Monthly Archives: September 2021

आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७८.७५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.३२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५० VIX १८.५० PCR ०.८७ होते.

आज मार्केट F & O च्या एक्स्पायरीमुळे खूपच वोलटाइल होते. चीनमध्ये EVERGRANDE या दोन नंबरच्या कंपन्यांबरोबरच इतर रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थीक अडचणी वाढत आहेत. चीनच्या स्थानिक सरकारने खूप कर्ज घेतले आहे. हे कर्ज बॅलन्स शीटमध्ये दाखवत नाहीत.सरकार खर्च भागवण्यासाठी विजेचे दर वाढवत आहेत.
तसेच चीनमध्ये मेटल अलॉईजची टंचाई जाणवत आहे. विशेषतः फेरो सिलिकॉन आणि फेरो मँगेनीजची टंचाई जाणवत आहे. या मुळे भारतात फेरो सिलिकॉन आणि फेरो मँगेनीज बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. उदा. श्याम मेटॅलिक्स, मैथॉन अलॉयज

चीनमधून आयात होणाऱ्या डेकोर पेपरवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावण्याची DGTR ने शिफारस केली आहे. याचा फायदा ITC ला होईल.

USA च्या फायनान्स सेक्रेटरीनीही इशारा दिला आहे की त्यांच्याकडे आता जेमतेम १५ ते २० दिवस प्रशासकीय खर्च चालविण्याइतकी कॅश आहे. त्यामुळे त्यांनी हाउस ऑफ रिप्रेझेंटीव्ह्जना अंदाज पत्रक वाढवण्याची विनंती केली आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी RBI ने ७.९५ बेस रेट ठरवला.

भारती एअरटेलने आज NXTRA च्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. येत्या दोन ते तीन वर्षांत भारती एअरटेल ७ मोठ्या डेटा सेंटर्सवर Rs ५००० कोटी एवढी गुंतवणूक करेल.

सणासुदीच्या मौसमात निर्यात वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. या साठी ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग असिस्टंसची मर्यादा वाढवणात आहेत. या अंतर्गत लेदर. टेक्सटाईल्स, ज्वेलरी इत्यादी सेक्टर येतील.

ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की हायड्रोजन प्लांटच्या जवळपास रोड. पूल इत्यादी इंफ्रासाठी सरकार मदत करेल.
सरकार साखरेपासून बनवलेल्या एथॅनॉलच्या दरात Rs १.५० प्रती लिटर वढी वाढ करण्याची शक्यता आहे. सरकारचे इथेनॉल उत्पादन आणि त्याचे ब्लेंडींग वाढवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. १ डिसेम्बरपासून इथेनॉल सप्लाय सुरु होईल.
दिलीप बिल्डकॉनला दिलेला मनाई हुकूम हटवल्यामुळे ते आता NHAI च्या प्रोजेक्टसाठी बीड करू शकेल.

१ ऑक्टोबर ( ऑक्टोबर सिरीज) पासून अबॉट लॅबोरेटरीज, इंडिया सिमेंट, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, दालमिया भारत, डेल्टाकॉर्प, JK सिमेंट, ओबेराय रिअल्टीज, पर्सिस्टंट सिस्टिम्स ह्या आठ कंपन्यांचे शेअर्स F & O सेगमेंटमध्ये समाविष्ट होतील.

इन्व्हेस्को या झी एंटरटेनमेंटच्या शेअरहोल्डरने कंपनीची एक्स्ट्रा ऑर्डीनरी जनरल मीटिंग बोलावण्यासाठी कंपनीला विनंती केली होती. कंपनीने ही EGM २१ दिवसांच्या आत बोलवायला पाहिजे होती. कंपनीने EGM बोलावली नाही त्यामुळे इन्व्हेस्कोने NCLT कडे धाव घेतली . NCLT ने सांगितले की शेअरहोल्डर्सच्या EGM बोलावण्याच्या विनंतीला कंपनी नकार देऊ शकत नाही.

संरक्षण मंत्रालयाने आज Rs १३१६५ कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली. यात ४९६२ रॉकेट्स, २५ मार्कंड हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे डीझोल्युशन करून त्यांचा कर्मचारी वर्ग आणि मालमत्ता वेगवेगळ्या PSU कडे वर्ग केले.

RBI ने काही अटीवर इंडियन ओव्हरसीज बँकेला PCA मधून बाहेर काढले. त्यामुळे या बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.
JK सिमेंटने त्यांच्या राजस्थानमधील क्लिंकर उत्पादन प्लांटची क्षमता ६५५० टन केली.

SRF या कंपनीने त्यांच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट १४ ऑक्टोबर २०२१ तर IRCTC ने आपल्या शेअर स्प्लिटसाठी २९ ऑक्टोबर २०२१ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली.

इनोव्हेशन, नवीन क्षेत्र आणि नवीन तंत्रज्ञान यामुळे ऍडव्हान्स एन्झाईम या कंपनीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अडानी ग्रीन ही कंपनी व्हेंटो एनर्जी या कंपनीला खरेदी करणार आहे.

‘RYALTRIS’ च्या मार्केटिंगसाठी युरोपियन युनियनमधील १३ देशात आणि UK मध्ये ग्लेनमार्क फार्माला परवानगी मिळाली.

PLI योजनेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना LOI ( लेटर ऑफ इन्टेन्ट) द्यायला DOT ने सुरुवात केली आहे. या कंपन्यांना २% ते ६% इन्सेन्टिव्ह दिली जाईल. ही Rs १२१९५ कोटींची योजना आहे. ITI, तेजस नेटवर्क, डिक्सन, अंबर
टाटा स्टीलने त्यांचा NatSteel होल्डिंग pte मधील आपला स्टेक Rs १२७५ कोटींना विकला. याचा विनियोग कर्ज फेडण्याकरता करू असे व्यवस्थापनाने सांगितले.

