आजचं मार्केट – १५ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १५ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७४ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=७३.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.६१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२६ VIX १३.६० PCR १.५६ होते.

USA मध्ये महागाईचे आकडे आले. ५.४% वरून महागाई ५.३% झाली. म्हणजेच पॉवेल यांचे सध्या असलेली महागाई तात्पुरती आहे आणि ती हळू हळू कमी होईल हे प्रतिपादन खरे ठरले. वापरलेली पॅसेंजर वाहने आणि ट्रकस यांची विक्री ४१.७% वरून ३१.९% एवढी झाली. ह्या सगळ्यामुळे काल USA मधील तिन्ही निर्देशांक मंदीत होते.

आज पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसचा निर्देशांक तेजीत होता. सरकारने टेलिकॉम आणि ऑटो आणि ऑटो अँसिलिअरि सेक्टर, ड्रोन आणि ड्रोन अँसिलिअरि उत्पादक यांच्या साठी PLI स्कीम जाहीर केली.

AGR ची व्याख्या सुधारली. नॉन टेलिकॉम रेव्हेन्यूज AGRच्या व्याख्येतून वगळले.ऑटोमॅटिक रूटने काही अटींवर १०० % FDI ला परवानगी दिली. AGR ड्यूजचे पेमेंट करण्यासाठी ४ वर्षांचा मोरॅटोरियम पिरियड दिला. स्पेक्ट्रमसाठी लायसेन्स फी ८% ऐवजी ६% केली. स्पेक्ट्रमची मुदत ३० वर्षे केली १० वर्षांनंतर(लॉकइन पिरियड) न वापरलेला स्पेक्ट्रम सरेंडर.चार्जेस पेड करून सरेंडर करता येईल.किंवा ट्रान्स्फर करता येईल. टॉवर रोल आऊट ची ची प्रोसेस सोपी केली.आता टॉवर्स रोल आउट सेल्फडिक्लरेशन रूटने होईल. राउटर, 5G नेटवर्क इक्विपमेंट, ब्रॉडबँड ट्रान्समिशन आणि इलेक्ट्रॉनिक आयटेम्.यांच्या उत्पादनासाठी PLI स्कीम लागू होईल. थकबाकी इक्विटीमध्ये परावर्तित करण्याची सवलत दिली.मासिक कंपाऊंडिंग ऐवजी वार्षिक कंपाऊंडिंग केले जाईल. दंड रद्द केला. या सवलतींमुळे टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांच्या आणि त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांच्या उदा इंडसइंड बँक IDFC Istबँक यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
सरकारने इलेक्ट्रिक वेहिकल, हायब्रीड व्हेइकल्स आणि त्यांच्या कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी PLI स्कीम जाहीर केली. त्यासाठी Rs २६००० कोटींची तरतूद केली. ड्रोन आणि ड्रोन कंपोनंन्टसाठी Rs १२० कोटींची तरतूद केली. या PLI स्कीममध्ये सामील होण्यासाठी कंपन्यांना ठरावीक रकमेची भांडवली गुंतवणूक ५ वर्षात करावी लागेल. ही PLI योजना मंजूर झाल्यावर ऑटो आणि ऑटो अँसिलिअरी कंपन्यांच्या आणि ड्रोन बनवणाऱ्या झेन टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या शेअर्सध्ये तेजी होती.

सरकारने NARCL (नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड उर्फ बॅड बँकेची ) च्या स्थापनेची घोषणा केली. या बँकेत १२% स्टेक असलेली कॅनरा बँक ही लीड स्पॉन्सर असेल आणि ७ राष्ट्रीयीकृत बँका मेंबर असतील. या बँकेसाठी सरकारने Rs ३१००० कोटींची गॅरंटी देण्याचे मान्य केले.

डाबरने त्यांच्या उत्पादनाच्या किमती २% ते ७.५% एवढ्या वाढवल्या.

स्पाईस जेटने ३६ नवीन नॉनस्टॉप उड्डाणे सुरु केली. यात डोमेस्टिक आणि आंतराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे.

JK सिमेंटने तारण म्हणून ठेवलेले ४०.२% स्टेक एवढे शेअर्स सोडवले.

श्री सिमेंट कॅप्टिव्ह सोलर प्लांटसाठी Rs ५०० कोटी गुंतवणूक करणार आहे. राजस्थान सिमेंट प्लांटमध्ये Rs ३५०० कोटी गुंतवणार आहे. पुरुलिया किंकर युनिटमध्ये Rs ७५० कोटी गुंतवणार आहे.

नैसर्गिक गॅसच्या किमती वाढत आहेत. US $ ५.२८ mmbtu एवढी झाली आहे. त्यामुळे गॅसला GST च्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत आहे.

तांदळाचे भाव उत्तर भारतात सरबत्ती आणि सेला या दोन्ही मार्केटमध्ये Rs ३०० प्रती टन एवढे वाढले त्यामुळे KRBL आणि LT फूड्स या शेअर्स मध्ये तेजी आली.

गणेश बेन्झोप्लास्ट या कंपनीचे NSE वर उद्या लिस्टिंग होईल.

RBL बँकेने मास्टर कार्ड, व्हिसाच्या पेमेंट नेट्वर्कवरून इशू करायला सुरुवात केली. म्हणून RBL बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

फोर्स मोटर्सने त्यांच्या गोरखा २०२१ या मॉडेल्सची सर्व माहिती सांगितली दसर्याच्या मुहूर्तावर गोरखा वाहने मार्केटमध्ये येतील. म्हणून आज शेअरमध्ये तेजी होती.

टाटांनी आणि अजयसिंग यांनी अर इंडियासाठी बोली दिली.

रॉयल ओर्चीड या कंपनीने ७ नवीन हॉटेल्स उघडली.

सरकार हिंदुस्थान कॉपर या कंपनीतील ५% स्टेकची OFS द्वारे डायव्हेस्टमेन्ट करणार आहे. या OFS ची फ्लोअर प्राईस Rs ११६ असेल.

आज सेन्सेक्सने ५८७७७ आणि निफ्टीने १७५३२ चा ऑल टाइम इंट्राडे हाय नोंदवला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८७२६ NSE निर्देशांक निफ्टी १७५१९ आणि बँक निफ्टी ३६८५२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.