आजचं मार्केट – ३ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७३.२५ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.२१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३० VIX १४.१३ PCR १.१७ होते.

आज USA मधील जॉबलेस डेटा क्लेमचे आकडे ३.४० लाख आले. यावेळी यात सुधारणा दिसली.USA चा नॉनफार्म डेटा पेरोल चांगला आला. USA मधील क्लास ८ ट्रकसाठी ऑर्डर्स वाढल्या आहेत. याचा फायदा भारत फोर्ज आणि रामकृष्ण फोर्जिंग यांना होईल.

क्रूडची इन्व्हेन्टरी कमी झाल्यामुळे क्रूडचे दर वाढले.

२१ सप्टेंबर २०२१ रोजी शेअर्स स्प्लिट वर विचार करण्यासाठी HAL ( हिंदुस्थान एरोनाटीक्स लिमिटेड) या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

ग्रॅनुअल्स या कंपनीला कोविडसारख्या आजारांवरील औषधांच्या उत्पादन आणि मार्केटिंगसाठी परवानगी मिळाली.
फ्रेट लोडींगचा व्हॉल्युम्स वाढल्यामुळे याचा फायदा काँकॉरला होईल.

IRB इन्फ्राला तामिळनाडूमधील २० KM ६ लेन रोड प्रोजेक्टची Rs ९१० कोटींची ऑर्डर मिळाली.

HDFC लाईफ ही कंपनी एक्साईड लाईफमध्ये १००% स्टेक अकवायर करणार आहे. ८,७०,२२,२२२ एवढे शेअर्स Rs ६८५ प्रती शेअर या दराने अलॉट करणार आहे. याबरोबरच Rs ७६० कोटी मध्ये हे अक्विझिशन होईल.

एक्साईडची व्हॅल्यू ३० जून २०२१ Rs २७११ कोटी होती. आता HDFC लाईफ Rs ६६८७ कोटी खर्च करत आहे. यामद्ध्ये एक्साईडचा फायदा झाला. टॉप लाइन एजन्सी बिझिनेसचा ४०% हिस्सा एक्साइडला जोडला जाईल.

IRCTC ने कॉर्डेलिया CRUISES बरोबर करार केला. यात मुंबई गोवा, कोची लक्षद्वीप, आणि चेन्नई कोलंबो या करुईसेसचा समावेश असेल. ६ सप्टेंबरला पहिले CRUISE निघेल. यासाठी irctctourism.com ही वेबसाईट उपलब्ध असेल.
ऑगस्ट महिन्यासाठी सर्व्हिसेस PMI ५६.७ (४५.४) आणि कॉम्पोझिट PMI ५५.४ (४९.२) होते. हे PMI चे आकडे अर्थव्यवस्था हळू हळू सुधारत असल्याचे द्योतक आहेत.

JSPL च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीचा जिंदाल पॉवरमधील ९६.४२% स्टेकRs ७४०१ कोटींना विकण्यासाठी मंजुरी दिली.

टाटा मोटर्स दक्षिण भारतात ७० नवीन सेल्स आउटलेट उघडणार आहे.

आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्टर्न इकॉनॉमिक फोरम मध्ये माझगाव डॉक आणि ZVEDA या कंपन्यांमध्ये कमर्शियल शिप मॅन्युफॅक्चरिंगसाठी करार होणार असल्याचे जाहीर केले.

आज वाणिज्य खात्याच्या मंत्र्यांनी टेक्सटाईल सेक्टरसाठी बर्याच दिलासादायक घोषणा केल्या. टेक्सटाईल्स सेक्टरसाठी PLI योजना जाहीर केली आणि या योजनेसाठी Rs १०६८४ कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली.

UK बरोबर ट्रेड डीलसाठी आणि फ्री ट्रेड ऍग्रीमेन्ट करण्यासाठी वाटाघाटी चालू असल्याचे सांगितले. तसेच सरकार देशांत ७ मेगा टेक्सटाईल पार्क उभारणार आहे.

टेक्सटाईल सेक्टरमधील उद्योजकांनी निर्यात वाढवण्यावर भर द्यावा असे सांगितले. याचा फायदा TCNS क्लोदिंग, सेंच्युरी टेक्सटाईल्स, गोकुळदास एक्स्पोर्ट्स, ट्रायडंट, अंबिका कॉटन, आणि इतर टेक्सटाईल कंपन्यांना होईल.

ऑइल इंडिया या कंपनीने त्यांचा नुमाळीगढ रेफायनरीमधील स्टेक Rs ७८६ कोटींना विकला.

चीनमधून आयात होणाऱ्या अल्युमिनियम रोड व्हील अलॉय ची तपासणी सुरु झाली आहे.

HFCL या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी कंपनीला Rs ७५० कोटी उभारण्यासाठी मंजुरी दिली

ONGC रशियामधील रोझनेफ्ट या ऑइल कंपनीच्या व्होस्टोक या मोठ्या आणि कॉम्प्लेक्स ऑइल प्रोजेक्टमध्ये स्टेक घेण्याचा विचार करत आहे.

आज मेटल्स, ऑटो, IT, रिअल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

EVQPOINT सोल्युशन या EV बॅटरी चार्जिंग सोल्युशन तयार करणाऱ्या कंपनीत मींडा इंडस्ट्रीजची सबसिडीअरी स्पार्क मिंडाने स्टेक घेतला.

स्टील स्ट्रीप व्हील्स या कंपनीने आपल्या एका शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन करण्यासाठी मंजुरी दिली.

रेलटेलला इंडियन एअर फोर्सने इम्प्लिमेंटेशन ऑफ सिक्युअर्ड OPS नेटवर्कसाठी Rs ३०० कोटींची ऑर्डर दिली.

कुमार मंगलम बिर्ला यांनी टेलिकॉम मंत्री वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर कंपनी आणि टेलिकॉम क्षेत्राच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा केली. याबाबतीत किमान टॅरिफ दर वाढवण्याचा आणि स्पेक्ट्रम फी साठी मोरॅटोरियम देण्याचा सरकार विचार करण्याची शक्यता आहे. सरकारच्या या सकारात्मक पवित्र्यामुळे VI चा शेअर ३०% ने वाढला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८१२९ NSE निर्देशांक निफ्टी १७३२३ बँक निफ्टी ३६७६१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ३ सप्टेंबर २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.