Monthly Archives: July 2021

आजचं मार्केट – ३० जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० जुलै २०२१

आज क्रूड US $ ७५.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९१.८५ USA १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड १.२४ VIX १२.८० PCR १.२८ होते.

अमेझॉनचे निकाल असमाधानकारक आले. आरसेलर मित्तलचे निकाल चांगले आले. USA च्या अर्थव्यवस्थेचा GDP ग्रोथ रेट ६.५% आला. म्हणजेच २% कमी आला .

आज चीनने काही प्रमुख फर्टिलायझर कंपन्यांना फर्टिलायझर्सची निर्यात तात्पुरती थांबवायला सांगितली. चीनमधील फर्टीलायझरचा साठा पुरेसा झाल्यावर पुन्हा खतांच्या निर्यातीला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे यामुळे भारतीय खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची निर्यात वाढेल आणि त्यांना फायदा होईल. म्हणून RCF FACT चंबळ कोरोमंडल NFL GNFC GSFC या आणि इतर खतउत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

देवयानी इंटरनॅशनल या कंपनीचा IPO ४ ऑगस्ट २०२१ ला ओपन होऊन ६ ऑगस्ट २०२१ ला बंद होईल. ह्या IPO चा प्राईस बँड Rs ८६ ते Rs ९० असून मिनिमम लॉट १६५ शेअर्सचा आहे.ही कंपनी KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी यांची फ्रँचाइजी आहे.

EXXARO टाईल्स या व्हिट्रीफाईड टाईल्स बनवणाऱ्या कंपनीचा Rs १६१ कोटींचा IPO ४ ऑगस्ट २०२१ ला ओपन होऊन ६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ११८ ते Rs १२० आहे. ही कंपनी २७ राज्यातील २००० डिलर्समार्फत बिझिनेस करते तसेच १२ देशात निर्यात करते. इशू प्रोसिड्सपैकी Rs ५० कोटी कर्ज फेडण्यासाठी आणि Rs ४५ कोटी वर्किंग कॅपिटलसाठी उपयोगांत आणले जातील.

ASTRAL पॉली आणि स्ट्राइड्स फार्मा या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश F & O सेगमेंटमध्ये आजपासून केल्यामुळे आता F & O सेगमेंट मध्ये TRADE होत असलेल्या शेअर्सची संख्या १६३ झाली.

R सिस्टीम इंटरनॅशनल ६ ऑगस्ट रोजी शेअर बायबॅकवर विचार करणार आहे.म्हणून हा शेअर तेजीत होता.

ल्युपिन या कंपनीने SOUTHERN CROSS PHARMA ही कंपनी अकवायर केली.

झायडस कॅडीला या कंपनीला ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट ड्रग साठी USFDA कडून परवानगी मिळाली.

SAIL ही कंपनी लॉन्ग, फ्लॅट प्रोडक्टसच्या किंमत Rs १००० प्रती टन एवढी वाढवणार आहे. मेटल्समध्ये कार्टलायझेशन सुरु असल्याने, याबाबतीत चौकशी करण्याची कंपन्यांनी CCI ला सूचना केली आहे

DANA इनकॉर्पोरेटेड ह्या DRIVETRAIN आणि E-प्रोपुलसिओन सिस्टीम साठी जगात अग्रेसर असलेल्या कंपनीने स्विच मोबिलिटी .या अशोक लेलँडच्या इलेक्ट्रिक व्हेईकल सबसिडीअरी मध्ये १% स्टेक US $१८ मिलियनला खरेदी केला. यामुळे अशोक लेलँडच्या शेअरमध्ये तेजी होती.

सतलज टेक्सटाईल्स ( तोट्यातून फायद्यात), NIIT ( PIM वाढले) RPG लाईफ, लालपाथ लॅब ( PIM वाढले), IOC (PIM वाढले, GRM US $ ६.५८/bbl ) , सन फार्मा ( तोट्यातून फायद्यात), कन्साई नेरोलॅक, AB फॅशन रिटेल, बंधन बँक, सुंदरम क्लेटन, मेरिको, TVS मोटर्स, असाही इंडिया यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५८६ NSE निर्देशांक निफ्टी १५७६३ बँक निफ्टी ३४५८४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७५ प्रती लिटरच्या आसपास तर रुपया US $१ = Rs ७४ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.३२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX १३ च्या आसपास आणि PCR ०.९१ होते.

फेडने त्यांच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. व्याजदर ०.०० ते ०.२५% या दरम्यान ठेवला. कोरोनाचे जे वेगवेगळे व्हरायंटच येत आहे त्यांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. प्रत्येक व्यवस्थेत सुधारणा होत आहे पण सुधारणा होण्याचा वेग कमी आहे. . बॉण्ड खरेदीविषयी कोणताही विचार किंवा योजनेत फरक व्यक्त केला नाही.

चींन १ ऑगस्ट २०२१ पासून त्यांच्या देशातून निर्यात होणाऱ्या स्टीलच्या काही प्रकारांवर निर्यात ड्युटी वाढवणार आहे. त्यामुळे आता चीनमधून येणारे स्टिल महाग होईल.त्यामुळे स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या तेजीत होत्या.चीनमध्ये आता स्टील निर्यात करणाऱ्या कंपन्यांना इन्सेंटिव्हज देणार नाही उलट या कंपन्या स्टीलचे उत्पादन कमी करतील यासाठी उपाय योजले जातील यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये स्टीलच्या किमती वाढतील आणि भारताकडून निर्यात वाढेल. उदा टाटा स्टील, JSW स्टील पण मारुती, आणि ऑटो क्षेत्रातले कंपन्यांच्या उत्पादनाची कॉस्ट वाढेल. त्यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स मंदीत होते.

कॉग्निझंट या IT क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीचे निकाल चांगले आले आणि त्यांनी फ्युचर गायडन्स चांगला दिला. मिडकॅप IT कंपन्यांचे निकाल लार्जकॅप IT कंपन्यांपेक्षा चांगले येत आहेत त्यामुळे मिडकॅप IT कंपन्यांमध्ये तेजी होती . उदा कोफोर्ज, माईंड ट्री, पर्सिस्टंट सिस्टिम्स, सोनाटा सॉफ्टवेअर, टेकमहिन्द्र

अल्केम लॅब या कंपनीच्या तळोजा युनिटची तपासणी USFDA कडून २६ जुलै ते २८ जुलै २०२१ या दरम्यान झाली होती.या युनिटला क्लीन चिट दिली.