पर्सिस्टंट सिस्टिम्स ही कंपनी सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन इंटरनॅशनल आणि श्री इन्फोसॉफ्ट या दोन्ही कंपन्या US $ ६० मिलियनना खरेदी करणार आहे . बँकिंग फायनान्सियल सर्व्हिसेस आणि इन्शुअरन्स यांना सेवा पुरवण्यात मदत होईल. या क्षेत्रात क्लाउड आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर मधील क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यामुळे कंपनीचा शेअर लक्षणीय तेजीत होता.

सरकारचा टॅक्स रेव्हेन्यू Rs १.६४ लाख कोटी झाला. रेव्हेन्यू गॅप कमी होऊन Rs ३.११ लाख कोटी झाली. फिस्कल डेफिसिट ४.६८% झाली.

शिपिंग कॉर्पोरेशनमधील नॉनकोअर ऍसेट वेगळे काढून त्याची एक वेगळी कंपनी बनवली जाईल. SCI च्या शेअरहोल्डर्सना या डीमर्ज्ड एंटिटीचा त्यांच्या कडे असलेल्या १ शेअरमागे १ शेअर मिळेल. ही नवीन कंपनी नंतर स्टॉक एक्सचेंजीसवर लिस्ट केली जाईल.

वेदांता SCI साठी बीड देण्याची शक्यता आहे.

इनॉक्स लेजर आणि ITC मध्ये इनॉक्सच्या थिएटर्समध्ये फूड इटेम्स , रेडी टू इट, GOURMET ब्रँड किचन्स मधून पुरवण्यासाठी करार झाला. त्यामुळे दोन्ही शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९१२६ NSE निर्देशांक निफ्टी १७६१८ बँक निफ्टी ३७४२५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७८.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९३.८० USA १० वर्षे बॉण्ड यील्ड १.५६ तर USA ३० वर्षे बॉण्ड यिल्ड २.०९ VIX १९.२९ तर PCR ०.७९ होते.

आज ५ वर्षे १० वर्षे ३० वर्षे मुदतीच्या बॉण्ड्सचे यिल्ड वाढले. क्रूड, कोळसा, नैसर्गिक गॅस, वीज या सर्व इंधनांची किंमत वाढत आहे. त्यामुळे फेडने सांगितले की ही वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या कारणांमुळे झालेली महागाई आहे त्यामुळे ती अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकू शकते.

स्टॅंडर्ड लाईफने HDFC AMC मधील १.०६% स्टेक विकला तर KKR ने मॅक्स हेल्थकेअरमधील ६.६% स्टेक बल्क डील रूट दवारा विकला.

अतुल ऑटोने बाबला प्लांटमध्ये थ्री व्हिलर्सचे उत्पादन सुरु केले.

मोरेपन लॅब वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी वेगळे युनिट स्थापन करणार आहे.

ल्युपिनने ‘DROXIDOPA ‘ या टॅब्लेट्स लाँच केल्या.

अमेझॉन वेब सर्व्हिसेसबरोबर HCL टेक ने करार केला.

इंडिगोने कोड शेअरिंग करार US एअरलाईनबरोबर केला.

आज व्हॅक्सिन निर्यातीला परवानगी मिळाली. आता भारताची व्हॅक्सिनची गरज भागल्यामुळे
स्पुटनिक V हे व्हॅक्सीन निर्यात करायला परवानगी दिली.

ब्ल्यू स्टार आंध्र प्रदेशातील नवीन मॅन्युफॅक्चरिन्ग प्लांट मध्ये Rs ५५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली.

हौसिंगयुनिट विक्री QOQ आणि YOY दोन्ही मापदंडाने वाढली. दुप्पट झाली.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी झायडस कॅडिला त्यांची कोविड व्हॅक्सिन लाँच करणार आहे.

ब्रिटानियाने अक्सेंच्युअर या कंपनीबरोबर डिजिटल ऑपरेशनसाठी करार केला.

त्रिवेणी इंजिनीअरिंग इथेनॉल उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी Rs ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

NCLT ने किशोर बियाणी यांना फ्युचर ग्रुपचे ऍसेट्स रिलायन्स रिटेलला विकण्यासाठी फ्युचर्सच्या शेअरहोल्डर्सची आणि लेंडर्सच्या मंजुरी साठी शेअरहोल्डर्स आणि लेंडर्स यांची मीटिंग बोलवायला परवानगी दिली.

ब्ल्यू डार्ट या कंपनीने ऍव्हरेज शिपमेंट प्राईस मध्ये ९.६%ची वाढ केली. ही दरवाढ १जानेवारी २०२२ पासून लागू होईल.
L & T त्यांचा थर्मल पॉवर बिझिनेस सिंगापूरस्थित SEMBCORP इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या भारतातील युनिट बरोबर मर्ज करण्यासाठी बोली करत आहे. L & T त्यांचे Rs १०,००० कोटींचे कर्ज मर्ज्ड एंटीटी कडे ट्रान्स्फर करेल. हे एक ऑलशेअर्स स्वॅप डील असेल.

सरकार निर्यात वाढवण्यासाठी एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिम्रिटेड या कंपनीचे IPO रूटने लिस्टिंग करेल. सरकार या ECGC मध्ये Rs ४४०० कोटींची गुंतवणूक करेल.

पिरामल एंटरप्रायझेस यांनी DHFL च्या थकबाकीसाठी मंजूर झालेल्या रेझोल्यूशन प्लॅन प्रमाणे कॅश+सिक्युरिटीज( १४७०० कोटी रोख आणि १९५५० कोटी १० वर्षे NCD) या रूपात RS Rs ३४२५० कोटी एवढी रकम बँकांना येत्या एक दोन आठवड्यात देईल. यामध्ये बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. आतापर्यंत IBC अंतर्गत झालेले सर्वात मोठे रेझोल्यूशन आहे. या रेझोल्यूशननंतर जी मर्ज्ड एंटीटी यतयार होईल तिचे नाव प्रमाण कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स असे असेल.

