आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७५ प्रती लिटरच्या आसपास तर रुपया US $१ = Rs ७४ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.३२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX १३ च्या आसपास आणि PCR ०.९१ होते.

फेडने त्यांच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. व्याजदर ०.०० ते ०.२५% या दरम्यान ठेवला. कोरोनाचे जे वेगवेगळे व्हरायंटच येत आहे त्यांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. प्रत्येक व्यवस्थेत सुधारणा होत आहे पण सुधारणा होण्याचा वेग कमी आहे. . बॉण्ड खरेदीविषयी कोणताही विचार किंवा योजनेत फरक व्यक्त केला नाही.

चींन १ ऑगस्ट २०२१ पासून त्यांच्या देशातून निर्यात होणाऱ्या स्टीलच्या काही प्रकारांवर निर्यात ड्युटी वाढवणार आहे. त्यामुळे आता चीनमधून येणारे स्टिल महाग होईल.त्यामुळे स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या तेजीत होत्या.चीनमध्ये आता स्टील निर्यात करणाऱ्या कंपन्यांना इन्सेंटिव्हज देणार नाही उलट या कंपन्या स्टीलचे उत्पादन कमी करतील यासाठी उपाय योजले जातील यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये स्टीलच्या किमती वाढतील आणि भारताकडून निर्यात वाढेल. उदा टाटा स्टील, JSW स्टील पण मारुती, आणि ऑटो क्षेत्रातले कंपन्यांच्या उत्पादनाची कॉस्ट वाढेल. त्यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स मंदीत होते.

कॉग्निझंट या IT क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीचे निकाल चांगले आले आणि त्यांनी फ्युचर गायडन्स चांगला दिला. मिडकॅप IT कंपन्यांचे निकाल लार्जकॅप IT कंपन्यांपेक्षा चांगले येत आहेत त्यामुळे मिडकॅप IT कंपन्यांमध्ये तेजी होती . उदा कोफोर्ज, माईंड ट्री, पर्सिस्टंट सिस्टिम्स, सोनाटा सॉफ्टवेअर, टेकमहिन्द्र

अल्केम लॅब या कंपनीच्या तळोजा युनिटची तपासणी USFDA कडून २६ जुलै ते २८ जुलै २०२१ या दरम्यान झाली होती.या युनिटला क्लीन चिट दिली.

MTNL आणि BSNL च्या अनुक्रमे २ आणि ४ मालमत्ता सरकार विकणार आहे त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.
साखरेच्या निर्यातीवर Rs ३.५० प्रती किलो सबसिडी देण्याचा खाद्य मंत्रालय विचार करत आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

बलरामपूर चिनी या कंपनीची ८ ऑगस्ट २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
महिंद्रा हॉलीडेजनी बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ २ शेअर्स असले तर १ बोनस शेअर मिळेल.

आज पेपर शेअर्समध्ये तेजी होती कारण पेपरचे भाव वाढत आहेत. अर्थव्यवस्था ओपन होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. सरकारचा शिक्षणावरचा खर्च वाढला आहे. चीनमध्ये पेपरच्या किमती वाढल्या. ऑफिस आणि शैक्षणिक संस्था ओपन होत असल्यामुळे लिहिण्यासाठी आणि छपाईसाठी लागणाऱ्या पेपरची मागणी वाढेल. USA कॅनडा येथील जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे लंबरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे JK पेपर, स्टार पेपर NR अगरवाल, पदमजी पेपर. आणि इतर पेपर उत्पादक कंपन्यांमध्ये तेजी होती.

टाटा सन्स तेजस नेटवर्क मध्ये ६३.१% स्टेक घेणार आहे. त्यामुळे टाटा ग्रुपला 4G आणि 5G च्या क्षेत्रात प्रवेश मिळेल. ४३.३५ % स्टेक साठी Rs १८५० कोटी तेजस नेटवर्कला दिले जातील. Rs ५.१३ कोटींची वॉरंटस इशू केली जातील. आणि Rs २५८ प्रती शेअर या भावाने २६% स्टेक साठी ओपन ऑफर आणली जाईल. हा सर्व व्यवहार PANATONE इन्व्हेस्टमेंट च्या मार्फत होणार आहे.

तत्व चिंतन फार्माचे BSE आणि NSE वर Rs २१११.८० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १०८३ ला दिला असल्यामुळे ज्यांना हे शेअर्स अलॉट झाले त्यांना खूपच चांगला लिस्टिंग गेन झाला. शेअर नंतर Rs २३५० पर्यंत वाढला.
द्वारिकेश शुगरचे निकाल ठीक होती. LIC हौसिंग कॉर्पोरेशन आणि G. E. शिपिंग चे निकाल असमाधानकारक होते. मारुतीचे पहिल्या तिमाहीत निकाल कमजोर होते. .

नॉवेलीसने स्ट्रॉंग गायडन्स दिल्यामुळे आज हिंदाल्को च्या शेअर मध्ये तेजी होती.

टेकमहिन्द्र, युनियन बँक ( प्रॉफिट NII मध्ये वाढ NPA कमी झाले), पंजाब अँड सिंध बॅन्क, पॉली मेडिक्युअर, एरिस लाईफसायन्सेस ( Rs ६.०१ लाभांश जाहीर केला), GHCL,, PVR लॉरस लॅब्स, प्रीस्झ्म जॉन्सन, कोलगेट (PIM ( प्रॉफिट इन्कम मार्जिन वाढले), वर्धमान टेक्सटाईल्स,( तोट्यातून फायद्यात आली. ), मोल्डटेक पॅकेजिंग या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSW एनर्जी ह्या कंपनीने ग्रीन हायड्रोजन साठी ऑस्ट्रेलियन कंपनी FORTESCUE फ्युचर बरोबर केला.
ग्लेनमार्क लाईफसायन्सेसचा IPO ३१ वेळा सबस्क्राईब झाला.

आज जुलै २०२१ महिन्याची एक्स्पायरी होते. ही एक्स्पायरी सकारात्मक भूमिकेतून झाली. मेटल, पेपर, साखर, शैक्षणिक क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२६५३ NSE निर्देशांक निफ्टी १५७७८ बँक निफ्टी ३४६९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

 1. सुनील तोडकर

  उद्या साठी कुठले शेर तेजीत राहतील हे कसे ओळखायचे

  Reply
 2. संजय सरोदे

  खूप छान मार्गदर्शन मिळाले, मॅडम तुम्ही रोज सकाळी 7.30 वाजता त्या त्या दिवसाच्या कुठल्या share मध्ये ट्रेड करावा वा स्विंग ट्रेडिंग करावे वा कुठल्या सेक्टर मध्ये लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट करावी हे सांगाल तर खूप उत्तम होईल आम्हा सर्व लोकांसाठी. तुमचा ब्लॉग वाचल्या नंतर असे जाणवते की अरे हे मला आज सकाळी माहिती असते तर बरे झाले असते. कृपया माझ्या विनंतीचा विचार करावा व आमची मदत करावी. धन्यवाद.

  Reply
 3. संजय सरोदे

  रोज सकाळी झी बिझनेसवर 7.30 वाजता जी रोजच्या मार्केट विषयी टिप्स दिल्या जातात त्या धरती वर आपण पण त्या त्या दिवसाच्या मार्केट चा अंदाज द्यावा ही अपेक्षा आहे, द्याल तर आम्हा सर्व मराठी जनतेला त्याचा खूप फायदा होईल, धन्यवाद

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.