MTNL आणि BSNL च्या अनुक्रमे २ आणि ४ मालमत्ता सरकार विकणार आहे त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.
साखरेच्या निर्यातीवर Rs ३.५० प्रती किलो सबसिडी देण्याचा खाद्य मंत्रालय विचार करत आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

बलरामपूर चिनी या कंपनीची ८ ऑगस्ट २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
महिंद्रा हॉलीडेजनी बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ २ शेअर्स असले तर १ बोनस शेअर मिळेल.

आज पेपर शेअर्समध्ये तेजी होती कारण पेपरचे भाव वाढत आहेत. अर्थव्यवस्था ओपन होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. सरकारचा शिक्षणावरचा खर्च वाढला आहे. चीनमध्ये पेपरच्या किमती वाढल्या. ऑफिस आणि शैक्षणिक संस्था ओपन होत असल्यामुळे लिहिण्यासाठी आणि छपाईसाठी लागणाऱ्या पेपरची मागणी वाढेल. USA कॅनडा येथील जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे लंबरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे JK पेपर, स्टार पेपर NR अगरवाल, पदमजी पेपर. आणि इतर पेपर उत्पादक कंपन्यांमध्ये तेजी होती.

टाटा सन्स तेजस नेटवर्क मध्ये ६३.१% स्टेक घेणार आहे. त्यामुळे टाटा ग्रुपला 4G आणि 5G च्या क्षेत्रात प्रवेश मिळेल. ४३.३५ % स्टेक साठी Rs १८५० कोटी तेजस नेटवर्कला दिले जातील. Rs ५.१३ कोटींची वॉरंटस इशू केली जातील. आणि Rs २५८ प्रती शेअर या भावाने २६% स्टेक साठी ओपन ऑफर आणली जाईल. हा सर्व व्यवहार PANATONE इन्व्हेस्टमेंट च्या मार्फत होणार आहे.

तत्व चिंतन फार्माचे BSE आणि NSE वर Rs २१११.८० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १०८३ ला दिला असल्यामुळे ज्यांना हे शेअर्स अलॉट झाले त्यांना खूपच चांगला लिस्टिंग गेन झाला. शेअर नंतर Rs २३५० पर्यंत वाढला.
द्वारिकेश शुगरचे निकाल ठीक होती. LIC हौसिंग कॉर्पोरेशन आणि G. E. शिपिंग चे निकाल असमाधानकारक होते. मारुतीचे पहिल्या तिमाहीत निकाल कमजोर होते. .

नॉवेलीसने स्ट्रॉंग गायडन्स दिल्यामुळे आज हिंदाल्को च्या शेअर मध्ये तेजी होती.

टेकमहिन्द्र, युनियन बँक ( प्रॉफिट NII मध्ये वाढ NPA कमी झाले), पंजाब अँड सिंध बॅन्क, पॉली मेडिक्युअर, एरिस लाईफसायन्सेस ( Rs ६.०१ लाभांश जाहीर केला), GHCL,, PVR लॉरस लॅब्स, प्रीस्झ्म जॉन्सन, कोलगेट (PIM ( प्रॉफिट इन्कम मार्जिन वाढले), वर्धमान टेक्सटाईल्स,( तोट्यातून फायद्यात आली. ), मोल्डटेक पॅकेजिंग या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSW एनर्जी ह्या कंपनीने ग्रीन हायड्रोजन साठी ऑस्ट्रेलियन कंपनी FORTESCUE फ्युचर बरोबर केला.
ग्लेनमार्क लाईफसायन्सेसचा IPO ३१ वेळा सबस्क्राईब झाला.

आज जुलै २०२१ महिन्याची एक्स्पायरी होते. ही एक्स्पायरी सकारात्मक भूमिकेतून झाली. मेटल, पेपर, साखर, शैक्षणिक क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२६५३ NSE निर्देशांक निफ्टी १५७७८ बँक निफ्टी ३४६९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७४.७५ च्या आसपास रुपया US $१= Rs ७४.३० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९२.५२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२५ VIX १५.१४ PCR ०.७४ होते.

USA मधील ब्ल्यू चिप निर्देशांक घसरला. गोल्डन ड्रॅगन निर्देशांक पडला. USA मधील कंपन्या GE आणि ३M ने प्रॉफिट वॉर्निंग दिली.

चीनच्या सरकारने हौसिंग, मेडिकल आणि शिक्षण या क्षेत्रात मोठे धोरणात्मक बदल सुचवले आहेत. देशाचे, नागरिकांचे हित लक्षात घेऊन उद्योगांनी आपले उद्योग करावेत. सरकारच्या खाजगी उद्योगक्षेत्रात होणाऱ्या हस्तक्षेपाला घाबरून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले. चीनच्या या धोरणात्मक बदलाचा परिणाम भारतातील मार्केट्सवर झाला आणि मंदी आली

इंडिगोचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. लॉसेस ओळीने गेल्या सहा तिमाहीत वाढत आहेत. प्रती किलोमीटर यिल्ड कमी होत आहे.

इंडसइंड बँकेचे निकाल असमाधानकारक होते. बँकांचे निकाल असे दर्शवतात की डिपॉझिट्स वाढत आहेत. पण ऍडव्हान्सेसमध्ये मात्र ग्रोथ दिसत नाही. स्लीपेजिस दर तिमाही वाढत आहेत. त्यामुळे प्रोव्हिजन वाढवावी लागत आहे.
गोदावरी पॉवर आणि इस्पात, हेरिटेज फूड्स ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले मार्जिन कमी झाले.), सेंच्युरी टेक्सटाईल्स ( तोट्यातून फायद्यात, प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले. ) SRF (PIM वाढले, Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला), उषा मार्टिन,टाटा कॉफी ( कंपनीने Rs १.०२ कोटी वन टाइम लॉस बुक केला.), ग्राईंडवेल नॉर्टन ( PIM वाढले), जिओजित फायनान्सियल्स (PIM वाढले ), नेस्ले, IDBI बँक (NII, प्रॉफिट वाढले पण GNPA आणि प्रोव्हिजन वाढली.) या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

सरकारने DICGC ( डिपॉझिट इन्शुअरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन )ऍक्ट आणि जनरल इन्शुअरन्स ऍक्ट यांच्या मध्ये महत्वाचे बदल केले. आता बंद पडलेल्या बँकेच्या डिपॉझिटर्सना ९० दिवसाच्याआत Rs ५ लाखापर्यंचे डिपॉझिट परत मिळेल. GIC कायद्यात खाजगीकरण सोपे होईल असे बदल करण्यात आले.

भारती एअरटेल या कंपनीने आता पोस्टपेड बरोबरच प्रीपेड टॅरीफ वाढवली आता किमान प्लॅन Rs ७९चा असेल. यामुळे भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी आली.