आज मार्केटमध्ये सुरुवातीला मंदीचं वातावरण होते. पण दुसऱ्या अर्धात मार्केटने जणू काही आपली मरगळ चिंता झटकून टाकली आणि अर्ध्या तासात पडलेले मार्केट पुन्हा पहिल्या स्तरावर आलं. IT, केमिकल क्षेत्रात सकाळी असलेली मंदी दुपारच्या अर्धात मार्केटने झटकून टाकली.. एनर्जी ऑइल गॅस आणि वीज क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपन्या याला अपवाद होत्या. त्या लक्षणीय तेजीत होत्या उदा:- PFC, पॉवर ग्रीड REC ,टॉरंट पॉवर, टाटा पॉवर, GIPCL, NLC, NTPC तसेच निवडक रिअल्टी शेअर्समध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९४१३ NSE निर्दशांक निफ्टी १७७११ बँक निफ्टी ३७७४३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ८० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.६३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५२ VIX १८.५२ PCR ०.७७ होते.

आज क्रूडने US $ ८० प्रती बॅरलची पातळी ओलांडली. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ओपेक+ची बैठक आहे. आज सगळा डेटा मंदीच्या बाजूचा होता. रुपया घसरला, क्रूड महागले, गॅस, ऑइल, क्रूड, वीज या ऑइल आणि गॅस सेक्टरमधील सर्व घटकांचे दर वाढल्यामुळे महागाई वाढणार हे निश्चित आहे. US $ मजबूत होतोय तर रुपया ढासळतोय. वाढणाऱ्या बॉण्ड यिल्डमुळे इक्विटी मार्केटमधून गुंतवणूक BOND मार्केटमध्ये जाण्याची शक्यता. अनलॉक आणि येऊ घातलेला हिवाळा यामुळे मागणीमध्ये होत असलेली वाढ म्हणून एनर्जी क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यांचा योग्य तो मेळ बसत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील वाढलेले दर सर्व क्षेत्रात महागाई वाढवायला कारणीभूत ठरतात.

कॅप्रोलॅक्टम वर अँटी डम्पिंग ड्युटी लावली. याचा फायदा GSFC ला होईल.

मान इन्फ्रा ४ ऑक्टोबर रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत बोनस वर विचार करणार आहे.

IRCTC जो प्रवासी विमा देते त्यासाठी कंपनीने चार कंपन्यांना शॉर्टलिस्ट केले आहे. ओरिएंट इन्शुअरन्स, ICICI लोंबार्ड आणि लिबर्टी यांचा समावेश आहे

चेरिकॉफ १२ हे कफ सिरप सन फार्माने लाँच केले.

HDFCने Rs ११०० कोटीचा ऍडव्हान्स टॅक्स भरला

ERICA P.B. ह्या कंपनीला व्हरपूल विकत घेणार आहे.

‘BHEL’ ला गोवा शिपयार्ड कडून वॉरशिप गन माऊंट साठी ऑर्डर मिळाली.

ITDC च्या कंपनीच्या हॉटेल्सच्या डिमॉनेटायझेशनच्या प्रक्रियेला आता चांगलाच वेग येईल. या विक्रीच्या अटी उदा लीजची मुदत वाढवणे, ट्रॅन्झॅक्शन चार्जेस कमी करणे असे उपाय सरकारपुढे विचारार्थ आहेत.

सरकारने सोशल स्टॉक एक्स्चेंज चालू करण्यासाठी परवानगी दिली. सोशल संस्था , नॉनगव्हर्नमेन्ट ऑर्गनायझेशन. वेल्फेअर ऑर्गनायझेशन, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स ज्या आरोग्य, पर्यावरण यांच्यासाठी कार्य करतात.अशा संस्था या एक्स्चेंजवर लिस्ट होऊ शकतील. तसेच नो प्रॉफिट बेसिसवर काम करणाऱ्या संस्था या स्टॉक एक्स्चेंज वर लिस्ट होतील.
पॉवर एनर्जी गॅस ऑइल या सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.बाकीच्या सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. आज सरकारी कंपन्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, REC या कंपन्यात लक्षणीय तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९६६७ NSE निर्देशांक निफ्टी १७७४८ बँक निफ्टी ३७९४५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१ = Rs ७३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.२२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४८ VIX १७.६२ PCR ०.९६ होते.

आज USA, युरोप मधील मार्केट्स तेजीत होती. शुक्रवारी मार्केट्स फ्लॅट होती. क्रूड वाढत आहे. ‘EVERGRANDE’ च्या बाबतीत चीन सरकारने हात झटकले आहेत.

हा F & O चा एक्स्पायरी वीक आहे.

उसाची SAP वाढवून Rs ३०० प्रती क्विंटल केली. त्यामुळे आज साखर उत्पादक कंपन्यांमध्ये तेजी होती.
CCI (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया)ने कार्टलायझेशन केले म्हणून युनायटेड ब्रुअरीज या कंपनीला Rs ७०० कोटी दंड केला. त्यामुळे हा शेअर मंदीत होता.

टाटा स्टील आणि ONGC यांनी आतापर्यंतचा या वर्षांसाठी सगळ्यात जास्त ऍडव्हान्स टॅक्स भरला आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. .

NBCC ला मालदीवमधून Rs ९६८ कोटींची ऑर्डर मिळाली.

बायोकॉनच्या मलेशियन मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या केलेल्या १३ सप्टेंबर २०२१ ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने ६ त्रुटी दाखवल्या.आणि फॉर्म ४८३ इशू केल्या.

GMR इन्फ्राचे प्रमोटर्स सातत्याने शेअर्स विकत आहेत.

अनलॉकच्या प्रोसेसमध्ये निरनिराळी राज्य सरकारे थिएटर्स, ऑडिटोरियम, शाळा सुरु करायला परवानगी देत आहेत. त्यामुळे एंटरटेनमेंट उद्योगातील शेअर्स तेजीत होते. उदा PVR इनॉक्स लेजर, मुक्ता आर्ट्स, UFO मुव्हीज, नवनीत एज्युकेशन,

न्यूक्लिअस सॉफ्टवेअर ही कंपनी Rs ७०० प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर रूटने २३ लाख शेअर्स बायबॅक करणार आहे. यासाठी कंपनी Rs १५८ कोटी खर्च करेल.

