आजचं मार्केट – १६ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ जून २०२१

आज क्रूड US $ ७४.०० प्रती बॅरल, रुपया US $ १= Rs ७३.३६, VIX १४.७५ च्या आसपास होते. PCR १.३८ तर US $ निर्देशांक ९०.५१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४९ होते.

USA मध्ये इन्फ्लेशन ५% पर्यंत वाढल्यामुळे आता फेड आपला ‘QUANTITATIVE EASING’ चा कार्यक्रम कमी करते का अर्थव्यवस्था पूर्व स्थितीला येईपर्यंत चालू ठेवते या कडे मार्केटचे लक्ष आहे.या संबंधित फेडचा निर्णय उद्या समजेल.
चीनने कमोडिटी आयात करण्यावर नियंत्रण ठेवायला सांगितले आहे. तसेच चीन स्वतःच्या मेटल्सचा रिझर्व्ह स्टॉक विक्रीसाठी काढणार आहे. उदा स्टील, कॉपर झिंक, अल्युमिनियम. या चीनच्या घोषणेनंतर सर्वे मेटल्सशी संबंधित शेअर्समध्ये मंदी आली.

ज्युबिलण्ट फार्मोवा ही कंपनी ‘OCUGEN’ च्या सहकार्याने USA आणि कॅनडा या मार्केटसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनचे उत्पादन करणार आहे.

LIC ने ल्युपिनमधील आपला स्टेक ४% वरून ६% पर्यंत वाढवला. तसेच LIC, LIC हौसिंग मध्ये आणखी ४.५४% स्टेक वाढवणार आहे.

आज शिपिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये म्हणजे G.E. शिपिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. कारण बाल्टिक ड्राय निर्देशांक १४% वाढला आहे. तसेच कंटेनरसाठी १६ दिवसांचे वेटिंग आहे आणि त्यासाठी प्रीमियमही द्यावा लागत आहे.

IFTRT ( इंडियन फौंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च अँड ट्रेनिंग) ने ट्रकचे भाडे १४% ने वाढवले. पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. याचा फायदा लॉजिस्टिक कंपन्या उदा महिंद्रा लॉजिस्टिक्स, गती, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच या कंपन्यांना फायनान्स करणाऱ्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी सारख्या कंपन्यांना होईल.
धूनसेरी टी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २३ जून २०२१ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

सोने विकताना हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची मुदत १६ जून २०२१ पासून ३१ ऑगस्ट पर्यंत २०२१पर्यंत वाढवली. ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर Rs ४० लाखापर्यंत आहे अशा ट्रेडर्सना अनिवार्य हालमार्किंग मधून सूट दिली. ज्या २५६ जिल्ह्यांमध्ये
हॉलमार्किंग सेंटर्स आहेत तेथे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. अशी सेंटर्स उभारण्यासाठी सरकार सबसिडी देणार आहे. कुंदन ,जडाववाल्या दागिन्यांना हॉलमार्किंगची जरूर नाही. जुन्या दागिन्यांना हॉलमार्किंगची जरूर नाही. हॉलमार्किंग झालेल्या सोन्यावर BIS असा स्टॅम्प असेल. सध्या फक्त ३०% सोन्याची विक्री हॉलमार्किंग झाल्यावर होते.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने P &K फर्टिलायझर्सवरील सबसिडी Rs १४७७५ कोटींनी वाढवली. यापैकी NPK फर्टिलायझर्ससाठी Rs ५६५० कोटी तर DAP साठी Rs ९१२५ कोटी सबसिडी वाढवली यामुळे आता खतउत्पादनाची कॉस्ट वाढली असली तरी खताच्या किमती वाढणार नाहीत / कमी वाढतील. याचा फायदा RCF, मद्रास फर्टिलायझर्स, चंबळ फर्टिलायझर्स, NFL आणि दीपक फर्टिलायझर या कंपन्यांना होईल. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

वेदांताने व्हिडिओकॉनसाठी सादर केलेली रेझोल्यूशन बीड मंजूर झाली. त्यामुळे आता वेदांताला रावा ऑइलफिल्डमध्ये २५% पार्टीसिपेटींग इंटरेस्ट मिळेल. व्हिडिओकॉन ग्रुपमध्ये १३ कंपन्या आहेत. या कंपन्या आता ट्वीन स्टार टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मालकीच्या होतील. याशिवाय व्हिडिओकॉन ग्रुप इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, मध्ये असल्याने ऍसेट बेस डायव्हर्सिफाइड होईल. रावा ऑइलफिल्डसमध्ये केर्नकडे २२.५% ONGC कडे ४०%, व्हिडिओकॉनकडे २५% तर रावा ऑईलकडे १२.५% ओनरशिप आहे. व्हिडिओकॉनच्या अक्विझिशननंतर वेदांताचा रावा ऑइलफिल्डमधील इंटरेस्ट दुप्पट होईल. यासाठी वेदांताला US $ ४०मिलियन अपफ्रंट द्यायचे आहेत. ही रक्कम टोटल बीडच्या १०% पेक्षा कमी आहे. उरलेली रक्कम २ वर्षांनंतर द्यायची आहे.

पिरामल ग्रुपने केलेल्या DHFL च्या रेझोल्यूशन बीड प्रमाणे पिरामल ग्रुप प्रथम DHFL च्या शेअर्सचे डीलीस्टिंग करून ती पिरामल कॅपिटल हौसिंग फायनान्स मध्ये मर्ज करणार आहे. या रेझोल्यूशन बीड मध्ये DHFL शेअरहोल्डर्ससाठी कोणतीही तरतूद/ऑफर केलेली नाही. NCLT च्या मंजुरीनंतर हे डीलीस्टिंग होत असल्यामुळे DHFL च्या शेअरहोल्डरसाठी कुठलीही ऑफर किंवा तरतूद या प्लानमध्ये नाही. त्यामुळे DHFL च्या शेअरहोल्डर्सना या डीलीस्टिंग मधून काहीही मिळणार नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५०१ NSE निर्देशांक निफ्टी १५७६७ बँक निफ्टी ३५००३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.