येस बँकेने इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स बरोबर कोलेन्डिंगसाठी करार केला.

MCGM( मेट्रोपॉलिटन कॉऊन्सिल ऑफ ग्रेटर मुंबई) कडून सेंच्युरी टेक्सटाइल्सच्या वरळी येथील फॅक्टरीच्या जमिनीवर मोठ्या रियल इस्टेट प्रोजेक्टसाठी मंजुरी मिळाली. IOD (इन्टिमेशन ऑफ डिस अप्रूव्हल) मंजुरी दिली.

CYIENT ही IT क्षेत्रातील कंपनी ‘वर्कफोर्स डेल्टा’ या कंपनीत १००% स्टेक घेणार आहे.

महिंद्रा लाईफ स्पेसेस या कंपनीने तुमच्या जवळील १ शेअर्ससाठी २ बोनस शेअर्स इशू करण्याची घोषणा केली.

कालचा निफ्टी क्लोज भाव १५७४६ वरून आज निफ्टी १५७६१ला ओपन झाला. तो १५७६७ पर्यंत गेला.आणि नंतर मार्केट जोरदार पडू लागले आणि निफ्टीने १५५१३ हा लो पाईंट गाठला. या स्तरावरून मात्र बुल्सनी जोरदार मुसंडी मारली. मार्केट जवळजवळ ८०% ते ८५ % सुधारले आणि १५७०९ वर बंद झाले. या चढाओढीमध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला. पण अजूनही ऍडव्हान्स डिक्लाईन रेशियो मात्र बेअर्सच्या बाजूनेच झुकलेला आहे. कोणीही शॉर्ट करु नये. निफ्टी १५५५० ते निफ्टी १५९५० ही मार्केटची रेंज आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२४४३ NSE निर्देशांक निफ्टी १५७०९ बँक निफ्टी ३४५३२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ७४.४० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.५७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२८ VIX १३.३३ PCR ०.७२ होता.

USA मध्ये न्यू होम विक्री ६% ने कमी झाली. FOMC ची मीटिंग संपल्यावर बॉण्ड्स खरेदी कमी करणार का ?करणार असाल तर कधीपासून आणि किती हे सगळ्या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष पॉवेल यांच्या तोंडून ऐकावयाचे आहे.
चीनने टेक कंपन्यांवर बरीचशी नियंत्रणे घातली आहेत. त्यामुळे ज्या चिनी कंपन्या परदेशात स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होतात त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी आली..

DLF या रिअल्टी क्षेत्रातील कंपनीचे निकाल चांगले आले. ही कंपनी प्रिमियम हौसिंगच्या क्षेत्रात आहे. अफोर्डेबल हौसिंगसाठी सरकारकडून सबसिडी मिळते. पण प्रीमियम हाऊसिंगसाठी हे सबसिडी उपलध नाही. याचा विचार करता DLF चे निकाल चांगले आहेत .

वोल्टासने टाटा पॉवरबरोबर करार केला. जे कोणी टाटा पॉवर वापरतात त्यांना वोल्टस AC वर ४०% डिस्काउंट देणार आहे. ही सवलत फक्त दिल्लीमध्येच उपलब्ध आहे.

ग्लेनमार्कलाईफ सायन्सेसने जे कर्ज घेतले होते ते ग्लेनमार्क फार्माकडूनच घेतले होते हे कर्ज IPO च्या प्रोसिड्स मधून फेडले जाणार आहे. त्यामुळे दोघांसाठीही ही विन विन परिस्थिती आहे. कदाचित शिल्पा मेडिकेअरच्या शेअरमध्ये तेजी येईल कारण PE रेशियोनुसार शिल्पा मेडिकेअरचा शेअर स्वस्त आहे.

असोसिएटेड अल्कोहोल, GM ब्रुअरीज, KPIT कमिन्स (या कंपनीने फ्युचर गायडन्स वाढवला.) आलेम्बिक फार्मा ( फ्युचर गायडन्स कमी केला), TTK प्रेस्टिज ( चांगला प्रॉफिट इनकम मार्जिन वाढले), अपार इंडस्ट्रीज ( तोट्यातून फायद्यात आली). रामको सिमेंट, शारदा क्रॉपकेम, भारत सीट्स ( तोट्यातून फायद्यात उत्पन्न वाढले.), महिंद्रा लॉजिस्टिक (तोट्यातून फायद्यात आली), डिक्सन टेक्नॉलॉजी, जय भारत मारुती( तोट्यातून फायद्यात आली) KPR MILLS ( निकाल चांगले १ शेअर ५ शेअर्समध्ये स्प्लिट करण्यासाठी बोर्डाने मंजुरी दिली), कॅनरा बँक, यूको बँक या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

DR रेडिजचे निकाल मात्र असमाधान कारक होते. ऑपरेटिंग मार्जिन २५.३४% वरून १४.८६% झाले. USA मधील बिझिनेसमध्ये फारशी ग्रोथ झाली नाही. त्यामुळे DR रेडिजचा शेअर तर पडलाच पण त्याचा इफेक्ट इतर फार्मा कंपन्यांवर होऊन फार्मा कंपन्यांमध्ये मंदी आली.

APL अपोलो ट्यूब्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बोनस इशूवर विचार करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२१ रोजी बैठक आहे.

टेलिकॉम उपकरणांची ती सिस्टिममध्ये बसवण्याआधी लॅब मध्ये स्पायवेअर मालवेअर आणि बाबींसाठी तपासणी करणे अनिवार्य असेल. सरकारप्रमाणित तसेच कंपन्यांचे सेल्फ सर्टिफिकेशन असणे जरुरीचे आहे.

ABB इंडिया आपला मेकॅनिकल पॉवर TRA डिव्हिजन US $ २९० कोटींना RBC बेअरिंग या कंपनीला विकणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे रिकॅपिटलायझेशन दुसरी तिमाही संपल्यानंतर विचारात घेतले जाईल. डिसेंबर २०२१मध्ये जर कुठल्या बँकेत कॅपिटलची जरुरी भासली तर त्या बँकेला कॅपिटल पुरवले जाईल. त्यामुळे PSB च्या शेअरमध्ये मंदी आली.

एप्रिल २०२१ ते जून २०२१ या तिमाहीत प्रत्यक्ष कराची वसुली Rs २.४७ लाच कोटी एवढी झाली.

