आजचं मार्केट – १७ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ जून २०२१

आज क्रूड US $ ७४.०५ प्रती बॅरल रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९१.४५ US बॉण्ड यिल्ड १.५८ VIX १४.८० ते १५.३१ दरम्यान होते. PCR १.०५ होते.

आज USA फेड ने आपले निर्णय जाहीर केले. त्यांनी व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. व्याज दर ०.००% ते ०.२५% च्या दरम्यान राहतील असे सांगितले. त्यांनी सांगितले की आम्ही २०२३ वर्षात व्याज दर २ वेळा वाढवू. आतापर्यंत त्यांनी सांगितले होते की आम्ही २०२४ पर्यंत व्याज दरात बदल करणार नाही.

फेडने सांगितले की आम्ही QUANTATIVE EASING अंतर्गत दर महिन्याला US $ १२० बिलियनचे ऍसेट खरेदी करू.
त्यांनी महागाईचे लक्ष्य २.४% वरून ३.४% केले. GDP ग्रोथ ६.५ %ऐवजी ७% राहील असे अनुमान केले. या फेडच्या घोषणेनंतर US $ निर्देशांक आणि US बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाली. फेडने महागाई नियंत्रित करण्याऐवजी GDP ग्रोथला प्राधान्य दिले असे दिसते आहे. फेडच्या या निर्णयाचे पडसाद USA तसेच जगाच्या अन्य मार्केट्समध्ये उमटले. जागतिक मार्केट काही काळ मंदीत गेली.

आज भारतीय मार्केटमध्ये मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजित होते. उदा युनायटेड स्पिरिट्स, ग्लोबस स्पिरिट्स, रॅडिको खेतान, तसेच सिमेंट, IT, ज्युवेलरी, FMCG आणि फर्टिलायझर क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. आज मेटल्स संबंधित शेअर्स मंदीत होते.

CESC या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने आपल्या एका शेअरचे १० शेअरमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घोषित केला.

वेल स्पन इंडियाचे निकाल असमाधानकारक होते.

फेडरल बँक Rs ९१६.२५ कोटी वर्ल्ड बँक किंवा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला शेअर्स इशू करून उभारणार आहे. Rs ४००० कोटी इक्विटी आणि इतर इन्स्ट्रुमेंट्स दवारा उभारणार आहे. Rs ८००० कोटी भारतीय किंवा परदेशी चलनातील बॉण्ड्सच्या दवारा उभारणार आहे.

नाथ बायो ही कंपनी २४ जून २०२१ रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल, शेअर बायबॅक आणि लाभांशावर विचार करणार आहे
KEC इंटरनॅशनल या कंपनीला रेल्वेकडून Rs ९३७ कोटींची ऑर्डर मिळाली.

L & T इन्फोटेक ही कंपनी ‘CUE LOGIC टेकनॉलॉजि’ या डिजिटल इंजिनीअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रातील कंपनीला US $ ८.४ मिलियन ( Rs ६१.६ कोटींना) खरेदी करणार आहे.

TTK प्रेस्टिज या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले आणि कंपनीने Rs ३० प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

फार्म Easy ही कंपनी थायरोकेअर या कंपनीला Rs ७००० कोटींना खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे.

PUBLISHMEमध्ये नजारा टेकनॉलॉजी ही कंपनी मोठा स्टेक खरेदी करणार आहे. हिमाद्री केमिकल्स या कंपनीचा टेस्ला या USA मधील कंपनीबरोबर करार झाल्याच्या बातमीचा हिमाद्री केमिकल्स ने इन्कार केला.

आज टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की ट्रक टायर आणि इतर टायरच्या किमती ४% ते ५% ने वाढू शकतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३२३ NSE निर्देशांक निफ्टी १५६९१ बँक निफ्टी ३४६०५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.