आजचं मार्केट – ०४ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०४ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $ ७२.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.१७ VIX १३.३८ PCR १.७५ होते.

USA मध्ये अध्यक्ष जो बिडेन यांच्या US १ ट्रिलियनच्या इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगच्या पॅकेजवर हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह विचार करेल. ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टाचे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर आहे. जपान आणि हाँगकाँग ही मार्केट्स मंदीत होती.कमी होणारे USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड, हळू हळू कमजोर होत असलेला US $ आणि सोन्यातील तेजी यामुळे इमर्जिंग मार्केट्समध्ये FII ची गुंतवणूक येत आहे.

चीन गेमिंग कंपन्यांवर कडक निर्बंध घालण्याची शक्यता आहे. याचा परिणाम नजारा च्या शेअरवर होईल.

DR रेड्डीज नॅप्रोक्सीन सोडियम हे औषध पुन्हा लाँच करणार आहे. म्हणून या शेअरमध्ये तेजी होती.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल एडिबल ऑइल मिशनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता सरकार खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी उत्तेजन देणार आहे. आणि यासाठी सरकारने Rs ११००० कोटींची तरतूद केली आहे. सरकारचा याबाबतीत देशाने स्वावलंबी व्हावे हा उद्देश या मागे असेल.

टाटा मोटर्सने ‘टिआगो NRG’हे मॉडेल लाँच केले याची किंमत Rs ६.५७ लाख आहे.

केसोराम या कंपनीने आपल्या राईट्स इशूची रक्कम Rs २०० कोटींवरून Rs ४०० कोटी केली.

इंडियन हॉटेल्स या कंपनीची भांडवल उभारणीवर विचार करण्यासाठी ९ ऑगस्ट २०२१ रोजी बैठक आहे.

अल्केमलॅब ही कंपनी USA मध्ये इब्युप्रोफेन आणि FAMATIDINE ही औषधे लाँच करणार आहे.

सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे मारुतीने आपल्या फॅक्टरीमध्ये १ शिफ्टचे वर्किंग कमी केले.तसेच ७ ऑगस्ट, १४ ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट २०२१ रोजी गुजरातमधील प्लांट बंद ठेवणार आहे. या सर्व बातम्यांमुळे मारुतीचा शेअर पडला.

टाटा स्टील BSL, सुब्रोस, भारत बिजली, BOSCH, कलाहस्ती पाईप्स या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या. अडाणी ग्रीन, सोलारा ऍक्टिव्ह फार्मा. करूर वैश्य बँक, चंबळ फर्टिलायझर्स, गोदरेज कन्झ्युमर यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

आज स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेला NII Rs २७६३८ कोटी तर अन्य उत्पन्न Rs ११८०२.०० कोटी झाले. प्रॉफिट Rs ६५०० कोटी झाले. लोन ग्रोथ ५.८% झाली. GNPA ५.३२% तर NNPA १.५०% झाले. बँकेच्या या निकालाला मार्केटने चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे SBI च्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.
देवयानी इंटरनॅशनल या कंपनीचा IPO आल्यामुळे त्याच क्षेत्रातील बेक्टर फूड्स आणि BARBEQ नॅशन या शेअर्समध्ये तेजी होती.

VI मध्ये कुमारमंगलम बिर्ला यांचा २७% स्टेक सरकारला ऑफर केला होता. पण सरकारने यावर फारसा अनुकूल प्रतिसाद न दिल्याने आज VI चा शेअर पडला.

आदित्य पुरी यांनी सोलारा ऍक्टिव्ह फार्माचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला.

PNB हौसिंगच्या कार्लाइल डीलला CCI (COMPETITION कमिशन ऑफ इंडिया) ची मंजुरी मिळाली. त्यामुळे PNB हौसिंगच्या शेअरला अपर सर्कीट लागले.

आज देवयानी इंटरनॅशनल, EXXON टाईल्स, KRSSN डायग्नॉस्टिक्स, आणि विंडलास बायोटेक या चारी कंपन्यांचे IPO पहिल्या दिवशीच पूर्ण भरले.

आज रिअल्टी क्षेत्रामध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. FII नी खरेदी चालू केली. PMI निर्देशांक, GST कलेक्शन, कॉरपोरेट निकाल आणि निर्यातीचे आकडे चांगले आले.

आज RBI च्या MPC ची दोन दिवसांची बैठक चालू झाली. ६ ऑगस्ट २०२१ रोजी RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४३६९ NSE निर्देशांक निफ्टी १६२५८ बॅंक निफटी ३६०२८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ०४ ऑगस्ट २०२१

  1. तेजस जयप्रकाश सावंत

    नमस्कार आजी..! मी तुमचे ब्लॉग आणि You टयूब channal वरील भाष्य अगदी कुतूहलाने पहतो.. अर्थात तुमचा ह्या क्षेत्रातील अभ्यास आणि अनुभव माझ्या वया एव्हडा किंबहुना त्याहून ही जास्तीच आहे.. पण आम्हा तरुणांना खरंच तुम्ही प्रेरणा स्थान आहात..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.