आजचं मार्केट – ०५ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०५ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $ ७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.२० च्या आसपास होता. US $ निर्देशांक ९२.३० USA १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड १.१९ VIX १३.०३ PCR १.७७ होते.

आज USA फेडच्या व्हाईस चेअरमन रिचर्ड यांनी सांगितले की डिसेंबर २०२१ पासून कदाचित बॉण्ड खरेदीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. USA मधील क्रूडची इन्व्हेंटरी वाढली आहे आणि डेल्टा व्हरायन्टचा संसर्ग वाढत असल्यामुळे मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रूडचे दर मंदीतच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.सौदी आरामको सप्टेंबर २०२१ पासून क्रूडचे दर वाढवणार आहे.

GE चे निकाल सुंदर आले पण शेअर मात्र ९% पडला. कारण टेक्नॉलॉजीमध्ये अडचणी येतील.USA चा जॉब डेटा असमाधानकारक म्हणजे ३ लाख आला.

चीन आपल्या स्टेट रिझर्व्ह मधून बेस मेटल्स विकत आहे. त्यामुळे मेटल्स मध्ये मंदी होती.होंडानी चीनमधील हुआन प्रांतातील ३ प्लांट बंद केले.

सुझुकी मोटर्सने २०२१चा ऑपरेशनल प्रॉफिट गायडन्स सेमी कंडक्टर्सच्या टंचाईमुळे कमी केला.यामुळे मारुतीचा शेअर पडला.

HDFC बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड इशू करण्यावर डिसेंबर २०२०मध्ये घातलेली बंदी RBI येत्या ५-६ आठवड्यात उठवण्याची शक्यता आहे. या संबंधातील चौकशी अंतिम टप्प्यात आहे.

स्वीगीने रिलायन्स BP मोबिलिटीबरोबर बॅटरी swaping स्टेशनसाठी करार केला.

ग्रीव्हज कॉटन ही कंपनी त्यांची चिंचवड जवळ असलेली जमीन Rs ३२० कोटींना विकणार आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नॉन कोअर ऍसेट विकण्यासाठी सरकारची परवानगी मिळाली.

बेअरिंगने कोफोर्ज मधील ५.५% स्टेक नोमुराला विकला.

कार्लाइलने SBI लाईफ मधील १.९% स्टेक विकला.

भारती एअरटेलने सांगितले की 5G लाँच करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आंध्र प्रदेशमध्ये पेट रिसायकलिंग प्लांट उभारणार आहे.

ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज गुजरातमध्ये Rs ५५० कोटी गुंतवून प्लांट उभारणार आहे.

सरकारने रस्तेबांधणीमधील काँट्रॅक्टर्सना त्यांचे पेमेंट त्वरित दिले जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांना येणारा लिक्विडिटीचा प्रश्न दूर होईल. याचा फायदा NCC, IRB इन्फ्रा, MEP, J.कुमार, दिलीप बिल्डकॉन,अशोका बिल्डकॉन इत्यादी कंपन्यांना होईल.

‘वन वेब’ ला २० वर्षांसाठी GMPCS/VSAT लायसेन्स मिळाले. यात भारती ग्लोबल,ब्रिटन सरकारची हिस्सेदारी आहे.
केम्प्लास्ट सनमार या कंपनीचा Rs ३८५० कोटींचा (फ्रेश इशू Rs१३०० कोटींचा आणि OFS Rs २५५० कोटींचा असेल). IPO १० ऑगस्ट २०२१ ला ओपन होऊन १२ ऑगस्ट २०२१ला बंद होईल. संनमार ग्रुप शिपिंग, केमिकल्स, इंजिनीअरिंग या क्षेत्रात कार्यरत आहे. फ्रेश इशूचे प्रोसिड्स Rs १२७० कोटींच्या EARLY डिबेंचर रिडम्प्शनसाठी वापरले जातील. याचा प्राईस बँड Rs ५३० ते Rs ५४१ असा असेल.

APTUS व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया या रिटेल फोकस्ड, ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील मुख्यतः सेल्फ एम्प्लॉईड लोकांना अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाला हाऊसिंग लोन देणाऱ्या कंपनीचा Rs २ दर्शनी किमतीच्या शेअर्सचा (प्राईस बँड Rs ३४६ ते Rs ३५३ आणि मिनिमम लॉट ४२ शेअर्सचा) येत आहे.हा IPO १० ऑगस्ट रोजी ओपन होऊन १२ ऑगस्टला बन्द होईल.

आज अडानी टोटल, टाटा कम्युनिकेशन, कॉस्मो फिल्म्स, टायटन, अपोलो टायर्स, सुमिटोमो केमिकल्स, गेल , पनामा पेट्रो, हिकल, कॅपलिन पाईंट( Rs १.५० प्रती शेअर लाभांश), CERA सॅनिटरीवेअर, अरविंद ( तोटा लक्षणीय कमी झाला),REC, बिर्ला कॉर्प, HPCL या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

आज पेपर उत्पादक कंपन्यांचे, IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

नुवोको व्हिस्ता या निरमा ग्रुपच्या सिमेंट उत्पादन करणाया कंपनीचा Rs ५००० कोटींचा IPO ९ ऑगस्ट २०२१ रोजी ओपन होऊन ११ ऑगस्टला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ५६० ते Rs ५७० असून यात फ्रेश इशू Rs १५०० कोटींचा आहे आणि OFS Rs ३५०० कोटींचा आहे. नुवोको ही भारतातीळ ५वी मोठी सिमेंट उत्पादक कंपनी असून तिचे ११ प्लांट आहेत. IPO प्रोसिड्स कंपनीचे कर्ज फेडण्याकरता वापरले जातील.

VI च्या एक्झ्युटिव्ह चेअरमन आणि डायरेक्टरच्या पदाचा कुमारमंगलम बिर्ला यांनी राजीनामा दिला. कंपनीत भांडवल घातले जात नसल्यामुळे कंपनीचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीला कर्ज देणाऱ्या इंडसइंड बँक,PNB, SBI आणि येस बँकेच्या शेअरवरही या घडामोडिंचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४४९२ NSE निर्देशांक निफ्टी १६२९४ बँक निफ्टी ३५८३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.