सनसेरा इंजिनीअरिंग या कंपनीमध्ये बऱ्याच म्युच्युअल फंडांनी खरेदी केली असे बल्क डील व्यवहारातून समजते.
इन्व्हेस्को आणि OFI ग्लोबल चीन IIC या झी एंटरटेनमेंटमध्ये १७.८८% शेअरहोल्डिंग असलेल्या दोन शेअरहोल्डर्सनी आज पुन्हा झी इंटरटेन्मेण्टची EGM बोलावण्याची मागणी केली

झी आणि सोनी यांच्या मर्जर संबंधात सध्या अस्तित्वात असलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स निर्णय घेऊ शकत नाही. तसेच पुनीत गोएंका यांच्या नेमणुकीवर हरकत घेतली. इन्वेस्कोने पुन्हा एकदा EGM बोलावण्याची मागणी केली आणि या EGM मध्ये निवड झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पुढचे निर्णय घ्यावेत अशी मागणी केली आहे. या मीटिंग मध्ये योग्य आणि स्वतंत्र कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी व्यवस्था करावी. तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये ६ स्वतंत्र डायरेक्टर्सची नेमणूक व्हावी. इन्वेस्कोने त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर प्रतिनिधित्व द्यावे अशीही मागणी केली आहे.

जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कोर्टात जाऊ असे इन्व्हेस्कोने सांगितले. याचा परिणाम म्हणजे ह्या मर्जरला उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झी एंटरटेन्मेन्ट आणि सोनीचे मर्जर होणार आहे या अपेक्षेने होत असलेल्या खरेदीला काहीशी खीळ बसली.

नैसर्गिक गॅसच्या किमती US $ ५.१९/mmbtu एवढ्या वाढल्या आहे. आता गॅस रिअलायझेशन मध्ये US $१ प्रत्येक MMBTU गणिक वाढ होईल.

OAKNORTH होल्डिंग मधील स्टेक इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सने विकला.

बोईंग मॅक्स एअरक्राफ्टची उड्डाणे ५ ऑक्टोबरपासून सुरु होतील. यासाठी २० वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
सरकारी कंपन्यांकडे असलेल्या शिलकी जमिनीचे मॉनेटायझेशन आणि त्याबाबत सल्ला मसलत करण्यासाठी सरकारने नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशनची स्थापना केली.ही बातमी आल्यावर SCI, BEML MTNL या शेअर्समध्ये तेजी आली.

चीन मधील कागदाची प्रमुख सप्लायर ९ ड्रॅगन कंपनीने कागदाच्या किमती वाढवल्यामळे पेपर उत्पादक शेअर्स मध्ये तेजी आली.

आज सुरुवातीला मार्केटमध्ये सुरुवात मजबूत झाली पण हळूहळू मार्केट मंदीत जात राहिले. दुसऱ्या अर्धात मात्र मार्केटने स्वतःला सावरले. आज रिअल्टी, सिमेंट, ऑइल & गॅस, ऑटो, शुगर आणि पेपर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती. IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मंदी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६००७७ NSE निर्देशांक निफ्टी १७८५५ बँक निफ्टी ३८१७१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७७.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.७५ च्या आसपास US $ निर्देशांक ९३.१८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४१ VIX १७.०० आणि PCR १.१२ होते.

जपानमध्ये महागाई ११ महिन्यांच्या खालच्या स्तरावर आहे. मागणी वाढली, साठा कमी झाला म्हणून क्रूड आज US $ ७७ प्रती बॅरल च्य वर गेले. भारतीय मार्केटमध्ये गुंतवणूक येत आहे.

ACCENTURE चा चौथ्या तिमाहीचा रिझल्ट चांगला आला. कंपनीने भविष्यासाठी गायडन्स चांगला दिला. त्यामुळे IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी आली.

VPR मायनिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिलीप बिल्डकॉन याची पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन यांनी PACHHWARA सेंट्रल ब्लॉक कोळशाच्या डेव्हलपर आणि ऑपरेटर म्हणून केलेली नेमणूक सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केली. हे कॉन्ट्रॅक्ट हा Rs ३२००० कोटींची होती.

कोळशाच्या खाणींच्या लिलावात ८ कोळशाच्या खाणी ज्यांनी जिंकल्या होत्या त्यांच्याशी कोल इंडिया करार करणार आहे. याचा फायदा छोट्या स्टील कंपन्यांना होईल. उदा प्रकाश इंडस्ट्रीज, सन फ्लॅग आयर्न

इंडियन बँकेने Rs १३२ कोटी आणि Rs १७२ कोटी बाकी असलेले एकूण Rs ३०४.०० कोटींचे दोन अकाउंट NPA आणि फ्रॉड खाती घोषित केली. म्हणून बँकेच्या शेअरमध्ये मंदी होती.

वेदांता त्यांचे ADR न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज वरून डीलीस्ट करणार आहे.

सोयाबीनच्या किमती कमी होत आहेत. याचा फायदा पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या आणि वेंकीज,गोदरेज अग्रोव्हेट यांना होईल.

आदित्य बिर्ला सन लाईफ AMC चा Rs २७७० कोटींचा IPO येत आहे. याचा प्राईस बँड Rs ६९५ ते Rs ७१२ असून मिनिमम लॉट २० शेअर्सचा आहे. हा IPO २९ सप्टेंबर २०२१ रोजी ओपन होऊन १ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद होईल. हा IPO म्हणजे कॅनडियन पार्टनर सन लाईफ यांचा १२.५% स्टेक आणि AB कॅपिटल्सचा १ % स्टेक साठी अशी OFS आहे.
सरकारने कमर्शियल VSAT लायसेन्सच्या अटी सोप्या केल्या. याचा फायदा नेल्को आणि GNFC ला होईल. आता VSAT ज्यांच्याकडे आहे त्या कंपन्या कनेक्टिव्हीटी देऊ शकतील.

सन्सेरा इंजिनीअरिंग या कंपनीच्या शेअरचे NSE वर Rs ८११.५० आणि BSE वर Rs ८११.३५ वर लिस्टिंग झाले.

