आजचं मार्केट – ७ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७२.५० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.२५ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.१४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३६ VIX १५.११ PCR १.२९ होते. जपान आणि चीन हे दोन देश आता स्टिम्युलसची तयारी करत आहेत.

सौदी अरेबियाने सांगितले की आता असलेल्या दरापेक्षा US $१ कमी दराने ते क्रूड विकायला तयार आहेत.

इन्फोसिसची बायबॅक क्लोझरसाठी ८ सप्टेंबर २०२१ रोजी मीटिंग आहे. २५ जून २०२१ रोजी Rs ९२०० कोटींचा बायबॅक सुरु झाला. बायबॅकसाठी Rs १७५० प्रती शेअर किंमत निश्चित केली होती. बायबॅक २४ डिसेंबर २०२१ रोजी बंद होणार होता. पण कंपनीने ९९.९९% रक्कम बायबॅकसाठी वापरली आहे.

व्हिएतनाम, ब्राझीलमधील प्रतिकूल हवामान, लॉकडाऊन आणि त्यानंतरचे कडक निर्बंध यामुळे कॉफीच्या मागणी आणि पुरवठा यात पुष्कळच अंतर पडले. त्यामुळे कॉफीच्या किमती ४ वर्षाच्या कमाल स्तरावर पोहोचल्या. त्यामुळे आज कॉफी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते उदा CCL, टाटा कॉफी, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस, अँड्रू यूल,. कॉफीच्या किमती बरोबरच चहाच्या किमतीही वाढल्या. जयश्री टी, धूनसेरी टी इत्यादी

JSPL च्या ऑस्ट्रेलियन सबसिडीअरीला WOLLINGONG या कंपनीला ऑस्ट्रेलियात मायनिंग विस्तार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून परवानगी मिळाली.

BEL या कंपनीने SFC एनर्जी या कंपनीबरोबर लो एमिशन ऑफ ग्रीड सप्लाय साठी करार केला.

मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क तयार करण्यासाठी रेल विकास निगमने भारत सागरमाला अंतर्गत NHI बरोबर करार केला.
LIC हौसिंग फायनान्सने इंडिया पोस्ट बरोबर हौसिंग लोनसाठी करार केला

NEOJEN केमिकल्स या कंपनीने ऑरगॅनिक केमिकल्सचे कमर्शियल उत्पादन पूर्ण क्षमतेने ६ सप्टेंबरपासून दहेज SEZ भरूच येथे यशस्वीरीत्या सुरु केले.

PI इंडस्ट्रीजने PI हेल्थ सायन्स ही नवीन सबसिडीअरी तयार केली.

गुलशन पॉली या कंपनीला मध्य प्रदेशात डिस्टिलरी प्लांट साठी २ आठवड्यात परवानगी मिळेल.

थॉमस कुक या कंपनीने मनाली श्रीनगर लेह साठी टू व्हीलर पर्सनल पॅकेज जाहीर केले. याची सुरुवात Rs २४९९५ पासून होईल.

VST टिलर्स आणि ट्रॅक्टर या कंपनीने साऊथ आफ्रिकन मार्केटमध्ये प्रवेश केला. त्यांनी ETG बरोबर ट्रॅक्टर ,पॉवर टिलर,पॉवर रिपर्स आणि डिझेल इंजिनच्या नमिबिया, बोत्सवाना. झिम्बाब्वे, स्वाझीलँड आणि झाम्बिया या देशात डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला.

आज सेन्सेक्स ने ५८५५३ चा आणि निफ्टीने १७४३६ चा इंट्राडे ऑल टाइम हाय रेकॉर्ड केला.

उद्या सरकार टेलिकॉम क्षेत्राला कोणत्या आणि किती सवलती देता येतील यांचा विचार करणार आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

Panacea Biotec या कंपनीने स्पुटनिक लसीच्या दुसरा कंपोनंटच्या १ल्या शिपमेंटचा पुरवठा केला. ह्या लसीचे वाटप DR.रेड्डीज तर्फे केले जाईल.

आज टेलिकॉम, कन्झ्युमर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती तर IT आणि रिअल्टी क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२७९ NSE निर्देशांक निफ्टी १७३६२ बँक निफ्टी ३६४६८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.