आजचं मार्केट – १४ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १४ जून २०२१

आज क्रूड US $ ७२.७० प्रती बॅरल तर रुपया US $ १= Rs ७३.२७ च्या आसपास USA बॉण्ड यिल्ड १.४६ US $ निर्देशांक ९०.५० इंडिया विक्स १४.७१ होते.

USA फेडची मीटिंग चालू आहे त्यात काय निर्णय झाला हे गुरुवारी समजेल. इराण बरोबर चालू असलेल्या न्यूक्लिअर अग्रीमेंट संबंधित वाटाघाटीमध्ये फारशी प्रगती नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात क्रुडमध्ये तेजी असेल आणि ते US $ ८० प्रती बॅरल एवढे महाग होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आज भारतीय मार्केट ओपन झाले ते एक प्रकारचा धक्का घेऊनच. NSDL या डिपॉझिटरीने बेनेफिसिअल ओनरशिपविषयी समाधानकारक आणि पुरेशी माहिती दिली नाही म्हणून सेबीकडे फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणून रजिस्टर केलेल्या ALBULA इन्व्हेस्टमेंट फंड, CRESTA फंड आणि APMS इंव्हेजेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांना अडाणी एंटरप्रायझेस, अडानी ग्रीन एनर्जी, अडानी ट्रान्समीशन, अडानी टोटल गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी किंवा विक्री करण्यास मनाई केली. म्हणजेच या तीन फंडांचे DEMAT अकाउंट फ्रीझ केले. सेबीने नवीन KYC नियमांअंतर्गत शेअर्सची ‘कॉमन ओनरशिप’ तसेच महत्वाच्या कर्मचाऱयांची माहिती सादर करायला सांगितली होती. ही माहिती २०२० पर्यंत द्यायची होती. या तीन फंडांकडे मिळून वरील चार अडाणी ग्रुपच्या Rs ४३५०० कोटी किमतीच्या शेअर्सची मालकी आहे. हे फंड पोर्ट लुईस मधील एकाच पत्त्यावरून बिझिनेस करतात. आणि त्यांच्या स्वतःच्या वेबसाईट्स नाहीत.

त्याचप्रमाणे अडाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये ‘प्राईस मॅनिप्युलेशन’ झाले का याचीही सेबी वेगळी चौकशी करत आहे.अशी बातमी आली. कारण अडाणी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये खूपच वाढ झाली आहे. या बातमीमुळे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये लक्षणीय मंदी आली तर काही शेअर्सना लोअर सर्किट लागले पण दुपारी अडाणी ग्रुपकडून स्पष्टीकरण आले की रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्सनी असे स्पष्टीकरण दिले आहे की या तीन फंडांचे डिमॅट अकाउंट (ज्याच्यामध्ये या कंपन्यांचे शेअर्स होल्ड केले आहेत) फ्रीझ केलेले नाहीत. या स्पष्टीकरणानंतर अडाणी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स बरेच स्थिरावले. त्याशिवाय अडाणी ग्रुप आता सिमेंट क्षेत्रात पदार्पण करीत आहे अशी काहीशी सकारात्मक बातमी आली.
GST कॉऊन्सिलच्या बैठकीत कोविड संबंधी काही औषधे, काही वैद्यकीय उपकरणे तसेच म्युकरमायकोसिस वरील औषधांवरील GST चे दर कमी केले/किंवा GST च्या कक्षेतून बाहेर काढले. त्यामुळे ही औषधे किंवा उपकरणे उत्पादन करणाय्रा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली. BPL, मोरेपन लॅब, लिंडे इंडिया NURECCA USFDA ने ल्युपिन या कंपनीच्या सॉमरसेट, न्यू जर्सी प्लांट्सना वार्निंग लेटर इशू केले.

मरिना होल्डिंग्सने झेन्सार टेक्नॉलॉजी या कंपनीचे २.३ कोटी शेअर्स ब्लॉक डील च्या रुटने विकले. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मंदी आली.

सन टीव्हीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले सब्स्क्रिप्शन, ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यूत लक्षणीय वाढ झाली. पण कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केल्यामुळे शेअरहोल्डर्सची निराशा झाली.

IOB, कजरिया सिरॅमिक्स, ग्लोबस स्पिरिट्स, IDFC चे निकालही चांगले आले. BHEL आणि JK सिमेंट यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. कोल इंडियाचे प्रॉफिट थोडे कमी झाले. कंपनीने Rs ३.५० अंतिम लाभांश जाहीर केला.

जून महिन्यात VIX बर्याच प्रमाणात कमी झाले म्हणून मार्केटमधील वोलतालीटी काही प्रमाणात कमी झाली. पण आज मात्र VIX मध्ये वाढ झाली.

मे २०२१ महिन्यासाठी CPI ६.३०% ( एप्रिलमध्ये ४.२३% )एवढा आला. ही वाढ अन्नधान्य खाद्य तेले इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे झाली. मे २०२१ महिन्यासाठी WPI १२.९४% आले.

श्याम मेटॅलिक्स आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या IPO ना ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रीमियम मिळत आहे. पण सोना कॉमस्टार हा इशू FULLY प्राइस्ड असल्याने त्याला ग्रे मार्केटमध्ये थंडा प्रतिसाद मिळतो आहे.

या आठवड्यात चार IPO ओपन होऊन क्लोज होत आहेत. या IPO ला सबस्क्राईब करण्यासाठी सेकंडरी मार्केटमधून पैसा काढला जाणार असल्यामुळे या आठवड्यात प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५५१ NSE निर्देशांक निफ्टी १५८११ बँक निफ्टी ३४९५० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १४ जून २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.