आज भारतीय मार्केटने सेन्सेक्स ६०००० चा टप्पा क्लोजिंग बेसिसवर पार केला. ५०००० ते ६०००० हा सेन्सेक्सचा प्रवास फक्त ९१ सेशन्स मध्ये झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६००४८ NSE निर्देशांक निफ्टी १७८५३ बँक निफ्टी ३७८३० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७६.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs. ७३ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.४६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३० VIX १६.४९ PCR १.१५ होते.

आज फेडने आपल्या बैठकीत जाहीर केले की आम्ही तूर्तास व्याज दरात कोणताही बदल करत नाही तसेच रोजगारातील समाधानकारक प्रगती आणि महागाईवरचे नियंत्रण यशस्वी झाले आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोव्हेंबर २०२१ आणि उशीरात उशीरा २०२२ च्या मध्यापासून आम्ही बॉण्ड खरेदीमध्ये कपात करायला सुरुवात करू.२०२२ पासून व्याजदर वाढवायला सुरुवात करू आणि २०२४ पर्यंत ५ ते ६ वेळा ही वाढ केली जाईल. फेडच्या या निर्णयामुळे मार्केटने सुटकेचा सुस्कारा सोडला.

दुसरीकडे ‘EVERGRANDE’ या चिनी रिअल इस्टेट दिग्गज कंपनीने सांगितले की आम्ही कर्जावरील व्याज वेळेत आणि पूर्णपणे फेडू. चीनची सेंट्रल बँक अल्प मुदतीसाठी चीनच्या अर्थव्यवस्थेत US $ १८.८ बिलियन एवढा पैसा इंजेक्ट करेल.
या दोन्ही महत्वाच्या बाबतीत अनुकूल खुलासा आल्यामुळे USA ,युरोप, आशिया आणि भारतातील मार्केट्स तेजीत होती.

USA मध्ये क्रूडचा साठा कमी आणि मागणीत वाढ यामुळे आज क्रूडने US $ ७६ प्रती बॅरेलची पातळी ओलांडली.

भारती एअरटेलने त्यांच्या राईट्स इशूसाठी २८ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. हा Rs २१००० कोटींचा राईट्स इशू ५ ऑक्टोबर २०२१ रोजी ओपन होऊन २१ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद होईल. भारती एअरटेलने जुलै महिन्यात नवीन १९ लाख ग्राहक जोडले.

मेट्रोपॉलिटन मार्केट्स मधील ऑप्टिकल नेटवर्क क्षमता वाढवण्यासाठी भारती एअरटेलने तेजस नेटवर्कची निवड केली आहे.

कल्पतरू पॉवरला रवांडा एनर्जी ग्रुप बरोबरच्या केसमध्ये Rs २३६ कोटींचे आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.

मूडीज ही आंतराष्ट्रीय ख्यातीची रेटिंग एजन्सी भारताचे रेटिंग वाढवणार आहे.

पारस डिफेन्स & स्पेस या कंपनीचा IPO २३३ वेळा भरला.

सरकार लवकरच पर्यटन धोरणाची घोषणा करेल. हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्सना इंफ्राचा दर्जा मिळेल. सरकार ५ लाख पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचा विचार करत आहे. विमान कंपन्यांना ८५% क्षमतेवर काम करायला परवानगी दिली. जुलै २०२१ नंतर ऑक्युपन्सी रेट मध्ये वाढ झाली आहे.

टाटा एअरबस उत्पादन करण्यासाठी उत्तर प्रदेशात प्लांट उभारणार आहे. टाटा भारतीय लष्कराला ५६ एअरबस पुरवतील. टाटांबरोबर सरकारने हे Rs २६००० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट केले.

JBM ऑटोला ५०० इलेक्ट्रिक आणि CNG बसेसची ऑर्डर मिळाली.

एशियन पेंट्स ही कंपनी त्यांच्या VIZAG येथील प्लांटची क्षमता ५ लाख किलोलिटरपर्यंत वाढवणार आहे.

हिरो इलेक्ट्रिक त्यांची उत्पादन क्षमता १लाख युनिटवरून २०२२ पर्यंत ५ लाख युनिट करणार आहे.

ज्युबिलण्ट इंग्रेव्हियाची सबसिडीअरी ज्युबिलण्ट लाईफ त्यांचा ‘सेफ फूड कॉर्प’ मधील १०% स्टेक Rs १३४.२० कोटींना विकणार आहे. ज्युबिलण्ट फूड्स ही कंपनी ‘WELLVERSED हेल्थ’ मधील २५% स्टेक खरेदी करणार आहे.

IRCTC एअरपोर्टच्या धर्तीवर १२ शहरात एक्झिक्युटिव्ह लाउंज बांधणार आहे. तसेच फूड प्लाझा बांधणार आहे. या एक्झिक्युटिव्ह लाउंज मध्ये लायब्ररी, MULTICUSIN असेल. IRCTC या वर प्रती लाउंज Rs २ कोटी ते Rs ४ कोटी खर्च करेल. पाटणा, बनारस आणि चंदीगड यांचा यात समावेश असेल.

सरकार तीन वर्षात ७ मेगा टेक्सटाईल पार्क्स बनवणार आहे. हा प्रत्येक पार्क १०० एकर जागेत बनवला जाईल.

KPIT टेक ही कंपनी ‘फ्युचर मोबिलिटी’ या कंपनीत २५% स्टेक घेणार आहे.

USA मध्ये ‘AFFLE’ या कंपनीला ड्रायव्हिंग APP इन्स्टालेशन टेक्नॉलॉजी साठी पेटंट मिळाले.

कुबोटा ही जपानी कंपनी एस्कॉर्टस मधील आपला स्टेक वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनी एस्कॉर्टसबरोबर R & D सेंटर चालू करणार आहे.

GR इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला NHAI कडून ९३० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

टेलिकॉम कंपन्यांना कोणतेही उपकरण लावण्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. GRM ओव्हरसीज या कंपनीने आपल्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट केले.

आज भारतीय मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी होती. निफ्टीने १७८४३ तर सेन्सेक्सने ५९९५७ हे इंट्राडे ऑल टाइम हाय रेकॉर्ड केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८८५ NSE निर्देशांक निफ्टी १७८२२ तर बँक निफ्टी ३७७७१ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७५.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३३ VIX १६.४५ PCR १.३८ होते.