स्माल फायनान्स बँक सुरु झाल्यापासून ५ वर्षाच्या आत प्रमोटर्सचा सबसिडीअरीतील स्टेक ४०% पर्यंत कमी करावा लागतो. ३० जून २०२१ पर्यंत इक्विटास होल्डिंग लिमिटडचा

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये ८१.७५% स्टेक होता. इक्विटास होल्डिंग लिमिटेडच्या शेअरहोल्डरला त्याच्या जवळ असलेल्या १०० शेअर्ससाठी इक्विटास स्माल फायनान्स बँकेचे २२६ शेअर्स मिळतील. त्यामुळे आज या शेअरमध्ये तेजी होती.

हुडको या कंपनीमधील आपला ८% स्टेक सरकार Rs ४५ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने १६.०१ कोटी शेअर्स विकून Rs ७२० कोटी उभारणार आहे. सरकार प्रथम ११.०१ कोटी शेअर्स विकेल आणि प्रतिसाद चांगला असला तर आणखी ५ कोटी शेअर विकेल.रिटेल गुंतवणूकदारांसाठी ही OFS २८ जुलै रोजी ओपन असेल.

सरकार SJVN मधील १०% स्टेक विकणार आहे

विनंती ऑर्गनिक्स ने पुरामुळे महाड येथील युनिट बंद केले आहे.

चीन आणि कोरियातून आयात होणाऱ्या रबर केमिकल्सवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाण्याची शक्यता आहे.
ब्राझीलमध्ये थंडी आणि दुष्काळामुळे आणि कोलंबिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये बंदरातून शिपमेंट उशीर होत असल्यामुळे आज कॉफीउत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. CCL प्रॉडक्टस, टाटा कॉफी, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग, नेस्ले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५७८ NSE निर्देशांक निफ्टी १५७४६ बँक निफ्टी ३४७९७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.४०च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.९५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX १२च्या आसपास तर PCR ०.९७ होते.

चीन , हाँगकाँग आणि इतर एशियन मार्केट्स मंदीत होती. कार्बन एमिशन वाढल्यामुळे चीनने स्टीलचे उत्पादन कमी करायचे ठरवले आहे. तसेच चीन क्रिप्टो करन्सी पूर्णतः बंद करणार आहे. शैक्षणिक धोरण बदलणार आहे. FOMC ची मीटिंग दोन दिवस चालणार आहे. स्टिम्युलस टेम्परिंग करणे जरुरीचे आहे आणि असेल तर तेव्हा करायचे हा मुख्य विषय चर्चेत असेल.

वाढणारी महागाई आणि डेल्टा प्लेस व्हरायन्टच्या संसर्गामुळे ३ री लाट येण्याची भीती सोडल्यास .आता अर्थव्यवस्थेचे चक्र हळू हळू पूर्व पदावर येत आहे. पहिल्या तिमाहीचे कॉर्पोरेट निकाल एखाददुसरा अपवाद वगळता अतिशय चांगले येत आहे. एवढेच नव्हे तर ज्या कंपन्या भविष्यासाठी गायडन्स देतात त्यांचा सूरही आशावादी आहे.

HDFC बँकेपेक्षा ICICI बँकेचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

ITC चे निकाल चांगले आले. सिगारेट व्हॉल्युम पूर्व कोविड स्तरावर आले. महागाई आणि वाढणारी कॉस्ट हा एकच प्रॉब्लेम ITC ला आहे.

स्पोर्टकिंग, जिंदाल ड्रिलिंग, इंडियन मेटल, कॉरोमॉन्डल, फिलिप्स कार्बन GNA ऍक्सल, नवीन फ्ल्युओरीन, कोटक महिंद्रा बँक ( NII आणि प्रॉफिट थोडे वाढले पण NPA ची स्थिती खराब झाली.) किर्लोस्कर फेरस ( तोट्यातून फायद्यात),

अलेम्बिक फार्मा (फायदा कमी झाला),फिनोटेक्स, मिर्झा, उदयपूर सिमेंट, वेदांता ( उत्पन्न वाढले. Rs १३० कोटींचा वन टाइम लॉस झाला.), SBI लाईफ, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

M & M फायनान्स या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होत. NPA वाढले.

आयकर खात्याची धाड पडली म्हणून DB कॉर्पचा शेअर पडला.

IDBI बँकेच्या खरेदीदारासाठी काही रेग्युलेटरी नियमातून सूट द्यावी का ही चर्चा RBI आणि सरकारमध्ये सुरु आहे. म्हणून IDBI बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

सरकारने ऑक्सिमीटर, ब्लडप्रेशर मॉनिटरिंग मशीन, डिजिटल थर्मोमीटर, नेब्युलायझर, ग्लुकोमीटर यांच्या किमती फिक्स केल्या.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेने Rs ८०० कोटींच्या IPO साठी अर्ज केला.

SRF आणि लारस लॅब्स या कंपन्यांचा MSCI निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे. रोलेक्स रिंग्स या कंपनीचा Rs ७३१ कोटींचा IPO २८ जुलै २०२१ रोजी ओपन होऊन ३० जुलै रोजी बंद होईल. याचा प्राईस बंद Rs ८८० ते Rs ९०० असून मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे. ही कंपनी भारतातील टॉप ५ फोर्जिंग कंपन्यांपैकी एक आहे. हॉट रोल्ड फोर्ज्ड आणि MASHINED बेअरिंग रिंग्स बनवते. टू व्हीलर, पॅसेंजर व्हेईकल, कमर्शियल व्हेईकल, EV जना कंपोनंट पुरवते. रिन्यूएबल एनर्जेमध्येही प्रवेश करणार आहे.या IPO ची अलॉटमेंट ४ ऑगस्ट २०२१ रोजी होईल आणि लिस्टिंग ९ ऑगस्टला होईल अशी शक्यता आहे.

मजेस्को K2V2या कंपनीतील ५१% स्टेक Rs ४० कोटींना घेणार आहे. त्यामुळे हा शेअर तेजीत होता
सध्या टेक्सटाईल सेक्टरला निर्यातीसाठी, उत्पादनासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.तसेच अनलॉकच्या प्रक्रियेमुळे टेक्सटाईल्स साठी मागणी येईल असा अंदाज आहे. रूपा, लक्स, डॉलर, लव्हेबल लिंगरीज, डॉनिअर, DCM श्रीराम, सियाराम, वर्धमान, नहार स्पिनिंग अमरज्योती स्पिनिंग, DCM NOVVELLE, नितीन स्पिनर्स, RSWM, दीपक स्पिनर्स, अंबिका कॉटन, रेमंड , बॉम्बे डाईंग, वेलस्पन, ट्रायडंट, या काही कंपन्या आहेत. यांच्या शेअरचा नीट अभ्यास करून शेअर्स गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यासाठी घ्यायचे याचा निर्णय घ्यावा.

