आजचं मार्केट – ०२ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०२ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $ ७४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.३४च्या आसपास होता US $ निर्देशांक ९२ च्या आसपास VIX १२.९८, USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२३ आणि PCR १.४९ होते.

आज जुलै महिन्याचे ऑटो विक्रीचे आकडे आले. मारुती, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा & महिंद्रा ( ट्रॅक्टर निर्यात ५५% ने वाढली) ,SML इसुझू, TVS मोटर्स यांची विक्री वाढली. हिरो मोटो, एस्कॉर्टस यांची विक्री सर्व साधारण होती. IRCTC आपल्या शेअर्सचे स्प्लिट करण्यावर १२ ऑगस्ट २०२१ रोजी विचार करेल. खाजगी ट्रेन चालवण्यासाठी टेंडरला थंडा प्रतिसाद मिळाल्याने सरकार आता खाजगी गाड्यांच्या धोरणाबाबत बदल करण्याचा विचार करत आहे. यात रेव्हेन्यू शेअरिंगच्या काही अटी सोप्या करणार असल्यामुळे टिटाघर वॅगन्स आणि IRCTC यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. GST अंतर्गत कलेक्शन Rs १.१६ लाख कोटी झाले. हे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे याचे द्योतक आहे.

NSE ने निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांकांचे लॉट कमी केले.

IRCTC, नजारा टेक्नॉलॉजी, कल्याणी स्टील्स, KEI, NURECA, काँकॉर, HDFC, वरुण बिव्हरेजीस, कॉर्बोरण्डम,इमामी या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

PNB चे प्रॉफिट वाढले पण NPA सुद्धा वाढले.

HDFC चा फायदा अपेक्षेपेक्षा जास्त आला. NIM ३.५% वरून ३.७% वर गेले. जुलै महिन्यातील डिसबर्समेंट्सचे आकडे चांगले आले. HDFC च्या या निकालांमुळे हौसिंग लोनचा पोर्टफोलिओ वाढेल आणि त्याचा फायदा रिअल्टी क्षेत्राला होईल म्हणून रिअल्टी क्षेत्रात तेजी होती. शोभा प्रेस्टिज इस्टेट, कोलते पाटील, गोदरेज प्रॉपर्टि, इंडिया बुल्स रिअल इस्टेट या शेअर्स मध्ये तेजी होती.

IDFC Ist बँक, बंधन बँक, चोला इन्व्हेस्टमेंट्स,BHEL, RBL बँक ( फायद्यातून तोट्यात आली,) या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

पंजाबमध्ये रोपड येथिल युनिटचा विस्तार करण्यासाठी अंबुजा सिमेंट Rs ३१० कोटी खर्च करेल.

टाटा मोटर्स उद्यापासून पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती ०.८% ने वाढवणार आहे.

ग्लेनमार्क फार्मा या कंपनीने SaNotize या कंपनीबरोबर कोविद ट्रीटमेंट स्प्रे साठी भारत आणि इतर एशियन देशांसाठी करार केला.

जेट एअरवेज ‘बोईंग कंपनी’ बरोबर विमानखरेदीसाठी करार करत आहे.

KRSNAA DIAGNOSTICS ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्नॉस्टिक्स सेवा पुरवते. उदा ;- इमेजिंग , रेडिओलॉजी सर्व्हीसेस, क्लिनिकल लॅब आणि पॅथॉलॉजि आणि टेलीरेडिओलॉजी सर्व्हिसेस. या कंपनीची १३ शहरात १८०१ डायग्नॉस्टिक्स सेंटर्स आहेत. ह्या इशूची प्रोसिड्स पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यात डायग्नॉस्टिक सेंटर उभारण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. या कंपनीचा Rs १२१३.३३ कोटींचा ( यात Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ८१३.३३ कोटींची OFS असेल.) IPO ४ ऑगस्ट २०२१ला ओपन होउन ६ ऑगस्ट २०२१ ला बंद होईल.
मॅन्युफॅक्चरिंग PMI जुलै महिन्यासाठी ४८.१० वरून ५५.३० एवढा वाढला. हे रोजगार आणि फॅक्टरीमधील उत्पादन वाढल्याचे द्योतक आहे.

सरकार टेलिकॉम क्षेत्राला काही सवलती देण्याचा विचार करत आहे. AGR ड्यूजची व्याख्या आणि त्याचे कॅल्क्युलेशनची पद्धत बदलण्याचा विचार करत आहे. स्पेक्ट्रम फी तीन हप्त्यात देण्याची सवलत देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

सरकारचा दोन बँकांच्या खाजगीकरणाचा निर्णय पुढील वर्षी होईल कारण या वर्षी कायद्यात आवश्यक असणारे बदल या वर्षी शक्य नाहीत, त्यामुळे सेंट्रल बँक आणि IOB मध्ये विक्री झाली.

रिलायन्स रिटेल हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिटेल आर्म ‘SUBWAY इनकॉर्पोरेशन’ची इंडियामधील फ्रँचाइज US $२०० ते US $ २५० मिलियनला खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे.

WINDLAS बायोटेक या फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बनवणार्या कंपनीचा Rs ४०१.५३ कोटींचा IPO ४ ऑगस्ट २०२१ रोजी ओपन होऊन ६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. प्राईस बँड Rs ४४८ ते Rs ४६० असून IPO ची प्रोसिड्स डेहराडून येथील फॅक्टरीच्या क्षमता विस्तारासाठी उपयोगात आणली जातील. ही कंपनी CDMO क्षेत्रातील आहे (फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स,कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन). मिनिमम लॉट ३० शेअर्सचा आहे. दर्शनीय किंमत Rs ५ आहे.

FINCARE स्माल फायनान्स बँकेला Rs १३३० कोटींचा IPO आणण्यासाठी सेबीची परवानगी मिळाली.

निफ्टीने आज हँगिंग मॅन पॅटर्न फॉर्म केला. सगळे सेक्टोरियल निर्देशांक तेजीत होते. १०० पाईंट निफ्टी वर होते. इंट्राडे हाय १५८९२ आणि इंट्राडे लो १५८३४ होते. त्यामुळे १५८३४ ही महत्वाचा स्तर आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९५० NSE निर्देशांक निफ्टी १५८८५ बँक निफ्टी ३४७१० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ०२ ऑगस्ट २०२१

  1. Vaibhavi Dandekar

    Namaskar tai, tumhi khup chaan shikavtat. Mala tumcha contact no hava aahe. Tumhi telegram channel ka nahi chalu karat amhala live guide karana please

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.