जागतिक मार्केट्स फेड मिटींगच्या निर्णयाची वाट बघत आहेत. आज डाऊ जोन्स आणि S & P किंचित मंदीत होते. तर NASHDAQ माफक तेजीत होते. ‘EVERGRANDE’ त्यांच्या बॉण्ड्सवरील कुपनची पेमेंट करणार आहे. म्हणून आज मार्केट्समध्ये मेटल्स शेअर्समध्ये पुन्हा तेजी दिसली. .

आजची मोठी बातमी म्हणजे झी एंटरटेनमेंट या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीच्या सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियामधील मर्जरला सैद्धांतिक मंजूर दिली. या साठी ९० दिवसांच्या मुदतीत द्यु डिलिजन्स करायचा आहे. दोनही कंपन्या नॉनकॉम्पिट अग्रीमेंट करतील. सोनी पिक्चर्स US $ १५७.५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा उपयोग कंपनीचा विस्तार करण्यासाठी केला जाईल मर्ज्ड एंटिटीमध्ये सोनी पिक्चर्सचा ५२.३% स्टेक असेल. तसेच ती भारतीय स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्टेड राहील. आणि तिचे CEOआणि MD पुनीत गोएंका असतील. या बातमीनंतर हा शेअर लक्षणीय तेजीत होता.

टॉरंट पॉवर सूर्या विद्युत मध्ये १००% स्टेक घेणार आहे. सूर्या विद्युत ही CESC चा आर्म आहे. टॉरंट पॉवर १५६ MV विंड पॉवर प्रोजेक्ट Rs ७९० कोटींना विकत घेणार आहे यासाठी हा शेअर खरेदी करार केला.

जेफरीने त्यांच्या मॉडेल पोर्टफोलिओमध्ये ITC चा समावेश केला.

फिनोलेक्स केबल्सनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमांचे नीट पालन केले नाही अशी शक्यता आहे.

ब्लिंक UX ही कंपनी MPHASIS ने US $ ९४ मिलियन्सना घेतली.

काल कर्नाटक राज्य सरकारने Rs ३५ लाख ते Rs ४५ लाख या दरम्यानच्या घरांच्या किमतींवरील स्टॅम्पड्युटीमध्ये सवलत जाहीर केली. यामुळे साऊथ बेस्ड रिअल्टी कंपन्या उदा प्रेस्टिज, शोभा, पुर्वांकारा, ब्रिगेड, तसेच कोलते पाटील,DLF,

ओबेराय रिअल्टीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. यामधील काही कंपन्यांचे कर्नाटकात विशेषतः बंगलोरमध्ये हाऊसिंग तसेच कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत.

जागतिक मार्केट मध्ये केमिकल्सच्या किंमत वाढत आहेत. सोडा ऍश च्या किमती ५५% ने वाढल्या आहेत.याचा फायदा GHCL, टाटा केमिकल्स या कंपन्यांना होईल.

अर्थव्यवस्था हळू हळू ओपन होत आहे. व्हॅक्सिनेशनचे प्रमाण वाढल्यामुळे निर्बंधांचे स्वरूप सौम्य होत आहे. त्यामुळे पुन्हा मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योगाला बरे दिवस येतील. कंपन्या त्यांच्या बजेटमध्ये जाहिरातीसाठी खर्चा ( प्रिंट आणि टेलिमेडिया) साठी तरतूद वाढवत आहेत. त्यातच आज झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्या मर्जरची प्राथमिक स्वरूपात घोषणा झाली. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे आज सिनेलाईन, UFO मुव्हीज, सन टीव्ही, PVR, इनॉक्स लीजर या एंटरटेनमेंट उदयोगाशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

कार्नेक्स मायक्रो या कंपनीमध्ये २६% स्टेक म्हणजे ३२,५०,०००शेअर्स Rs ७४.५० प्रती शेअर्स या भावाने कंपनीच्या वर्तमान शेअरहोल्डर्सना ऑफर केले जातील.MANTHENAA’कडून ही ओपन ऑफर आणली जात आहे.

जेफ्रिजने टाटा स्टिल आणि SBI चे वेटेज कमी केले तर ITC चे वाढवले.

इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स FCCB च्या रूटने US $ १६५ मिलियन उभारणार आहे.

सरकार LIC च्या IPO मध्ये परदेशी गुंतवणूकदारांना २०% स्टेक घ्यायला परवानगी देण्याची शक्यता आहे

टाटा पॉवर US $ ७५० मिलियन एवढी गुंतवणूक ग्रीन बिझिनेस मध्ये करणार आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये रबराच्या किमती खूप कमी झाल्या आहेत तर कॉफीचे शॉर्टेज होत आहे. याचा फायदा रबर हे केमिकल आणि टायर इंडस्ट्रीमध्ये कच्चा माल म्हणून वापरले जात असल्यामुळे टायर उत्पादक तसेच केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.कॉफी चे उत्पादन कमी झाल्यामुळे कॉफीच्या किमती वाढल्या आहेत. याचा फायदा कॉफी उत्पादक कंपन्या उदा टाटा कॉफी, टाटा कंझ्युमर प्रोडक्टस कॅफे कॉफी डे या कंपन्यांना होईल.

अडाणी ट्रान्समिशन येत्या १० वर्षात US $ २० बिलियन एवढी गुंतवणूक ग्रीन एनर्जीमध्ये करेल.

पारस डिफेन्स हा IPO ४० वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८९२७ NSE निर्देशांक निफ्टी १७५४६ बँक निफ्टी ३६९४४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.२३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३१ VIX १६ च्या आसपास तर PCR १.३९ होते.

आजपासून FOMC ची मीटिंग सुरु झाली गुरुवारी या मीटिंगचा निर्णय समजेल. कालचा डेटा जेव्हा बघितला तेव्हा असे दिसले की FPI नी विक्री केली नव्हती तर भारतीय संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री दिसली. काही लोकांचे असे म्हणणे आहे की ‘EVERGRANDE’ या रिअल इस्टेट डेव्हलपरवर आलेले संकट आणि चीनमधील बदललेले कायदेकानू या दोन्हीमुळे भारतात येणारा गुंतवणुकीचा ओघ वाढेल. आणि हेच नेमके कालच्या डेट्यावरून दिसले.

