आजचं मार्केट – ९ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७२.५२ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.७५ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.७४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३३ PCR १.१७ VIX १४.४१ होते.

USA मार्केट्स आज किंचित मंदीत होती. कन्झ्युमर कॉन्फिडन्स डेटा खराब आला. कन्झ्युमर कॉन्फिडन्स कमी झाला. दीर्घ मुदतीच्या बॉण्ड्समध्ये खरेदी झाली.

TCS ने लंडनमधील वाहतूक यंत्रणेबरोबर न्यू स्मार्ट मोबिलिटी सिस्टीमच्या डिझाईन, इम्प्लिमेंट, ऑपरेशनसाठी १० वर्षांचा करार केला.

कॅनडा पेन्शन फंडाने SBI लाईफ मधला २% स्टेक Rs २२७४ कोटींना विकला

RBI ने UCO बँकेला PCA मधून बाहेर काढले. त्यामुळे या अंतर्गत येणारी खूप नियंत्रणे दूर झाल्यामुळे यूको बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

कोरोमंडल इंटरनॅशनलने ‘ग्रो शक्ती’ नावाचे उत्पादन लाँच केले. यामुळे शेतकऱयांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. या उत्पादनातून झिंक, पोटॅश, नायट्रोजन, फॉस्फरस हे घटक मिळतील. धान्य, डाळी. तेलबिया, फळफळावळ आणि भाजीपाला यांच्यासाठी उपकारक आहे. हे EnPhos हे तंत्र वापरून बनवले आहे . त्यामुळे पिकाला जास्ती फॉस्फरस मिळतो मुळांचा विकास होतो आणि रोपांची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून आज हा शेअर तेजीत होता.

टाटा पॉवर आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्स यांनी EV चार्जिंग स्टेशनसाठी करार केला.

ECB (युरोपियन सेंट्रल बँक) आर्थीक मदत कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोटक बँक १० सप्टेंबर २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान दिलेल्या गृहकर्जावर ६.५% व्याज आकारेल.

आज वाणिज्य मंत्री माननीय पियुष गोयल हे निर्यातदारांसाठी Rs ५०००० कोटींची सवलत योजना जाहीर केली . यात मर्कंटाईल एक्सपोर्टर्स ऑफ इंडिया स्कीम आणि सर्व्हिस एक्सपोर्टर्स ऑफ इंडिया स्कीम अशा दोन योजना असतील. निर्यातदारांना सतावणार्या कंटेनर शॉर्टेजचा प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सरकारकडून निर्यातदारांना देय्य असलेली रकम ताबडतोब दिली जाईल. तसेच निर्यातदारांना सातत्याने सतावणाऱ्या वाढणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात काही सवलत देण्याची शक्यता आहे का? याचा सरकार विचार करील. सरकार कृषी उत्पादनांच्या निर्यातीला उत्तेजन देईल. आता भारत तांदूळ, कपास सोयाबीन, आणि मच्छी यांची निर्यात करत आहे.

सुप्रीम कोर्टाने आर्बिट्रेशन अवॉर्ड ग्राह्य धरले त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला आर्बिट्रेशन अवॉर्डअंतर्गत Rs ४६०० कोटी मिळण्याचा मार्ग सोपा झाला. कंपनीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी एअरपोर्ट मेट्रो रूट बनवला होता आणि ऑपरेट करत होते.

रिलायन्स जिओ आणि BP ( ब्रिटिश पेट्रोलियम) हे EV साठी चार्जिंग स्टेशन्स उभारतील. फोर्ड ही ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी त्यांचे कार्स उत्पादन करणारे चेन्नई आणि सानंद येथील प्लांट बंद करणार आहेत. आता या कंपनीच्या कार्स आयात होतील.

सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाच्या फ्युचर ग्रुपची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८३०५ NSE निर्देशांक निफ्टी १७३६९ बँक निफ्टी ३६६८३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.