टाटा ग्रुपची कंपनी नेल्को ही कॅनडामधील सॅटॅलाइट कम्युनिकेशन सर्विसेस प्रोवाइड करणाऱ्या ‘TELESAT’या कंपनीच्या सहकार्याने सॅटेलाईट ब्रॉडबँड मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. ही सेवा TELESAT च्या LOW EARTH ऑर्बिट सॅटॅलाइटच्या सहायाने पुरवली जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२८५२ NSE निर्देशांक निफ्टी १५८२४ बँक निफ्टी ३४९४९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.४० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९२.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX ११.७६ PCR १.०१ होते. ग्लोबल मार्केटचा अंदाज ५०-५०% तेजी मंदी असा होता.

डॉमिनोस या ज्युबिलण्ट फुड्सच्या पेरेंट कंपनीच्या शेअरमध्ये १४% तेजी होती. त्यामुळे ज्युबिलण्ट फुड्सच्या शेअरमध्ये तेजी होती. यावरून लक्षात येते की प्रमोटर कंपनी किंवा पेरेंट किंवा ग्रुप कंपन्यांचे शेअर्स तेजीत असले तर ती कंपनीसुद्धा तेजीत येते

पर्सिस्टंट सिस्टिम्स, म्युझिक ब्रॉडकास्ट, तानला प्लॅटफॉर्म्स, ABB पॉवर,IEX, ओरिएंटल ऍरोमॅटिक्स, अतुल ऑटो, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, JSW स्टील, MPHASIS, कॅनफिना होम्स, SKF(तोट्यातून फायद्यात), येस बँक ( तोट्यातून फायद्यात), युनायटेड स्पिरिट्स, अंबुजा सिमेंट यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

SBI कार्डस ( उत्पन्न वाढले,प्रॉफिट कमी झाले.), फेडरल बँक, बायोकॉन यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल सर्व साधारण होते. नेक्टर लाईफ सायन्सेसचे निकाल असमाधानकारक होते.

महिंद्रा लाईफ स्पेस या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २८/०७/२०२१ रोजी तर महिंद्रा हॉलिडेज या कंपनीची २९/०७/२०२१ रोजी बोनस इशूवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

तानला प्लॅटफॉर्म्स या कंपनीने Rs १२६० प्रती शेअर या किमतीने ओपन मार्केट रूटने शेअर बायबॅक जाहीर केला.
कर्नाटक राज्य सरकारने Rs ४५ लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरावरील स्टॅम्प ड्युटी ५% वरून ३% केली.
ब्रिटानिया ही कंपनी त्यांच्या ओडिशामधील प्लॅन्टचे उत्पादन वाढवणार आहे आणि त्यासाठी Rs ९४ कोटींची गुंतवणूक करणार आहे.

आज झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्सचे खूपच चांगले लिस्टिंग झाले. NSE वर Rs ११६ वर तर BSE वर Rs ११५ वर लिस्टिंग झाले. शेअर्समधील तेजी वाढत गेली. ज्या लोकांना शेअर्स अलॉट झाले त्यांना उत्तम लिस्टिंग गेन्स झाले.
या मार्केट मध्ये FII विक्री करत आहेत आणि रिटेल गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. पहिल्या तिमाहीचे निकाल एखाददुसरा अपवाद वगळता चांगले येत आहेत.

सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कम्पन्यांनी AGR ड्यूजचे पुन्हा कॅलक्युलेशन करण्यासाठी दिलेली याचिका रद्द केली. त्यामुळे आता टेलीकॉम कंपन्यांना AGR ड्यूज भरणे अनिवार्य झाले.

अल्ट्राटेक सिमेंटने Rs ५००० कोटींचे कर्ज फेडले. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी होती.

मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीचे नाव बदलून पुनावाला फिनकॉर्प असे ठेवले.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टसने गंजम जिल्ह्यात गोपाळपूर येथे नवीन प्लांट १८ महिन्यात Rs १०० कोटी गुंतवणूक करून उभारला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९७५ NSE निर्देशांक निफ्टी १५८५६ बँक निफ्टी ३५०३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७२ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.४० च्या आसपास, US $ निर्देशांक ९२.८० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२९ VIX ११.७३ PCR ०.८९ होते.

मंगळवारची मंदी, बुधवारची मार्केटला असलेली सुट्टी आणि आज गुरुवारी उघडलेले मार्केट या कालावधीत बरेच काही बदलले. डाऊ जोन्स ८०० पाईंट सावरला. अर्निंग सिझन फार चांगला चालू आहे. कोरोनासंबंधीत बरीच नियंत्रणे सैल झाली आहेत लिक्विडीटी आहे. त्यामुळे USA मधील भीतीचे वातावरण निवळले. होती ती भीती त्यातून लोक सावरले.

चीनमध्ये आयात केलेल्या मेटल्सची मागणी वाढत आहे, त्यामुळे चीन त्यांच्या देशाच्या रिझर्व्ह कोट्यातुन दुसऱ्यांदा मेटल विकत आहे या टप्प्यात चीन ३०००० टन कॉपर विकेल.

ग्रॅनुअल्सच्या CHANTILLY युनिटला USFDA कडून क्लीन चिट EIR मिळाला.

ज्युबिलण्ट फूडचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. SSSG( सेम स्टोर्स सेल्स ग्रोथ) ११४% झाली. ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

ICICI प्रु ने हायर इन्शुअरन्स क्लेममुळे लॉस पोस्ट केला. पण VNB (व्हॅल्यू ऑफ न्यू बिझिनेस) आणि VNM (व्हॅल्यू ऑफ न्यू बिझिनेस मार्जिन) चांगले आहेत.

IDFC चा IDFC I st बँकेतील प्रमोटर्ससाठी असलेला ५ वर्षांचा लॉक- इन- पिरियड पूर्ण झाला. त्यामुळे आता IDFC हा स्टेक कधीही विकू शकते. त्यामुळे IDFC च्या शेअरमध्ये तेजी होती. बजाज ऑटो चे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ( प्रॉफिट Rs १०६१ कोटी, उत्पन्न Rs ७३८६ कोटी झाले. मार्जिन मात्र थोडे कमी झाले.)

WOCKHARDT चे निकाल सर्व साधारण होते. ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. गेल्या तिमाहीत Rs १३२० कोटी वन टाइम गेन असल्यामुळे गेल्या तिमाहीचे निकाल तुलनात्मक दृष्ट्या चांगले होते.

अल्ट्राटेक सिमेंटचे निकाल लक्षणीय चांगले आले. उत्पन्न Rs ११८२९ कोटी , प्रॉफिट Rs १७०० कोटी झाले. ऑपरेटिंग मार्जिन २८% होते.