आज कार्लाइल ने SBI कार्डस मधील ३.४% स्टेक Rs १०२१ ते Rs १०७२ या रेंजमध्ये विकून US $ ४४३ मिलियन म्हणजेच Rs ३२६७ कोटी उभारले. त्यामुळे SBI कार्डसचा शेअर आज मंदीत होता.

HCL TECH ने ५ वर्षांसाठी MKS इंस्ट्रुमेंट्स बरोबर डिजिटल आणि क्लाउड एनेबल्ड ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला त्यामुळे HCL टेक चा शेअर तेजीत होता

अडानी पोर्टला आंध्र प्रदेश राज्य सरकारकडून गंगावरम पोर्ट मधील १०.४% स्टेक खरेदी करण्यासाठी CCI कडून परवानगी मिळाली.

कर्नाटक सरकारने Rs ४५ लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांवरची स्टॅम्प ड्युटी २ % ने कमी केली. याचा परिणाम साऊथबेस्ड रिअल्टी कंपन्यांवर होईल.

टाटा मोटर्स १ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांच्या वाहनांच्या किमती २% ने वाढवणार आहे.

टेक्समॅको रेल ही कंपनी ट्रॅक मेंटेनन्स आणि रेल सिग्नल्स या बीझिनेस मध्ये प्रवेश करणार आहे.

सरकार हॉटेल अशोक ६० वर्षांकरता लीजवर देऊन Rs ७००० कोटी उभारणार आहे.

सरकारने अमोनियम नायट्रेट हँडलिंग च्या नियमात बदल केले.

गॅस कंटेनरमध्ये QR कोड असला पाहिजे. सेफ्टीसंबंधातील इन्स्पेक्शन थर्ड पार्टिकडूनही करायला परवानगी दिली.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर या कंपनीची शुक्रवारी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे

स्पाईस जेट चा लॉजिस्टिक आणि कार्गो बिझिनेस स्पाईस एक्स्प्रेसला ट्रान्स्फर करायला शेअरहोल्डर्सनी परवानगी दिली. त्याचे व्हॅल्युएशन Rs २५५५.७७ कोटी होईल.

कॅडीला या कंपनीने ‘MISEGEST’ आणि ‘CYTOLOG’ हे ब्रॅण्ड्स इंटीग्रेट या कंपनीला विकले.

रिलायन्स, टाटा अडानी हे PLI योजनेअंतर्गत सोलर प्रोजेक्टसाठी बीड करणार आहेत.

HAL च्या शेअरचे स्प्लिट करण्याचा निर्णय सरकारने रद्द केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८९६८ NSE निर्देशांक निफ्टी १७५६२ बँक निफ्टी ३७२३५ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २० सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७५.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs ७३.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९३.३५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड VIX १६.३७ PCR १.३६ होते.

USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड वाढले US $ मजबूत झाला.पण USA कन्झ्युमर कॉन्फिडन्स डेटा निराशाजनक आला. जगातील प्रमुख देशांच्या सेंट्रल बँकांच्या मीटिंग या आठवड्यात आहेत. २२ सप्टेंबर २०२१ रोजी फेडची बैठक त्याचप्रमाणे बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान या सेंट्रल बँकांच्याही बैठका आहेत. .चीन मधील मोठा रिअल इस्टेट डेव्हलपर ‘EVERGRANDE’ यांच्यावर काही संकट आले आहे. US $ ८३.५ मिलियन एवढे व्याज भरण्यात त्यांना अडचण येऊ शकते. याचाच अर्थ हौसिंग सेक्टरमध्ये स्लोडाऊन आहे. त्यामुळे स्टील आयर्न ओअर याला असलेली मागणी कमी होईल.चीनची अर्थव्यवस्था स्लोडाऊन होते आहे त्यामुळे मेटलसाठी मागणी कमी होईल, चीनने टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. या सर्व कारणांमुळे जागतिक मार्केट्स आज मंदीत होती. चीन, जपान, कोरिया, तैवान मधील मार्केट्स बंद होती.

फूड डिलिव्हरी अँपला GST च्या कक्षेत आणले. सर्व्हिससाठी ५% GST द्यावा लागेल. म्हणून झोमॅटोचा शेअर मंदीत होता.
मध्य प्रदेश रेल कॉर्पोरेशनकडून RVNL ला Rs १०३४ कोटींची ऑर्डर मिळाली.

इनॉक्स लिजरनी राजस्थानमध्ये भिलवारा येथे ३ स्क्रीन आणि ६२५ सीटचा मल्टिप्लेक्स चालू केला.

ल्युपिनच्या गोवा युनिटला USFDA कडून ७ त्रुटी दाखवल्या गेल्या. ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत गोवा युनिटची तपासणी करण्यात आली होती.

नजाराने OML इंटरनॅशनल मध्ये ७३% स्टेक घेतला.

इझी ट्रिप आणि BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस यांनी खरेदी करण्यासाठी बल्क मेसीजीस पाठवले म्हाणून सेबीने त्यांना फ्रॉड मेसेज लिस्ट मध्ये टाकले.

विमान कंपन्यांना प्रिकोविड लेव्हलच्या ८५% क्षमतेवर काम करायला परवानगी दिली. या आधी ७२% क्षमतेवर काम करता येत होते.

डाबरने वाटिका या ब्रँड अंतर्गत फेस वॉश लाँच केला.

कोटक महिंद्र बँकेने KFIN टेक्नॉलॉजी मध्ये Rs ३१० कोटी गुंतवून स्टेक घेतला.

लेदर उत्पादने आणि फुटवेअर उद्योगाला PLI खाली आणण्याचा सरकार विचार करत आहे. याचा फायदा बाटा, खादिम, सुपर हाऊस,रिलॅक्सो मिर्झा इंटरनॅशनल यांना होईल.

