आजचं मार्केट – २८ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७४.७५ च्या आसपास रुपया US $१= Rs ७४.३० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९२.५२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२५ VIX १५.१४ PCR ०.७४ होते.

USA मधील ब्ल्यू चिप निर्देशांक घसरला. गोल्डन ड्रॅगन निर्देशांक पडला. USA मधील कंपन्या GE आणि ३M ने प्रॉफिट वॉर्निंग दिली.

चीनच्या सरकारने हौसिंग, मेडिकल आणि शिक्षण या क्षेत्रात मोठे धोरणात्मक बदल सुचवले आहेत. देशाचे, नागरिकांचे हित लक्षात घेऊन उद्योगांनी आपले उद्योग करावेत. सरकारच्या खाजगी उद्योगक्षेत्रात होणाऱ्या हस्तक्षेपाला घाबरून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले. चीनच्या या धोरणात्मक बदलाचा परिणाम भारतातील मार्केट्सवर झाला आणि मंदी आली

इंडिगोचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. लॉसेस ओळीने गेल्या सहा तिमाहीत वाढत आहेत. प्रती किलोमीटर यिल्ड कमी होत आहे.

इंडसइंड बँकेचे निकाल असमाधानकारक होते. बँकांचे निकाल असे दर्शवतात की डिपॉझिट्स वाढत आहेत. पण ऍडव्हान्सेसमध्ये मात्र ग्रोथ दिसत नाही. स्लीपेजिस दर तिमाही वाढत आहेत. त्यामुळे प्रोव्हिजन वाढवावी लागत आहे.
गोदावरी पॉवर आणि इस्पात, हेरिटेज फूड्स ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले मार्जिन कमी झाले.), सेंच्युरी टेक्सटाईल्स ( तोट्यातून फायद्यात, प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले. ) SRF (PIM वाढले, Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला), उषा मार्टिन,टाटा कॉफी ( कंपनीने Rs १.०२ कोटी वन टाइम लॉस बुक केला.), ग्राईंडवेल नॉर्टन ( PIM वाढले), जिओजित फायनान्सियल्स (PIM वाढले ), नेस्ले, IDBI बँक (NII, प्रॉफिट वाढले पण GNPA आणि प्रोव्हिजन वाढली.) या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

सरकारने DICGC ( डिपॉझिट इन्शुअरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन )ऍक्ट आणि जनरल इन्शुअरन्स ऍक्ट यांच्या मध्ये महत्वाचे बदल केले. आता बंद पडलेल्या बँकेच्या डिपॉझिटर्सना ९० दिवसाच्याआत Rs ५ लाखापर्यंचे डिपॉझिट परत मिळेल. GIC कायद्यात खाजगीकरण सोपे होईल असे बदल करण्यात आले.

भारती एअरटेल या कंपनीने आता पोस्टपेड बरोबरच प्रीपेड टॅरीफ वाढवली आता किमान प्लॅन Rs ७९चा असेल. यामुळे भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी आली.

येस बँकेने इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स बरोबर कोलेन्डिंगसाठी करार केला.

MCGM( मेट्रोपॉलिटन कॉऊन्सिल ऑफ ग्रेटर मुंबई) कडून सेंच्युरी टेक्सटाइल्सच्या वरळी येथील फॅक्टरीच्या जमिनीवर मोठ्या रियल इस्टेट प्रोजेक्टसाठी मंजुरी मिळाली. IOD (इन्टिमेशन ऑफ डिस अप्रूव्हल) मंजुरी दिली.

CYIENT ही IT क्षेत्रातील कंपनी ‘वर्कफोर्स डेल्टा’ या कंपनीत १००% स्टेक घेणार आहे.

महिंद्रा लाईफ स्पेसेस या कंपनीने तुमच्या जवळील १ शेअर्ससाठी २ बोनस शेअर्स इशू करण्याची घोषणा केली.

कालचा निफ्टी क्लोज भाव १५७४६ वरून आज निफ्टी १५७६१ला ओपन झाला. तो १५७६७ पर्यंत गेला.आणि नंतर मार्केट जोरदार पडू लागले आणि निफ्टीने १५५१३ हा लो पाईंट गाठला. या स्तरावरून मात्र बुल्सनी जोरदार मुसंडी मारली. मार्केट जवळजवळ ८०% ते ८५ % सुधारले आणि १५७०९ वर बंद झाले. या चढाओढीमध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला. पण अजूनही ऍडव्हान्स डिक्लाईन रेशियो मात्र बेअर्सच्या बाजूनेच झुकलेला आहे. कोणीही शॉर्ट करु नये. निफ्टी १५५५० ते निफ्टी १५९५० ही मार्केटची रेंज आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२४४३ NSE निर्देशांक निफ्टी १५७०९ बँक निफ्टी ३४५३२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.