आजचं मार्केट – ८ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७१.७५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १=Rs. ७३.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.६६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३५ VIX १४.०० च्या आसपास तर PCR १.५७ होते. आज US $ मजबूत होता तर सोन्यात मंदी होती.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय झाले. सरकारने रबी हंगामासाठी वेगवेगळ्या पिकांची SP वाढवली. तसेच उसासाठी Rs २९० प्रती क्विंटल FRP जाहीर केली. सरकारने आज टेक्सटाईल सेक्टरसाठी ५ वर्षांसाठी PLI योजना जाहीर केली. टेक्निकल टेक्सटाईल साठी Rs ४००० कोटी आणि मॅनमेड फॅब्रिक्ससाठी Rs ७००० कोटींची ( एकूण Rs १०६८३ कोटी) तरतूद केली. तसेच सरकारने सांगितले की UK, USA आणि EU (युरोपियन युनियन) बरोबर फ्री ट्रेडसाठी वाटाघाटी चालू आहेत. ही बातमी आल्याबरोबर जवळ जवळ सर्व गारमेंट तसेच टेक्सटाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले. उदा अरविंद, सतलज टेक्सटाईल्स, सेंच्युरी एन्का इत्यादी

सरकारने टेलिकॉम सेक्टरसाठी कोणताही रिलीफ द्यायला नकार दिला. त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील शेअर्समध्ये मंदी आली.

सरकारने घोषणा केली की IRSDC ( इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ) आणि IRCON ह्या सरकारी कंपन्या मिळून ४०० रेल्वे स्टेशन्सची डेव्हलपमेंट करणार. सरकार नंतर या स्टेशनचे मोनेटायझेशन करेल.यामुळे रेल्वेशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BEML या सरकारी कंपनीची १००% सब्सिडीअरी असलेली विज्ञान इंडस्ट्रीज ही कंपनी बंद करण्यात येईल. गोदावरी पॉवर आणि इस्पात ह्या कंपनीच्या १४ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत सबडिव्हिजन ऑफ शेअर्स आणि बोनस इशूवर विचार करण्यात येईल. नेपाळ सरकारने नेपाळमध्ये डेल्टा कॉर्प या कंपनीला काठमांडूमध्ये कॅसिनो सुरु करण्याची परवानगी दिली. तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने , म्हणजेच देशातील सर्वात जून्या खाजगी बँकेने सेबीकडे IPO साठी DRHP दाखल केली.

SANSERA इंजिनीअरिंग या बँगलोर बेस्ड कंपनीचा IPO १४ सप्टेंबर २०२१ रोजी ओपन होईल.आणि या १६ सप्टेंबरला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ७३४ ते Rs ७४४ असेल. ही पूर्णपणे OFS असेल. ही कंपनी महत्वाचे प्रिसिजन, फोर्ज्ड आणि मशिनड ऑटो कॉम्पोनंट्स इंजिन ब्रेक्स ट्रांसमिसशन यासाठी पुरवते. नॉन ऑटो क्षेत्रात,ऐरोस्पेस, कृषी आणि कॅपिटल गुड्ससाठी प्रिसिजन कॉम्पोनंट्स पुरवते.

पेट्रोनेट LNG ही कंपनी पूर्व भारतात ओडिशा राज्यात गोपाळपूर पोर्ट इथे फ्लोटिंग REGASIFICATION टर्मिनल बनवण्याची योजना आखत आहे. कंपनी आणखी दोन LNG स्टोअरेज टँक्स दहेज टर्मिनल मध्ये बसवणार आहे.

सेबीने शेअर्ससाठी T+१सेटलमेंट ऑप्शनल बेसिसवर १ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्याचे सूतोवाच केले आहे. शेअर्सची T+१ साठी निवड स्टॉक एक्सचेंजीस १ महिन्याची पूर्व सूचना देऊन करतील. हे शेअर्स पुढील सहा महिने त्याच सेटलमेंट सायकलमध्ये राहतील. T+१ आणि T+२ या दोन सेटलमेंट्समध्ये नेटींग होऊ शकणार नाही

एशियन पेंट्स ही कंपनी रेमिडियल वॉटर प्रूफिंग क्षेत्रात आहे ते आता नवीन बांधकाम क्षेत्रात वॉटर प्रूफिंग आणि

कन्स्ट्रक्शन केमिकल्सच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. कन्स्ट्रक्शन केमिकलच्या मार्केटमध्ये पीडिलाईटचा ५० % मार्केटशेअर आहे. एशियन पेन्ट्सने या मार्केटमध्ये प्रवेश केल्यामुळे पीडिलाईटच्या मार्केटशेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज बँक निफ्टीमध्ये टेलिकॉम सेक्टरला काही सवलत मिळेल या अपेक्षेने तेजी होती. उदा IDFC I st, इंडस इंड बँक, बँक ऑफ बरोडा इत्यादी पण सरकारने काहीही सवलत द्यायला नकार दिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२५० NSE निर्देशांक निफ्टी १७३५३ बँक निफ्टी ३६७६८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.