आज जाहीर झालेल्या पहिल्या तिमाहीच्या निकालात हॅवेल्स, क्रिसिल, सिंजीन, ग्लॅन्ड फार्मा, SCHAEFFLER, रॅलीज इंडिया, हिंदुस्थान झिंक, TV १८, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडिया पेस्टीसाईड्स, राजरतन वायर, शक्ती पंप्स, हायडलबर्ग सिमेंट, CSB बँक यांचे निकाल चांगले आले. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी होती. या उलट बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, साऊथ इंडियन बँक यांचे निकाल सर्वसाधारण होते. यात NPA ची समस्या आहे. शॉर्टटर्म वीकनेस दिसत आहे. पण लॉन्ग टर्म चार्टच्या बाबतीत मात्र बाय ऑन डिप्स खरेदी ही स्ट्रॅटेजी तज्ञानी सुचवली आहे.

टाटा ग्रुपच्या टाटा ऑटो कॉम्प या कंपनीने USA मधील ‘TELLUS पॉवर ग्रीन’ या कंपनीच्या JV मध्ये ६४ (२०० KW DC) फास्ट चार्जर्सची टाटा पॉवरची ऑर्डर पुरी केली. टाटा पॉवर मुंबई आणि अहमदाबाद या शहरांत EV बसेससाठी चार्जिंग स्टेशन्स बनवत आहे.

भारती एअरटेलने कॉर्पोरेट पोस्ट पेड टॅरिफ ३०% ते ४०% ने वाढवली. त्यामुळे आज या शेअरमध्ये तेजी होती.

आज मंत्रिमंडळाने स्पेशालिटी स्टीलसाठी उत्पादनावर २% ते ४% इन्सेन्टिव्ह दिली जाईल असे सांगितले. यासाठी सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजना जाहीर केली. त्यासाठी Rs ६३२२ कोटींची तरतूद केली. याचा फायदा जिंदाल स्टेनलेस, जिंदाल स्टेनलेस स्टील हिस्सार, सनफ्लॅग आयर्न, टाटा मेटॅलिक्स, श्याम मेटॅलिक्स यांना होईल.

RBI ने आज OMO मध्ये Rs २०,००० कोटींच्या गिल्टसची खरेदी केली.

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस या कंपनीचा IPO २७ जुलै २०२१ ओपन होईल आणि २९ जुलै २०२१ रोजी बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ६९५ ते Rs ७२०.०० आहे. मिनिमम लॉट २० शेअर्सचा आहे. या IPO मध्ये फ्रेश इशू Rs १०६० कोटी आणि ग्लेनमार्क फार्माची ६३ लाख शेअर्सची OFS असेल अलॉटमेंट ३ ऑगस्टला होईल . ह्या IPO मधील शेअर्सचे लीस्टिंग ६ ऑगस्ट २०२१ रोजी BSE आणि NSE वर होईल असे अपेक्षित आहे. ग्लेनमार्क फार्मा लाईफ सायन्सेस API चे मोलेक्युल बनवतात. ते TEVA आणि इतर MNC कडे निर्यात करतात आणि डोमेस्टिक कंपन्यांनाही API पुरवतात. कंपनीकडे १२० मोलेक्युलसचा पोर्टफोलिओआहे. कंपनीचे अंकलेश्वर दहेज मोहोळ आणि कुरकुंभ येथे प्लांट्स आहेत. ही कंपनी निवडक हाय व्हॅल्यू नॉनकॉमोडिटीज्ड API THERAPPEUTIC क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२८३७ NSE निर्देशांक निफ्टी १५८२४ बँक निफ्टी ३४६७७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ६ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७७.५० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.२२ USA बॉण्ड यिल्ड १.४४ PCR १.३५ होते. VIX ११.२० ते १२.२० च्या दरम्यान होते.

ओपेक+ च्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सदस्यांनी बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्यामुळे क्रूडच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा मावळली. त्यामुळे क्रूडचा दर US $ ७७.५० प्रती बॅरलपेक्षा जास्त झाला.

सरकार NMDC मधील आपल्या स्टेकपैकी ४% स्टेक+ ३.४९% ग्रीन शु ऑप्शन म्हणजे एकूण ७.४९% शेअर्स (२२ कोटी शेअर) OFS च्या माध्यमातून विकणार आहे.यातून सरकार Rs ३६०० कोटी उभारणार आहे. या OFS ची फ्लोअर प्राईस Rs १६५ ठेवली आहे. आज ही OFS इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी ओपन असेल. उद्या म्हणजे ७ जुलै २०२१ रोजी ही OFS किरकोळ आणि नॉनइन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन असेल. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी असलेला कोटा आज पूर्णपणे भरला. (OFS या कॉर्पोरेट एक्शनविषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे)
प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाने डोमेस्टिक फ्लाईटसाठी प्रवाशांची मर्यादा एकूण प्रवासी क्षमतेच्या ५०% वरून वाढवून ६५% एवढी केली. त्यामुळे प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या म्हणजे इंडिगो आणि स्पाईस जेट या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती.

MOREPAN लॅब आणि RDIF ( रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड) हे दोघे मिळून हिमाचल प्रदेशातील प्लांट मध्ये स्फुटनिक V च्या टेस्ट बॅचचे उत्पादन करणार आहेत. या बातमीनंतर MOREPAN लॅबच्या शेअरमध्ये तेजी आली.
गॅसच्या किमती ऑक्टोबर २०२१ आणि एप्रिल २०२२ मध्ये दोनदा वाढून US $ ३.१/mmbtu एवढी होईल. सध्या ही किंमत US $ २/mmbtu एवढी आहे.

JLR मध्ये निगेटिव्ह EBITA मार्जिन अपेक्षित आहे. चिप शॉर्टेजमुळे सध्या JLR चे उत्पादन कमी होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ते आपल्या पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती वाढवणार आहेत. पहिल्या तिमाहीत GBP १ बिलियन OUTFLOW होईल असे टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाचे सांगितल्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर पडला. OCT २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान चिप शॉर्टेजमध्ये सुधारणा अपेक्षित आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये गुरुवारपासून सिनेमा थिएटर्स उघडण्याची शक्यता आहे.

