Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३१ ऑगस्ट २०२१
आज क्रूड ७३.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.४६ VIX १३.७५ च्या आसपास, USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२८ PCR १.५६ होते. आज USA मधील मार्केट्स तेजीत होती. ओपेक+ची ऑस्ट्रियामध्ये बैठक आहे. या बैठकीत क्रूड ऑईलच्या मागणी आणि पुरवठ्याविषयी परिस्थितीचे आकलन आणि त्यावरील उपाय यांच्याविषयी विचार होईल. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग मंदावत आहे. तसेच आज US $ ही कमजोर झाला.
IEX हा शेअर ९% वाढला. कारण यांची मोनॉपोली आहे सरकारने टाटा पॉवर आणि अडानी पॉवर यांच्या मुंद्रा प्लांटमधील पॉवर IEX वर विकण्यासाठी परवानगी दिली. सरकार या दोन कंपन्यांना१ महिन्यासाठी ४४०० MW एवढी पॉवर IEX वर विकण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत आहे. IEX चा पॉवर एक्स्चेंजमध्ये ९५% मार्केटशेअर आहे. दीर्घ मुदतीचे करार असल्यामुळे बिझिनेसमध्ये ग्रोथ होण्याची शक्यता आहे. सध्या पॉवरची किंमत Rs ६ ते Rs ७ प्रती युनिट या दरम्यान आहे.
आज साखरेच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये ४ वर्षांच्या कमाल स्तरावर होत्या. तसेच चहा आणि कॉफीच्या किमतीमध्येही तेजी होती. त्यामुळे आज चहा, कॉफी तसेच साखर उत्पादन करणाऱ्या शेअर्समध्ये तेजी होती.
TVS मोटर्सने आज त्यांचे ‘बिल्ट टू ऑर्डर’ मॉडेलसाठी प्लॅटफॉर्म लाँच केला. यात आपल्या मागणीनुसार ऍक्सेसरीज आणि सोयी केल्या जातील. थोडक्यात हे मॉडेल कस्टमाइज्ड असेल.
कोटक बँकेने एअरटेल पेमेंट्स बँकेचे २० कोटी शेअर्स भरती एंटरप्रायझेसला Rs २९४ कोटींना विकले.
WAPCOS या कंपनीचा IPO या वर्षाअखेरपर्यंत येईल.
AU स्मॉल फायनान्स बँकेच्या तिसऱ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याने राजीनामा दिल्यामुळे आज बँकेच्या शेअर मध्ये लक्षणीय मंदी आली.
मूडीजने भारताच्या GDP ग्रोथचे अनुमान २०२१ वर्षांसाठी ९.८% आणि २०२२ वर्षांसाठी ७% दिले आहे.
शिल्पा मेडिकेअर या कंपनीला 2DEO-2GLUCOSE या औषधाच्या ओरल पॉवडर व्हेरियंटसाठी DGCA ने मंजुरी दिली. कंपनी आता त्यांच्या कर्नाटक राज्यातील प्लांट मध्ये हे औषध बनवेल.
वंदेमातरम ट्रेनसाठी IRCTC ने टेंडर जाहीर केले तसेच ४० नव्या गाड्या चालू केल्या. त्यामुळे IRCTC चा शेअर तेजीत होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज आता फ्रीझ आणि टी व्ही सारख्या टिकाऊ वस्तूंचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. यासाठी त्यांनी BPL (टी व्ही) आणि केल्व्हिनेटर (फ्रीज) या सुप्रसिद्ध ब्रॅण्डअन्तर्गत उत्पादन आणि विक्रीचे परवाने घेतले आहेत.
SRF या कंपनीने तुमच्याकडे १ शेअर असला तर ४ बोनस शेअर मिळतील असे जाहीर केले.
THEJO इंजिनीअरिंग या कंपनीने बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ १ शेअर असला तर २ बोनस शेअर्स मिळतील.
३ ऑगस्ट २०२१ रोजी १६००० पार करणाऱ्या निफ्टीने आज १७००० चा पल्ला पार केला १९ सत्रात ही मजल निफ्टीने मारली. आज मार्केटमध्ये जबरदस्त तेजी होती. सेन्सेक्सने इंट्राडे ५७६२५ आणि निफ्टीने १७१५३ चा ऑल टाइम हाय बनवला.
उद्या १ सप्टेंबर २०२१ पासून मार्केटशी संबंधित दोन घटनांवर लक्ष ठेवावे लागेल. उद्यापासून MSCI रीबॅलन्सिंग अमलात येईल आणि सेबीचा १००% PEAK मार्जिनचा नियम अमलात येईल.
८ मूलभूत ( कोअर) उद्योगांची एप्रिल ते जून या तिमाहीत २१.८% ग्रोथ झाली ( YOY ही ग्रोथ -१९.८% ) होती. जुलै महिन्यात ८ मूलभूत उद्योगांची ग्रोथ ९.३% (जून २०२१) वरून ९.४% झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७५५२ NSE निर्देशांक निफ्टी १७१३२ आणि बँक निफ्टी ३५५८६ वर बंद झाले.भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!