आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७५.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७३.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३३ VIX १५.४३ PCR १.४९ होते.

या आठवड्यात रोज FII चि गुंतवणूक येत होती. USA मध्ये रिटेल विक्रीचे आकडे चांगले आले. गेल्या महिन्यात ०.८% घट होती तर ऑगस्ट महिन्यात ०.७% वाढ झाली. बिझिनेस सेंटीमेंट सुधारले असे सर्व्हे वरून समजले. त्यामुळे US $ निर्देशांक ३ आठवड्याच्या कमाल स्तरावर होता. त्याचप्रमाणे F & O मध्ये आतापर्यंतचे सर्वात जास्त व्हॉल्युम होते.

डेंग्यू तापाची RT-PCR टेस्ट करण्यासाठी जे टेस्ट किट लागते त्याचे उत्पादन करण्यासाठी अंबालाल साराभाई या कंपनीला लायसेन्स मिळाले. FUNGUS साठी असलेले अँफोटेरीसीन हे औषध फक्त अंबालाल साराभाई ही कंपनी बनवते.त्यामुळे या कंपनीचा शेअर अपर सर्किटला होता.

BBL (बायोकॉन बायालॉजिक्स) आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यात करार झाला. त्यानुसार १०० मिलियन डोसेज १५ वर्षात बायोकॉन बायालॉजीक्सला मिळतील. आणि सिरम इन्स्टिट्यूटला BBL मध्ये १५% स्टेक मिळेल. ह्याचे व्हॅल्युएशन US $ ४.९ बिलियन केले गेले. अदर पुनावाला यांना BBL बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये १ सीट मिळेल. व्हॅक्सिन आणि अँटीबॉडीजचे उत्पादन करण्यासाठी करार केला गेला.

GLOSTER या कंपनीने ज्यूट उत्पादन करणाऱ्या प्लांट मध्ये Rs ३३० कोटींची गुंतवणूक करण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारबरोबर करार केला.

कॉस्मो फिल्म्स ही कंपनी नवीन प्रॉडक्शन लाईन टाकून भांडवली गुंतवणूक करणार आहे. या कंपनीने Rs २५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

टी व्ही एस मोटर्सने इलेक्ट्रिक सायकल, ई-बाईक्स बनवणाऱ्या EGO या कंपनीतील ८०% स्टेक घेतला.

व्हाइट गुड्स PLI योजनेसाठी Rs ५८८६ कोटी मंजूर केले. याचा फायदा अंबर, डिक्सन, वोल्टस, हॅवेल्स, ब्ल्यू स्टार या कंपन्यांना होईल.

आजच्या GST कौन्सिलच्या मीटिंग मध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
(१) कॉर्बोनेटेड फ्रुट पेये किंवा ज्या कॉर्बोनेटेड पेयात फ्रुट ज्यूस आहे अशा कॉर्बोनेटेड पेयांवर २८% GST आणि १२% कॉम्पेन्सेशन आकारण्यात येईल.
(२) आयर्न, मँगेनीज, कॉपर, निकेल, कोबाल्ट, अल्युमिनियम, लेड, झिंक, क्रोमियम या धातूंवरील GST ५% वरून १८% केली.
(३) केरळ राज्याने खोबरेल तेलाच्या खाद्यतेल म्हणून वर्गीकरणात बदल करण्यास विरोध केल्यामुळे खोबरेल तेलावर GST आकारण्याचा प्रस्ताव रद्द केला.
(४) कोवीड संबंधित औषधे आणि उपकरणे यावरील GST मध्ये दिलेल्या सवलतींची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली. तसेच आणखी काही औषधांचा या सवलतीसाठी समावेश केला.

सरकार चीनमधून आयात होणाऱ्या PTFE वर अँटी डम्पिंग ड्युटी लावणार. याचा फायदा गुजरात फ्लोरोला होईल
पेट्रोल डिझेल आणि नैसर्गिक गॅसचा GST अंतर्गत समावेश करण्यास बहुसंख्य राज्य सरकाराने विरोध केल्यामुळे हा विचार स्थगित केला. .

म्युच्युअल फंडाच्या बिझिनेस मधील स्टेक विकण्यासाठी IDFC ला परवानगी मिळाली.

बजाज होल्डिंग लिमिटेड या कंपनीने Rs ९० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला याची रेकॉर्ड डेट २९ सप्टेंबर २०२१ असेल आणि ११ ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्याला जमा होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९०१५ NSE निर्देशांक निफ्टी १७५८५ बँक निफ्टी ३७८११ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.