आजचं मार्केट – १४ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १४ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७३.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.५९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३३ VIX १३.०० च्या आसपास आणि PCR १.५ होते.

आज ‘शेअरहोल्डर्स ऍक्टिव्हिजम’ चे सम्यक दर्शन झी एंटरप्रायझेस या कंपनीत झाले. आज झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपनीमध्ये सगळ्यात मोठा शेअरहोल्डर असलेल्या ‘INVESCO’ ने EGM बोलावण्यासाठी कंपनीला सांगितले आहे. त्याचबरोबर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री पुनीत गोएंका यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच कंपनीत मल्टिपल इंडिपेन्डन्ट डायरेक्टर्स नेमावेत असे सुचवले. Mr मनीष चोखानी आणि अशोक कुरियन या इंडिपेन्डन्ट डायरेक्टर्सननी राजीनामे दिले. झी एंटरप्रायझेसमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे आवश्यक होते असे EGM साठी असलेल्या अर्जात म्हटले आहे. या बातमीनंतर झी ग्रुपचे डिश टीव्ही, झी लर्न, झी मीडिया हे शेअर्स अपर सर्किटला होते.

गोदावरी पॉवर आणि इस्पात या कंपनीने आपल्या एक शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले आणि तुमच्या कडे असलेल्या एका शेअर्सला १ बोनस शेअर जाहीर केला.

हिंदुस्थान ऐरोनाटिक्स या कंपनीने रोल्स राईस या कंपनीबरोबर ‘ADOUR’इंजिन्स पार्ट बनवण्यासाठी करार केला. सरकार HAL मधील ०.१५% स्टेक विकणार आहे.

ISGEC या कंपनीला DRDO कडून मेडिकल ऑक्सिजन प्लांट बनवण्यासाठी ऑर्डर मिळाली.

‘FTSE’ मध्ये अडानी ट्रान्समिशन, मॅक्स फायनान्स, लौरस लॅब, मॅक्स हेल्थ, हॅपीएस्ट माईंड, SKF या कंपन्यांचा १७ सप्टेंबर २०२१ पासून समावेश होणार आहे. यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

सरकार ऑटो अँसिलिअरीज, ड्रोन आणि ड्रोन पार्ट्स आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स या सगळ्यासाठी PLI स्कीम आणणार आहे. Rs २५३३८ कोटींची तरतूद यासाठी केली जाईल. या बातमीमुळे ग्रीव्हज कॉटन, मिंडा, JBM ऑटो, मदर्सन सुमी, भारत फोर्ज, जय भारत मारुती, झेन टेक्नॉलॉजी अशा शेअर्समध्ये तेजी होती.

इन्फोसिस १३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल आणि अंतरिम लाभांशावर विचार करेल.

बांगला देश आणि थायलंड येथून आयात होणाऱ्या हायड्रोजन पॅरॉकसाईडवर अँटी डम्पिंग ड्युटीची मुदत वाढवली. गुजरात अल्कली, मेघमणी ऑर्गनिक्स, नॅशनल पेरॉक्ससाईड या कंपन्यांना फायदा होईल.

अल कार्गो लॉजिस्टिक्सच्या शेअरहोल्डर्सनी शेअर डीलीस्टिंगच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही.

नवीन गाड्या खरेदी करतां ५ वर्षांसाठी बम्पर टू बम्पर विमा घेणे अनिवार्य आहे असे सांगितले होते. त्यामुळे कार्सची कॉस्ट वाढत होते. हे प्रकरण कोर्टात गेले आणि मद्रास हायकोर्टाने सांगितले की हा विमा ५ वर्षांकरता घेणे अनिवार्य नाही. त्यामुळे ऑटो कंपन्यात तेजी आली तर जनरल इन्शुअरन्स कंपन्यात किंचित मंदी आली.

काही औषधांवरील GST चे दर कमी केले जाणार आहेत. म्हणून फार्मा सेक्टरमध्ये तेजी होते. भारताला बासमती तांदूळ विकण्यासाठी एक्स्ल्युजीव राईट्स मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा KRBL, LT फूड्स यांना होईल.
टाटा कन्झ्युमर आणि पेप्सी हे ‘रेडी टू ड्रिंक’ या प्रकारात सुधारणा करणार आहेत. पोर्टफोलिओ वाढवणार आहेत आणि भौगोलिक विस्तार करणार आहेत.

मारुती सुझुकीच्या स्विफ्टच्या विक्रीने एकंदर २५ लाखाचा टप्पा १६ वर्षांनंतर पार केला.

आज विजय डायग्नॉस्टिक्स या शेअरचे Rs ५४०.०० वर ( IPO मध्ये Rs ५३१ला दिला होता) तर अमी ऑर्गनिक्स चे NSE वर लिस्टिंग Rs ९१० वर झाले आणि BSE वर Rs ९०२.०० वर झाले ( IPO मध्ये हा शेअर Rs ६१० ला दिला होता.)
टाटा मोटर्सने टाटा पॉवरबरोबर रूफ टॉप सोलर प्रोजेक्ट साठी करार केला.

M TAR टेक्नॉलॉजी या कंपनीला ब्लूम एनर्जी कडून आतापर्यंत सर्वात मोठी Rs २२० कोटींची ऑर्डर मिळाली.

ऑगस्ट २०२१ महिन्यासाठी WPI ११.३९% ( जुलै २०२१मध्ये ११.१६% होता) एवढे आले.

आज पॉवर , केमिकल्स, रिअल्टी, ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीज, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२४७ NSE निर्देशांक निफ्टी १७३८० बँक निफ्टी ३६६१३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.