आजचं मार्केट – २७ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ७४.४० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.५७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२८ VIX १३.३३ PCR ०.७२ होता.

USA मध्ये न्यू होम विक्री ६% ने कमी झाली. FOMC ची मीटिंग संपल्यावर बॉण्ड्स खरेदी कमी करणार का ?करणार असाल तर कधीपासून आणि किती हे सगळ्या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष पॉवेल यांच्या तोंडून ऐकावयाचे आहे.
चीनने टेक कंपन्यांवर बरीचशी नियंत्रणे घातली आहेत. त्यामुळे ज्या चिनी कंपन्या परदेशात स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होतात त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी आली..

DLF या रिअल्टी क्षेत्रातील कंपनीचे निकाल चांगले आले. ही कंपनी प्रिमियम हौसिंगच्या क्षेत्रात आहे. अफोर्डेबल हौसिंगसाठी सरकारकडून सबसिडी मिळते. पण प्रीमियम हाऊसिंगसाठी हे सबसिडी उपलध नाही. याचा विचार करता DLF चे निकाल चांगले आहेत .

वोल्टासने टाटा पॉवरबरोबर करार केला. जे कोणी टाटा पॉवर वापरतात त्यांना वोल्टस AC वर ४०% डिस्काउंट देणार आहे. ही सवलत फक्त दिल्लीमध्येच उपलब्ध आहे.

ग्लेनमार्कलाईफ सायन्सेसने जे कर्ज घेतले होते ते ग्लेनमार्क फार्माकडूनच घेतले होते हे कर्ज IPO च्या प्रोसिड्स मधून फेडले जाणार आहे. त्यामुळे दोघांसाठीही ही विन विन परिस्थिती आहे. कदाचित शिल्पा मेडिकेअरच्या शेअरमध्ये तेजी येईल कारण PE रेशियोनुसार शिल्पा मेडिकेअरचा शेअर स्वस्त आहे.

असोसिएटेड अल्कोहोल, GM ब्रुअरीज, KPIT कमिन्स (या कंपनीने फ्युचर गायडन्स वाढवला.) आलेम्बिक फार्मा ( फ्युचर गायडन्स कमी केला), TTK प्रेस्टिज ( चांगला प्रॉफिट इनकम मार्जिन वाढले), अपार इंडस्ट्रीज ( तोट्यातून फायद्यात आली). रामको सिमेंट, शारदा क्रॉपकेम, भारत सीट्स ( तोट्यातून फायद्यात उत्पन्न वाढले.), महिंद्रा लॉजिस्टिक (तोट्यातून फायद्यात आली), डिक्सन टेक्नॉलॉजी, जय भारत मारुती( तोट्यातून फायद्यात आली) KPR MILLS ( निकाल चांगले १ शेअर ५ शेअर्समध्ये स्प्लिट करण्यासाठी बोर्डाने मंजुरी दिली), कॅनरा बँक, यूको बँक या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

DR रेडिजचे निकाल मात्र असमाधान कारक होते. ऑपरेटिंग मार्जिन २५.३४% वरून १४.८६% झाले. USA मधील बिझिनेसमध्ये फारशी ग्रोथ झाली नाही. त्यामुळे DR रेडिजचा शेअर तर पडलाच पण त्याचा इफेक्ट इतर फार्मा कंपन्यांवर होऊन फार्मा कंपन्यांमध्ये मंदी आली.

APL अपोलो ट्यूब्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बोनस इशूवर विचार करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२१ रोजी बैठक आहे.

टेलिकॉम उपकरणांची ती सिस्टिममध्ये बसवण्याआधी लॅब मध्ये स्पायवेअर मालवेअर आणि बाबींसाठी तपासणी करणे अनिवार्य असेल. सरकारप्रमाणित तसेच कंपन्यांचे सेल्फ सर्टिफिकेशन असणे जरुरीचे आहे.

ABB इंडिया आपला मेकॅनिकल पॉवर TRA डिव्हिजन US $ २९० कोटींना RBC बेअरिंग या कंपनीला विकणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे रिकॅपिटलायझेशन दुसरी तिमाही संपल्यानंतर विचारात घेतले जाईल. डिसेंबर २०२१मध्ये जर कुठल्या बँकेत कॅपिटलची जरुरी भासली तर त्या बँकेला कॅपिटल पुरवले जाईल. त्यामुळे PSB च्या शेअरमध्ये मंदी आली.

एप्रिल २०२१ ते जून २०२१ या तिमाहीत प्रत्यक्ष कराची वसुली Rs २.४७ लाच कोटी एवढी झाली.

स्माल फायनान्स बँक सुरु झाल्यापासून ५ वर्षाच्या आत प्रमोटर्सचा सबसिडीअरीतील स्टेक ४०% पर्यंत कमी करावा लागतो. ३० जून २०२१ पर्यंत इक्विटास होल्डिंग लिमिटडचा

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये ८१.७५% स्टेक होता. इक्विटास होल्डिंग लिमिटेडच्या शेअरहोल्डरला त्याच्या जवळ असलेल्या १०० शेअर्ससाठी इक्विटास स्माल फायनान्स बँकेचे २२६ शेअर्स मिळतील. त्यामुळे आज या शेअरमध्ये तेजी होती.

हुडको या कंपनीमधील आपला ८% स्टेक सरकार Rs ४५ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने १६.०१ कोटी शेअर्स विकून Rs ७२० कोटी उभारणार आहे. सरकार प्रथम ११.०१ कोटी शेअर्स विकेल आणि प्रतिसाद चांगला असला तर आणखी ५ कोटी शेअर विकेल.रिटेल गुंतवणूकदारांसाठी ही OFS २८ जुलै रोजी ओपन असेल.

सरकार SJVN मधील १०% स्टेक विकणार आहे

विनंती ऑर्गनिक्स ने पुरामुळे महाड येथील युनिट बंद केले आहे.

चीन आणि कोरियातून आयात होणाऱ्या रबर केमिकल्सवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाण्याची शक्यता आहे.
ब्राझीलमध्ये थंडी आणि दुष्काळामुळे आणि कोलंबिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये बंदरातून शिपमेंट उशीर होत असल्यामुळे आज कॉफीउत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. CCL प्रॉडक्टस, टाटा कॉफी, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग, नेस्ले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५७८ NSE निर्देशांक निफ्टी १५७४६ बँक निफ्टी ३४७९७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.