आजचं मार्केट – १ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७१.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.०८ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.७३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३२ VIX १४.७५ च्या आसपास PCR १.४९ होते.

आज USA , यूरोपातील मार्केट्स किंचित मंदितच होती. युरो झोनमधील महागाई ३% होती.

सप्टेंबर एक्स्पायरीनंतर पुढील शेअर्स F & O सेगमेंटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. ABBOT लॅब, डेल्टा कॉर्प, क्रॉम्प्टन ग्रीव्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स, दालमिया भारत, इंडिया सिमेंट, JK सिमेंट, ओबेराय रिअल्टीज, पर्सिस्टंट सिस्टिम्स.
BHEL या कंपनीला NPCIL कडून Rs १०८०० कोटींची ऑर्डर मिळाली.

AU स्माल फायनान्स बँकेचे अमित धीर यांना दिल्लीला शिफ्ट व्हायचे आहे. त्यामुळे त्यांच्याशी कंपनीची बोलणी चालू आहे. त्यामुळे आज AU स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर सावरला.

BSE चा स्टार MF हा म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरील व्यवहार चांगल्या प्रमाणात वाढत आहेत.

शॉपर स्टॉप ने क्रॉसवर्ल्ड बुक स्टोर्स मधील स्टेक Rs ४१.६ कोटींना विकला.

ONGC ला UIB डीप वॉटर WELL बंगालच्या उपसागरातील KG बेसीनमध्ये गॅसचा शोध लागला होता.या विहिरीतून रोज १.२ मिलियन क्युबिक मीटर्स एवढा गॅस मिळू शकेल. आता या गॅसचे कमर्शियल उत्पादन सुरु झाले आहे. त्यामुळे ONGC चा शेअर तेजीत होता.

गुजरात येथे मोरबी येथील २५० टाईल्स बनवणारी युनिट कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे बंद करावी लागली. याचा परिणाम म्हणून गुजरात गॅसचा व्हॉल्युम २९% ने कमी होईल.

फायटर एअरक्राफ्ट ही USA मधील एअरक्राफ्ट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. त्यांच्या ‘DRAKEN इंटरनॅशनल’ मध्ये एव्हिएशन सॉफ्ट्वेअर रामको सिस्टिम्स बसवणार आहे.

EPL कंपनीने सांगितले की आता कोलगेटसाठी रिसायकलिंग दवारा टूथपेस्ट ट्यूब बनवणार आहे.

APTECH ही कंपनी ‘ऑन लाईन शिक्षणाच्या’ क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

GST चे एकूण कलेक्शन १.१२ लाख कोटी झाले. CGST Rs २०५२२ कोटी, IGST Rs ५६२४७ कोटी, SGST चे कलेक्शन Rs २६६०५ कोटी एवढे झाले.

सरकारने कोल इंडिया या कंपनीला उत्पादन वाढवायला सांगितले. पॉवर प्लाण्टला कोळसा आयात करण्यासाठी परवानगी दिली. आता या कंपन्या स्वदेशी+आयात कोळसा पॉवर प्लांट साठी वापरू शकतील. तसेच आता पॉवर पर्चेस करार केलेला असला तरी या कराराव्यतिरिक्त कंपन्या पॉवर विकू शकतील

गुजरात मधील केमिकल उद्योगाला झटका बसला कारण कंटेनरच्या किमती ८% ते १०% ने वाढल्या.

झेन टेक्नॉलॉजी ऑर्डर बुक ३० जूनपासून Rs १९१ कोटींवरून ३० ऑगस्ट २०२१ रोजी Rs ४०२ कोटींचे झाले.

आज ऑटो विक्रीचे आकडे आले. मारुतीची एकूण विक्री १.३० लाख युनिट झाली तर कंपनीने २०६९१ युनिट्सची निर्यात केली. कंपनीने सांगितले की दक्षिण आशियातून ऑटो पार्ट्सच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे आणि विशेषतः सेमी कंडक्टर चिपच्या टंचाईमुळे कंपनीच्या गुजरात आणि हरयाणा प्लॅन्टमधील उत्पादनावर परिणाम झाला.

आयशर मोटरशी विक्री ९३% ने वाढली तर निर्यातीतही वाढ झाली.

अशोक लेलँड ची विक्री ४८% ने वाढली.

M &M ची ट्रॅक्टर विक्री २१३६० तर पॅसेंजर व्हेईकल विक्री १५९७३ एवढी झाली. निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली.
टाटा मोटर्सची एकूण विक्री ५७९९५ युनिट्स झाली. त्यात कमर्शियल वाहनांची विक्री २९७८१ युनिट्स झाली. कंपनीने १००० इलेक्ट्रिक व्हेइकल्सची विक्री केली. एस्कॉर्ट्सच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये घट झाली. ट्रॅक्टर विक्री ५६९३ झाली. तसेच VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्सच्या ट्रॅक्टर विक्रीत १८% ची घट झाली. बजाज ऑटोची विक्री वाढली.

आज कन्झ्युमर ड्युरेबल्स, बॅंक्स, रिअल्टी. पॉवर सेक्टर्समध्ये तेजी होती. IT, ऑटो सेक्टरमध्ये थोडे प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७३३८ NSE निर्देशांक निफ्टी १७०७६ बँक निफ्टी ३६५७४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १ सप्टेंबर २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.