आजचं मार्केट – ६ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७२.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७३.०० च्या आसपास होते US $ निर्देशांक ९२.१६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३६ VIX १४.७५ PCR १.५३ होते.

USA मध्ये बॉण्ड यिल्ड वाढले. जॉब डेटा कमजोर आला. ७.५ लाख लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा असताना २.३५ लाख लोकानाच रोजगार मिळाला. त्यामुळे फेड ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात टेम्परिंग सुरु करणार नाही किंवा पुढे ढकलेल असा अंदाज आल्यामुळे भारतात पैशाचा ओघ चालू राहील.

M & M फायनान्स ची डिसबर्समेंट Rs २१५० कोटी झाली तर कलेक्शन ९७% वाढले. यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.
एशियन ग्रॅनाईट या कंपनीने त्यांचा राईट्स इशू जाहीर केला. Rs १०० प्रती राईट्स या दराने तुमच्या जवळ जर २९ शेअर्स असतील तर तुम्हाला १९ राईट्स ऑफर केले जातील. कंपनी या राईट्स इशू द्वारे Rs २२५ कोटी उभारेल. हा राईट्स इशू २३ सप्टेंबर २०२१ रोजी ओपन होऊन ७ ऑक्टोबर रोजी बंद होईल. ९ सप्टेंबर २०२१ ही त्याची रेकॉर्ड डेट आहे.

भारती एअरटेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने भारती अक्सा जनरल इन्शुअरन्स च्या डीमर्जरला परवानगी दिली.
JSPL च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने जिंदाल पॉवरमधील कंपनीचा ९६.४२% स्टेक Rs ७४०१.०० कोटींना विकण्याची मंजुरी दिली. कोळशाच्या खाणी डिजिटली कनेक्ट करण्याचे काम रेलटेल या कंपनीला मिळाले. आतापर्यंत १४०० कोळशाच्या खाणी डिजिटली कनेक्ट झाल्या आहेत.

IRDA ने ICICI बँकेला ICICI लोम्बार्ड मधील त्यांचा ५२% स्टेक ३०% पर्यंत आणायला परवानगी दिली.

३ PLY सर्जिकल मास्कसाठी USFDA ने वेलस्पन इंडिया कंपनीला परवानगी दिली.

हेल्थ केअर ग्लोबल या कंपनीने स्ट्रॅन्ड लाईफ सायन्सेसचा ३८.५% स्टेक Rs १५७ कोटींना विकला.हेल्थ केअर ग्लोबल या कंपनीने ऑनकॉलॉजी हॉस्पिटल लॅब्स आणि क्लिनिकल ट्रायल्स बिझिनेस स्ट्रॅन्ड लाईफ सायन्सेस कडून Rs ८३ कोटींना घेतला. रिलायन्स इंडस्ट्रीजने सब्सिडिअरीमार्फत २.२८ कोटी स्ट्रॅन्ड लाईफ सायन्सेसचे शेअर्स Rs ३९३ कोटींना खरेदी केले. रिलायन्स इंडस्ट्रीज अजून Rs १६० कोटी मार्च २०२३ मध्ये गुंतवेळ. यानंतर रिलायन्सचा स्ट्रॅन्ड लाईफ सायन्सेसमध्ये ८०.२३% स्टेक होईल.स्ट्रॅन्ड लाईफसायन्सेस ही GENOMIC टेस्टिंग क्षेत्रातली भारतातील अग्रेसर कंपनी असून BIO INFORMATICS सॉफ्टवेअर आणि क्लिनिकल रिसर्च सोल्युशन्स वैद्यकीय संस्थाना पुरवते.

आज रिअल इस्टेट, IT ,सिमेंट या सेक्टर्समधील कंपन्यात तेजी होती. ब्रिगेड, प्रेस्टिज, शोभा या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यात लक्षणीय तेजी होती.

RBI ने J & K सरकारला J & K बँकेत १६.७६ कोटी शेअर्स खरेदी करायला परवानगी दिली.

अशोक बिल्डकॉनला अडानी रोड ट्रान्सपोर्ट कडून Rs १५६७ कोटींची ऑर्डर मिळाली.

इंजिनीअर्स इंडिया या कंपनीला चेन्नई पेट्रोकडून Rs १०३९ कोटींची ऑर्डर मिळाली.

IOC, HPCL, BPCL या कंपन्यांना १२ इथनॉल उत्पादनासाठी १२ प्लांट्स लावायला सरकारने सांगितले आहे.

बजाज हेल्थ केअरने २DEOXY DGLUCOSE ( DGJAJ) फॉर्म्युलेशनचे उत्पादन आणि मार्केटिंग करायला सुरुवात केली.

HUL ने त्यांच्या डिटर्जंट उत्पादनांच्या किमती कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ११% ने वाढवल्या

DR रेड्डीजनी ‘CITIUS फार्मा’ बरोबर करार केला. त्यांना अँटिकॅन्सर एजंट E 7777 याचे राईट्स विकले. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांना US $ ४० मिलियन मिळणार आहेत.

सरकारने रस्ते टेलिकॉम आणि हॉटेल या क्षेत्रातील डीमॉनेटायझेशनच्या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी एक सचिव स्तरावरची कमिटी नेमली. यात MTNL, BSNL चे १४९१७ टॉवर्स ITDCची ८ हॉटेल्स, दिल्ली मधील कॉलोनीज आणि रोड सेक्टरचा समावेश असेल.

सरकार टेलिकॉम सेक्टरसाठी रिव्हायव्हल पॅकेज आणणार आहे.

आज एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीने ऑटो सेक्टरसाठी PLI योजनेला मंजुरी दिली. ऑटो कंपन्यांना २% ते १२% सवलत मिळेल. यासाठी Rs ५७००० कोटींची तरतूद केली. यामुळे ऑटो आणि ऑटो अँसिलिअरी सेक्टरमध्ये तेजी आली.
रेल्वे मिनिस्ट्री ८००० वॅगन खरेदी करणार आहे.यांच्यासाठी Rs २७०० कोटी खर्च येईल. याचा फायदा टिटाघर वॅगनला होईल.

नॅशनल अल्युमिनियम ( NALCO ) या कंपनीने Rs १ प्रती शेअर या दराने अंतिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सनी मंजुरी दिल्यावर देण्यात येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२९६ NSE निर्देशांक निफ्टी १७३७७ बँक निफ्टी ३६५९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.