AMFI (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) यांनी शेअर्सचे मार्केट कॅपिटलायझेशन वाईज वर्गीकरण बदलले. उदा ITI, SJVN, ग्रनुअल्स,महानगर गॅस या शेअर्सना मिडकॅप मधून स्माल कॅप मध्ये टाकले. टाटा एलेक्सि, कजारिया सिरॅमिक्स, इंडियन बँक, ब्ल्यू डार्ट यांना स्माल कॅप मधून मिडकॅप मध्ये टाकले. SAIL, बँक ऑफ बरोडा , NMDC अपोलो हॉस्पिटल यांना मिडकॅपमधून लार्जकॅप मध्ये टाकले. ABBOT इंडिया, PI इंडस्ट्रीज, HAL आणि पेट्रोनेट LNG यांना लार्जकॅप मधून मिडकॅपमध्ये टाकले..इंडिगो पेंट्स,ज्युबीलण्ट फार्मोवा हे नवीन शेअर मिड कॅपमध्ये आणि दोडला डेअरी, ईजी ट्रिप प्लँनर, स्टोव्ह क्राफ्ट आणि क्राफ्ट्समन ऑटोमेशन या नवीन शेअर्सना स्मालकॅप मध्ये सामील केले.

रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीचे लायसेन्स रिन्यू करण्यासाठी DOT ने नकार दिला. Rs २६००० कोटींची बाकी भरली पाहिजे नाहीतर स्पेक्ट्रम सरेंडर करावा लागेल.असे सांगितले

VI च्या बाबतीत टॅरिफ वाढवणे , नवीन गुंतवणूक करणे, तोटा कमी करणे कर्ज फेडणे या बाबतीत कोणतीच कल्पना येत नाही किंवा प्रयत्न दिसत नाही असे बँक ऑफ अमेरिकेने त्यांची रिपोर्टमध्ये सांगितले म्हणून VI हा शेअर पडला.

वान्ड्रेला हॉलिडेजने आपले बंगलोरमधील रिसॉर्ट ५ जुलै २०२१पासून ओपन केले. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.

गोल्डिअम इंटरनॅशनल ही कंपनी शेअर बायबॅकवर २१ जुलै २०२१ रोजी विचार करेल.

AU स्मॉल फायनान्स बँकेने त्यांचे अपडेट जाहीर केले. त्यांच्या बिझिनेसवर कोरोनासाठीच्या निर्बंधाचा आणि लॉकडाऊनचा मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी परिणाम झाला असल्याने शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

इंडसइंड बँकेच्या अड्वान्स ७% वाढून Rs २.११लाख झाले. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२८६१ NSE निर्देशांक निफ्टी १५८१८ बँक निफ्टी ३५५७९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ५ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ५ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७६.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.५०च्या आसपास होता. PCR १.३३ होता. US $ निर्देशांक ९२.२५ च्या आसपास होते. USA बॉण्ड यिल्ड १.४३ होते. VIX १२.४४ च्या आसपास होते. आज USA मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी होती.

लोक लॉक डाऊन आणि कडक निर्बंधांना कंटाळले आहेत त्यामुळे आता ते रिव्हेंज टुरिझम चा अवलंब करतील असे सर्वत्र बोलले जाते. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची टुरिझमसाठी असलेली पेंटअप डिमांड असेल. इंडियन रेल्वेज लवकरच ३२ नव्या गाड्या चालू करत आहे. याचा फायदा IRCTC ला होईल.

पॅनासिया बायोटेक या कंपनीला SPUTNIKV च्या उत्पादनासाठी परवानगी मिळाली. इंडियन ह्यूमपाइप या कंपनीला मदुराई म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून Rs २५८ कोटींची ऑर्डर मिळाली.त्यामुळे हा शेअर तेजीत होता.

ओपेक+मध्ये UAE चे असे म्हणणे आहे की बेस लाईन वाढवा जेव्हा उत्पादन कमी करायचे असेल तेव्हा आमचा वाटा जास्त असेल तर उत्पादन वाढवतानाही आमचा वाटा जास्त हवा. हा प्रश्न सुटल्यावर ओपेक+ उत्पादनांविषयी निर्णय घेईल.
आज इंडियन पेस्टीसाईड्स या कंपनीचे NSE वर Rs ३५० वर तर BSE वर Rs ३६० वर लिस्टिंग झाले. . ज्या लोकांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले. हा शेअर Rs २९६ ला IPO मध्ये दिला होता.

डिजिटल कम्युनिकेशन कमिशनने VSAT सर्व्हीसेसला टेलिकॉम कनेक्टिव्हिटी देण्याची शक्यता आहे. स्पेक्ट्रम युसेज चार्जही १% ठेवले जातील. कंपन्या आता आपले इन्फ्रास्ट्रक्चर शेअर करू शकतील . याचा फायदा खेडोपाडी VSAT सेवा पोहोचवण्यासाठी होईल. नेल्को ही देशातली सगळ्यात मोठी VSAT सर्व्हिस प्रोवाईदर आहे. याचा फायदा GNFC लाही होईल.

HFCL ही वायफाय सोल्युशन प्रोवाइड करणारी कंपनी आहे. TIP, ओपन वायफाय ला आवश्यक असणारे हार्डवेअर ही कंपनी पुरवते. 5G स्पेक्ट्रमच्या संदर्भात या कंपनीचे बरेच कार्य आहे. IO हे HFCL चे उत्पादन आहे. या उत्पादनाचा उपयोग करून PM वाणी खेडे कर्नाटकात तयार केले. ९००० लोकांना यातून इंटरनेट ऍक्सेस मिळेल. या IO नेट वर्कमुळे पाईंट टू पाईंट रेडिओ, पाईंट हार्डवेअर,. सोलर पॉवर POE डिव्हायसेस यांना ऍक्सेस मिळतो. टेलिकॉम गियर तयार करणाऱ्या २४ कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. ह्या कंपनीला PLI योजनेचा फायदा मिळतो.HFCL या कंपनीने कर्नाटकात दुसरे वायफाय पॉवर्ड व्हिलेज चालू केले. तसेच HFCL ला ४G सर्व्हिसेससाठी .लेटर ऑफ इन्टेन्ट मिळाले. त्यामुळे या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

भारतातील जून सर्व्हिस PMI निर्देशांक ४१.४ झाला. हा मे महिन्यात ४६.४ होता.

ICRA ने रामकृष्ण फोर्जिंग या कंपनिचा लॉन्ग टर्म आऊटलूक पॉझिटिव्ह केला

आज HDFC बँकेने आपले डिपॉझिट, CASA रेशियो आणि ऍडव्हान्स चे आकडे जाहीर केले. या तिन्ही आघाडयांवर बँकेने लक्षणीय प्रगती केली. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

ISGEC ( इंडियन शुगर अँड जनरल इंजिनीअरिंग) ही १९३३ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. ही इंडस्ट्रियल बॉयलर, शुगर प्लांट मशिनरी ९१ देशात निर्यात करते. तसेच देशातील विविध राज्यात असलेल्या उदा हरयाणा, UP, गुजराथ, तामिळनाडू, महाराष्ट्र येथील साखर कारखान्यांनाही मशिनरी सप्लाय करते. सरकार आता इथेनॉल उत्पादनासाठी नवीन प्लांट स्थापन करायला उत्तेजन देत असल्यामुळे या कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी येईल त्यामुळे या शेअरमध्ये आज तेजी होती.

