आजचं मार्केट – १३ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १३ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७३.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs. ७३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.६८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३२ VIX १३.९४ आणि PCR १.४५ होते.

आज USA मधील सर्व निर्देशांक मंदीत होते . आशियायी मार्केट मंदीत होती. जो बिडेन यांनी आपले करविषयक ( आयकर आणि संपत्ती कर) प्रस्ताव USA च्या संसदेपुढे ठेवले.USA मध्ये गेला आठवडाभर प्रॉफिट बुकिंग होत आहे. या आठवड्यात UK ,चीन, USA चे रिटेल महागाई आणि IIP चे आकडे येतील. आज सोने आणि चांदीही मंदीत होती.

आज भारताचे ऑगस्ट २०२१ साठी CPI ५.३० ( जुलै २०२१ मध्ये ५.५९) होते.म्हणजे महागाई किंचित कमी झाली.
तसेच जुलै २०२१ महिन्यासाठी IIP ११.५% एवढी आली ( जूनमध्ये -११.५ होते)

कोल इंडिया त्यांच्या उत्पादनाच्य किमतीत ११% वाढ करणार आहे. कंपनीने सांगितले की ऑपरेशनल कॉस्ट वाढली आहे.
हरियाणा सरकारने उसाची किंमत Rs १२ ने वाढवली.

निर्यातदारांना Rs ५६००० कोटी इन्सेन्टिव्ह दिला जाईल. सरकारने खाद्यतेलावरील ( पाम, सोयाबीन सूर्यफूल) यांच्या वरील इम्पोर्ट ड्युटी ५.५% केली.

केसोराम या कंपनीने Rs ४००० कोटींच्या राईट्स इशूची घोषणा केली. कंपनी ८ कोटी राईट्स इशू करून Rs ४००० कोटी उभारेल. तुमच्याजवळ २७४ शेअर्स असतील तर तुम्हाला १३३ राईट्स ऑफर केले जातील. ह्या राईट्स इशूची रेकॉर्ड डेट १७ सप्टेंबर २०२१ असून हा इशू २७ सप्टेंबर २०२१ला ओपन होऊन ऑक्टोबर ११ २०२१ला बंद होईल.

सरकार चीनमधून आयात होणाऱ्या अमोक्सिसिलीनवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवण्याचा विचार करत आहे.

गोल्डीयम इंटरनॅशनल ही कंपनी शेअर बायबॅक करणार आहे.

R सिस्टीम ही कंपनी Rs २२५ प्रती शेअर या भावाने शेअर बाय बॅक करणार आहे.

ACE या कंपनीला टाटा ऍडव्हान्स सिस्टीम आणि DRDO कडून ४८२ MPT ( मल्टी पर्पज ट्रॅक्टर्स) ची ऑर्डर मिळाली. या MPT बरोबर स्पेशल अटॅचमेन्ट असेल.

ऍडव्हान्स एन्झाइम या कंपनीने घोषणा केली की कोविड मधून बरे झाल्यानंतर येणारा थकवा आणि कॉग्निटिव्ह डिस्टर्बन्सेससाठी कंपनीच्या सिस्टिमिक एंझाइम आणि PROBIOTIK सप्लिमेंट्स ImmunoSEB आणि ProbioSEB CSC३ ह्या औषधांनी रॅण्डमाईझ्ड कंट्रोल्ड क्लीनिकल ट्रायल्स पास केली.

गोल्डीयम इंटरनॅशनल या कंपनी Rs १२०० प्रति शेअर या भावाने टेंडर ऑफर रूटने प्रपोर्शनेट बेसिसवर ३,८०,००० शेअर्सच्या बायबॅकवर Rs ४५.६० कोटी खर्च करेल. प्रमोटर्स आणि प्रमोटर ग्रुप्स या बायबॅक मध्ये भाग घेणार आहेत.

गार्डनरीच शिपबिल्डर्सना ८ ASW वॉटरक्राफ्टसाठी Rs ६३११ कोटींची ऑर्डर मिळाली.

प्रकाश इंडस्ट्रीज ही कंपनी भास्करपारा कोळशाच्या खाणीसाठी यशस्वी बिल्डर ठरली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८१७७ NSE निर्देशांक निफ्टी १७३५५ बँक निफ्टी ३६४७१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.