अडानी ग्रुप दिल्लीमधील मेडिया हाऊस घेणार आहे अशी बातमी होती. लोकांनी अंदाज बांधला की हे NDTV असावे म्हणून NDTV च्या शेअरमध्ये तेजी आली.

बन्नरी अम्मान स्पिंनिंग या कंपनीचा राईट्स इशू २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान असेल.

हिंदुस्थान कॉपर च्या OFS ला रिटेल इन्व्हेस्टर्सनी थंडा प्रतिसाद दिला.

‘ADVENT’ या कंपनीने फोर्ब्स लिमिटेड मध्ये ७२% स्टेक Rs ४४०० कोटींना घेतला.

लिझ्ड एअरक्राफ्ट वर IGST लागणार नाही.

फोर्टिफाइड तांदुळावर GST १८% वरून ५% केला. त्याचा फायदा KRBL आणि LT फूड्स यांना होईल.

कॉर्बोरेटेड बिव्हरेजीसवरील GST चा परिणाम वरुण बिव्हरेजीसवर होणार नाही कारण त्यांची २ उत्पादनेच या प्रकारात मोडतात.

ल्केम लॅब हे कॉस्ट कमी करण्यासाठी त्यांच्या बडडी प्लॅन्टमधील उत्पादन बंद ठेवणार आहेत.

KEC इंटरनॅशनल यांनी EPC फर्म SPUR इन्फ्रा या कंपनीचे १००% अक्विझिशन केले. ही कंपनी सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनच्या बिझिनेसमध्ये कार्यरत आहे.

मेटल्स बँका NBFC चे शेअर्स मंदीत होते. .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८४९० NSE निर्देशांक निफ्टी १७३९६ बँक निफ्टी ३७१४५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७५.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७३.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३३ VIX १५.४३ PCR १.४९ होते.

या आठवड्यात रोज FII चि गुंतवणूक येत होती. USA मध्ये रिटेल विक्रीचे आकडे चांगले आले. गेल्या महिन्यात ०.८% घट होती तर ऑगस्ट महिन्यात ०.७% वाढ झाली. बिझिनेस सेंटीमेंट सुधारले असे सर्व्हे वरून समजले. त्यामुळे US $ निर्देशांक ३ आठवड्याच्या कमाल स्तरावर होता. त्याचप्रमाणे F & O मध्ये आतापर्यंतचे सर्वात जास्त व्हॉल्युम होते.

डेंग्यू तापाची RT-PCR टेस्ट करण्यासाठी जे टेस्ट किट लागते त्याचे उत्पादन करण्यासाठी अंबालाल साराभाई या कंपनीला लायसेन्स मिळाले. FUNGUS साठी असलेले अँफोटेरीसीन हे औषध फक्त अंबालाल साराभाई ही कंपनी बनवते.त्यामुळे या कंपनीचा शेअर अपर सर्किटला होता.

BBL (बायोकॉन बायालॉजिक्स) आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यात करार झाला. त्यानुसार १०० मिलियन डोसेज १५ वर्षात बायोकॉन बायालॉजीक्सला मिळतील. आणि सिरम इन्स्टिट्यूटला BBL मध्ये १५% स्टेक मिळेल. ह्याचे व्हॅल्युएशन US $ ४.९ बिलियन केले गेले. अदर पुनावाला यांना BBL बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये १ सीट मिळेल. व्हॅक्सिन आणि अँटीबॉडीजचे उत्पादन करण्यासाठी करार केला गेला.

GLOSTER या कंपनीने ज्यूट उत्पादन करणाऱ्या प्लांट मध्ये Rs ३३० कोटींची गुंतवणूक करण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारबरोबर करार केला.

कॉस्मो फिल्म्स ही कंपनी नवीन प्रॉडक्शन लाईन टाकून भांडवली गुंतवणूक करणार आहे. या कंपनीने Rs २५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

टी व्ही एस मोटर्सने इलेक्ट्रिक सायकल, ई-बाईक्स बनवणाऱ्या EGO या कंपनीतील ८०% स्टेक घेतला.

व्हाइट गुड्स PLI योजनेसाठी Rs ५८८६ कोटी मंजूर केले. याचा फायदा अंबर, डिक्सन, वोल्टस, हॅवेल्स, ब्ल्यू स्टार या कंपन्यांना होईल.

आजच्या GST कौन्सिलच्या मीटिंग मध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
(१) कॉर्बोनेटेड फ्रुट पेये किंवा ज्या कॉर्बोनेटेड पेयात फ्रुट ज्यूस आहे अशा कॉर्बोनेटेड पेयांवर २८% GST आणि १२% कॉम्पेन्सेशन आकारण्यात येईल.
(२) आयर्न, मँगेनीज, कॉपर, निकेल, कोबाल्ट, अल्युमिनियम, लेड, झिंक, क्रोमियम या धातूंवरील GST ५% वरून १८% केली.
(३) केरळ राज्याने खोबरेल तेलाच्या खाद्यतेल म्हणून वर्गीकरणात बदल करण्यास विरोध केल्यामुळे खोबरेल तेलावर GST आकारण्याचा प्रस्ताव रद्द केला.
(४) कोवीड संबंधित औषधे आणि उपकरणे यावरील GST मध्ये दिलेल्या सवलतींची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली. तसेच आणखी काही औषधांचा या सवलतीसाठी समावेश केला.

सरकार चीनमधून आयात होणाऱ्या PTFE वर अँटी डम्पिंग ड्युटी लावणार. याचा फायदा गुजरात फ्लोरोला होईल
पेट्रोल डिझेल आणि नैसर्गिक गॅसचा GST अंतर्गत समावेश करण्यास बहुसंख्य राज्य सरकाराने विरोध केल्यामुळे हा विचार स्थगित केला. .

म्युच्युअल फंडाच्या बिझिनेस मधील स्टेक विकण्यासाठी IDFC ला परवानगी मिळाली.

बजाज होल्डिंग लिमिटेड या कंपनीने Rs ९० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला याची रेकॉर्ड डेट २९ सप्टेंबर २०२१ असेल आणि ११ ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्याला जमा होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९०१५ NSE निर्देशांक निफ्टी १७५८५ बँक निफ्टी ३७८११ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!