MCX नी इलेक्ट्रिसिटी डेरिव्हेटिव्हसाठी युरोपियन एनर्जी एक्स्चेंज बरोबर करार केला. सरकार MSTC ची १००% सबसिडीअरी असलेली फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड ही कंपनी विकणार आहे. त्यामुळे आज MSTC च्या शेअरमध्ये तेजी होती.

वेदांता ‘स्टरलाईट पॉवर’ या कंपनीचा चा IPO आणण्याची शक्यता आहे

इन्फोएजची सबसिडीअरी झोमॅटोचा IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली. इन्फोएज ने सांगितले की ते पॉलिसी बझारचाही IPO आणण्याची शक्यता आहे.

NTPC ने फ्लायऍश विकण्यासाठी EOI मागवले.

सिक्कीम मध्ये डेल्टाकॉर्प या कंपनीचा कॅसिनो उद्यापासून सुरु होईल. गोव्यातील कॅसिनो मात्र बंद राहील.

हेरंबा इंडस्ट्रीज ला सरकारकडून पर्यावरणसंबंधीत मंजुरी मिळाली. कंपनी Rs ११० कोटी खर्च करून ऍडिशनल मॅन्युफॅक्चरिंग क्षमता असलेला प्लान्ट उभारणार आहे.

ONGC ने सांगितले की ऑइल एक्स्प्लोरेशन आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या साधनसामुग्री आणि सेवांमध्ये आम्ही Rs ३०००० कोटींची गुंतवणूक करू त्यामुळे भारतातीळ उद्योगांना आत्मनिर्भर भारत योजनेखाली बिझिनेस मिळेल. या घोषणेनंतर ONGC च्या शेअरमध्ये तेजी आली

TCS ही IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी आपले पहिल्या तिमाहीचे निकाल ८ जुलै २०२१ रोजी जाहीर करेल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२८८० NSE निर्देशांक निफ्टी १५८३४ बँक निफ्टी ३५२१२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २ जुलै २०२१

आज US $ निर्देशांक ९२.५६ USA बॉण्ड यिल्ड १.४६ क्रूड USA $ ७५.९२ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.७४ च्या आसपास होते. VIX १२ ते १३ च्या दरम्यान तर PCR १.२८ होते.

ITI त्यांच्या पल्लकड येथील प्लांटमध्ये ISRO च्या सहकार्याने ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बनवणार आहेत.त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

नॅशनल प्राइसिंग पॉलिसी ऑथॉरिटीने आज इब्युप्रोफेन, रानटिडीन, CARBAMAZEPINE तसेच हेपारीन ( ३१डिसेंबर २०२१ पर्यंत) या औषधाच्या किमती ५० % ने वाढवायला मंजुरी दिली. याचा फायदा विनती ऑर्गनिक्स, टाटा केमिकल्स, JB केमिकल्स, IOL केमिकल , कनोरिया केमिकल्स, थिरुमलाई केमिकल्स, क्लॅरियंट केमिकल्स, सुदर्शन केमिकल्स या कंपन्यांना होणार असल्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली. NPPA नी ही मंजुरी अपवादात्मक परिस्थिती म्हणून दिली. ही औषधे बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्यांच्या किमतीत खूपच वाढ झाली आहे. हेपारिन हे ‘BLOOD THINNER’ म्हणून वापरले जाते.

IT हार्डवेअर उत्पादनासाठी असलेल्या PLI स्कीमसाठी १४ कंपन्यांची निवड केली आहे. त्यात डिक्सन टेक्नॉलॉजी आणि , रेडीन्गटन यांचा समावेश आहे.

हिरो मोटोची टू व्हिलर्सची विक्री या १.८३ लाख युनिटवरून ४.६९ लाख युनिट एवढी झाली.

DAP या खताची टंचाई आहे. सरकारने सर्व खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना खताचे उत्पादन वाढवायला सांगितले आहे. आयात करायला लागण्याची शक्यता आहे. सरकारने DAP साठी या आधीच जादा सबसिडीची तरतूद केली आहे . याचा फायदा खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.

नजीकच्या भविष्यकाळात श्रीराम प्रॉपर्टी, क्लीन सायन्स & टेक्नॉलॉजी, पारस डिफेन्स अँड स्पेस, ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस, उत्कर्ष स्माल फायनान्स बँक, रोलेक्स रिंग्स, आरोहण फायनान्सियल सर्व्हिसेस, सेव्हन आयलँड्स शिपिंग कंपनी या कंपन्यांचे IPO येणार आहेत. यापैकी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या २००३ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचा Rs १ दर्शनी किमतीच्या शेअर्सचा Rs १५.४६ कोटींचा IPO ७ जुलै २०२१ रोजी ओपन होऊन ९ जुलै २०२१ रोजी बंद होईल. या IPO चा प्राईस बॅंड Rs ८८० ते Rs ९०० असून मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे. ही कंपनी MEHQ, BHA, AP आणि फार्मास्युटिकल इंटरमीजिएटस GUAIACOL, DCC या केमिकल बनवण्याच्या क्षेत्रात आहे.

भारती एअरटेल या कंपनीने ‘एअरटेल ब्लॅक’ हा प्लान लाँच केला म्हणून आज भारती एअरटेलचा शेअर तेजीत होता.
AFFLE या कंपनीने ‘JAMPP’ या कंपनीचे अक्विझिशन पूर्ण केले म्हणून AFFLE चा शेअर तेजीत होता. HNI आणि FII हे मार्केट रेकॉर्ड हायवर असल्यामुळे विक्री करत आहेत, DII कडे पैशाचा ओघ येत असल्यामुळे लार्जकॅप रिलाएबल शेअर्समध्ये ते खरेदी करत आहेत. पण पुढील आठवड्यात मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे.

आज निफ्टी ५० मध्ये हॅमर सारखा कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला पण साप्ताहिक चार्ट मात्र मार्केट मंदीत राहील असे दाखवतो. आज सुरुवातीला असलेली मंदी २ वाजेपासून हळू हळू तेजीमध्ये परावर्तित झाली. आज मार्केटने १५७००चा सपोर्ट तोडला काहीकाळ असेना हा आठवडा तेजीतच संपला. मंदीला कंटाळलेल्या गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२४८४ NSE निर्देशांक निफ्टी १५७२२ आणि बँक निफ्टी ३४८०९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!