आजचं मार्केट – २ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७१.५० प्रती बॅरल आणि रुपया US $ १=Rs ७३ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.४८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३० VIX १५.२६ PCR १.२५ होते.

चीनमध्ये अल्युमिनियमच्या किमती वाढत आहेत तसेच पुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत. याचा फायदा भारतातील अल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना होईल. नाल्को हिंदाल्को आणि वेदांता

क्रूडची मागणी ६० लाख बॅरेल प्रती दिवस होईल असे अपेक्षित होते. पण ही मागणी ३० लाख बॅरल एवढीच आहे. आणि ४०.२० बॅरल एवढी २०२२ मध्ये राहील असे अनुमान केले. त्यामुळे क्रूडचा दर खाली आला. पुढची ओपेक+ची बैठक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी होईल.

ओपेक+च्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ४ लाख बॅरल प्रती दिवस उत्पादन वाढीचा निर्णय कायम ठेवला. हे उत्पादन ओपेक+ ने लवकरात लवकर वाढवावे असे USA चे म्हणणे आहे.

मोरेपन लॅब ही कंपनी आपला मेडिकल डिव्हायसेसचा बिझिनेस वेगळा करून व्हॅल्यू अनलॉकिंग करणार आहेत. ह्या बरोबरच कोविड १९ च्या उपचारात ज्या वस्तूंचा, मेडिकल डिव्हाइसेसचा, औषधांचा वापर केला जातो त्यावरची GST मधील सवलतीची मुदत ३० सप्टेंबरपासून पुढे वाढवण्यावर १७ सप्टेंबर २०२१च्या GST कॉऊन्सिलच्या बैठकीत विचार विनिमय केला जाईल. यामुळे मोरेपन लॅब, BPL, पॉली मेडिक्युअर, इंद्रप्रस्थ मेडिकल्स यांना फायदा होईल.

जेट एअरवेजने कर्मचाऱ्याची भरती करण्यास सुरुवात केली आहे. FY २०२२च्या पहिल्या तिमाहीत आम्ही विमान उड्डाणे सुरु करू असे कंपनीने सांगितले. त्यामुळे कंपनीचा शेअर अपर सर्किटला होता.

M & M ने असे जाहीर केले की सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे सप्टेंबरमध्ये ७ दिवस ‘NO PRODUCTION’ दिवस असतील.

डेल्टा कॉर्पला गोवा सरकारने एंटरटेनमेंट सिटी बनवण्यासाठी मंजुरी दिली. या सिटीमध्ये मध्ये मल्टिप्लेक्सेस, रिसॉर्ट्स, वॉटर पार्क आणि कॅसिनो असतील. यासाठी मोपा एअरपोर्टपासून ५ किलोमीटर अंतरावर १०० एकर जमीन कंपनीला अलॉट केली.

REC या कंपनीने NHPC या कंपनीतील त्यांच्या मालकीचे ६१.८ मिलियन शेअर्स Rs २७.२० प्रती शेअर या भावाने विकले.
बजाज हेल्थकेअर ‘NIMESULIDE इनपुट चे उत्पादन त्यांच्या तारापूर प्लांट मध्ये सुरु करेल.

किटेक्स गारमेंट्स या कंपनीला तेलंगाणा सरकारने वारंगल जिल्ह्यात काकातीया मेगा टेक्सटाईल पार्क चालू करण्यासाठी मंजुरी दिली. कंपनी Rs १००० कोटींची गुंतवणूक करेल. कंपनी त्यांचा रेडीमेड गारमेंट्स उत्पादनाचा प्लांट उभारेल. या

कंपनीला केरळ राज्य सरकारने किमान वेतन कायद्यासंदर्भात नोटीस दिली होती ती आता रद्द केली.

सिमेंट उत्पादक कंपन्यांनी तेलंगणा आंध्र प्रदेश येथील सिमेंटच्या दरात Rs ३० प्रति बॅग वाढ केली. याचा फायदा अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया भारत, ओरिएंट सिमेंट,सागर सिमेंट, इंडिया सिमेंट, श्री सिमेंट, रामको सिमेंट आणि JK सिमेंट यांना होईल.

जस्ट डायल ही कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स या कंपनीला २.१२ कोटी शेअर्स Rs १०२२.२५ प्रती शेअर या दराने अलॉट करेल.

टुरिझम, मद्यार्क, FMCG, ITकंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. ड्युरेबल गुड्स उत्पादकांच्या शेअरमध्ये तेजी होती उदा व्होल्टास, हॅवेल्स, अंबर, डिक्सन. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्शुअरन्स कंपन्या, कॅपिटल्स गुड्स उत्पादक कंपन्या तेजीत होत्या.
DOT ने त्यांची पब्लिक प्रोक्युअरमेंट पॉलिसी बदलली . आता उपकरणाच्या असेम्ब्ली करण्याला उत्पादन समजले जाईल आणि असेम्ब्लीसाठी जी गुंतवणूक केली जाईल ती PLI साठी ग्राह्य धरली जाईल. बर्याच स्वदेशी कंपन्यांनी या धोरणाला विरोध केला आहे

भारताच्या अर्थव्यवस्थेत आता सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निर्यातीमधील वाढ, एप्रिल-जून तिमाहीत चांगले आलेले कॉर्पोरेट निकाल, तसेच सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर ऍसेट्स डेव्हलप करण्यावरील खर्च यामुळे ही चिन्हे दिसत आहेत.

भारती एअरटेल या कंपनीने 5G एन्व्हायर्नमेंटमध्ये क्लाउड गेमिंग सेशन सुरू केल्याची घोषणा केली. त्यामुळे आज भारती एअरटेलचा शेअर तेजीत होता. यामुळे कंपनीला US$ २.४ बिलियनएवढ्या मार्केटमध्ये प्रवेश केल्याचा फायदा होईल.

आज सेन्सेक्सने इंट्राडे ५७८९२ चा तर निफ्टीने १७२४५ चा ऑलटाइम हाय रेकॉर्ड केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७८५२ NSE निर्देशांक निफ्टी १७२३४ आणि बँक निफ्टी ३६८३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.