४८ प्रती बॅरल , PCR १.१२ आणि VIX १४.७५ च्या आसपास होते. USA मध्ये डाऊ जोन्स मंदीत होते. USA चे अध्यक्ष जो बिडेन यांनी टिकटॉक आणि व्ही चॅट वरील बंदी उठवली.

अडाणी गुपने त्यांचा एअरपोर्ट बिझिनेस अडाणी एंटरप्रायझेसमधून वेगळा काढण्यासाठी प्राथमिक बोलणी चालू केली आहेत या कंपनीचे नाव अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स असेल. आता अडाणी ग्रुप सहा एअरपोर्ट्सचे ( अहमदाबाद, लखनऊ,मंगलोर, जयपूर, गौहत्ती, थिरुवानंतपूरम) आधुनिकरण आणि ऑपरेशन आणि मुंबई एअरपोर्टचे व्यवस्थापन करतात. त्यांनी MIAL (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) मध्ये ७४% स्टेक खरेदी केला आहे. यामुळे नवी मुंबई एअरपोर्टची मालकी अडाणी ग्रुपकडे असेल. ही कंपनी एअरपोर्ट बिझिनेससाठी Rs १२००० कोटी भांडवल उभारणार आहे. या एअरपोर्ट युनिटला Rs ४१०० कोटींचे कर्ज आहे. आता कोरोनाच्या प्रभावामुळे एअरपोर्ट बिझिनेस अडचणीत आहे. त्यामुळे विमान प्रवास व्यवस्थित चालू झाल्यावर या कंपनीचा IPO आणण्यात येईल.

टीम लीज, बजाज हेल्थकेअर, मुंजाल ऑटो, गेल, इंडिया मेटल्स, स्टार सिमेंट,सेरा सॅनिटरी वेअर ( Rs १३ लाभांश), अंबिका कॉटन ( Rs ३५ लाभांश), माझगाव डॉक या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

गेलने आपला गॅस उत्पादन आणि मार्केटींग यांचा बिझिनेस वेगळा करण्याची योजना रहीत केली. आता गेल त्यांच्या पाइपलाईन्सचे मोनेटायझेशन करू शकेल.

झेन टेक्नॉलॉजीला एक मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. सरकारने जाहीर केलेल्या दोन नेगेटिव्ह लिस्ट मध्ये असलेली बहुतेक संरक्षण साधन सामुग्री ही कंपनी बनवते. त्यामुळे या गोष्टीची आयात थांबवण्याचा निर्णय झाल्यावर त्याचे उत्पादन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट झेन टेक्नॉलॉजीला मिळेल अशी अपेक्षा आहे.हे Rs १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट सिम्युलेटर्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. ही काँट्रॅक्टस आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत दिली जातील. यामुळे आज झेन टेक्नॉलॉजीचा शेअर तेजीत होता.

SBI कार्ड्सचा मार्केटशेअर लॉकडाऊनच्या काळातही कमी झाला नाही. डिजिटल कार्यक्रमाला सरकार प्रोत्साहन देत असल्यामुळे अनलॉक झाल्यावर या बिझिनेसमध्ये वाढ होईल. या अपेक्षेने हा शेअर वाढत होता.

आज मेडिया सेक्टरमध्ये तेजी होती. जागरण प्रकाशन, नेटवर्क १८, टीव्ही १८ ब्रॉडकास्ट, हाथवे, डेन नेटवर्क, इरॉस मल्टिमीडिया, टीव्ही टुडे, HT मेडिया या शेअर्समध्ये तेजी होती. अनलॉक होत असल्यामुळे बिझिनेस वाढेल ते जाहिरातींवर अधिक खर्च करतील आणि त्यामुळे मेडिया कंपन्यांचे जाहिरातींचे उत्पन्न वाढेल.

पुढील आठवड्यात एप्रिलमहिन्यासाठी IIP, मे २०२१ साठी CPI आणि WPI च्या येणाऱ्या आकड्यांवर मार्केटचे लक्ष असेल.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पार्टली पेड शेअर्सचे ( फर्स्ट कॉल नंतर) Rs १५७० वर लिस्टिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३०० NSE निर्देशांक निफ्टी १५७३७ आणि बँक निफ्टी ३५१३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.