आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७६.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs. ७३ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.४६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.३० VIX १६.४९ PCR १.१५ होते.

आज फेडने आपल्या बैठकीत जाहीर केले की आम्ही तूर्तास व्याज दरात कोणताही बदल करत नाही तसेच रोजगारातील समाधानकारक प्रगती आणि महागाईवरचे नियंत्रण यशस्वी झाले आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोव्हेंबर २०२१ आणि उशीरात उशीरा २०२२ च्या मध्यापासून आम्ही बॉण्ड खरेदीमध्ये कपात करायला सुरुवात करू.२०२२ पासून व्याजदर वाढवायला सुरुवात करू आणि २०२४ पर्यंत ५ ते ६ वेळा ही वाढ केली जाईल. फेडच्या या निर्णयामुळे मार्केटने सुटकेचा सुस्कारा सोडला.

दुसरीकडे ‘EVERGRANDE’ या चिनी रिअल इस्टेट दिग्गज कंपनीने सांगितले की आम्ही कर्जावरील व्याज वेळेत आणि पूर्णपणे फेडू. चीनची सेंट्रल बँक अल्प मुदतीसाठी चीनच्या अर्थव्यवस्थेत US $ १८.८ बिलियन एवढा पैसा इंजेक्ट करेल.
या दोन्ही महत्वाच्या बाबतीत अनुकूल खुलासा आल्यामुळे USA ,युरोप, आशिया आणि भारतातील मार्केट्स तेजीत होती.

USA मध्ये क्रूडचा साठा कमी आणि मागणीत वाढ यामुळे आज क्रूडने US $ ७६ प्रती बॅरेलची पातळी ओलांडली.

भारती एअरटेलने त्यांच्या राईट्स इशूसाठी २८ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. हा Rs २१००० कोटींचा राईट्स इशू ५ ऑक्टोबर २०२१ रोजी ओपन होऊन २१ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद होईल. भारती एअरटेलने जुलै महिन्यात नवीन १९ लाख ग्राहक जोडले.

मेट्रोपॉलिटन मार्केट्स मधील ऑप्टिकल नेटवर्क क्षमता वाढवण्यासाठी भारती एअरटेलने तेजस नेटवर्कची निवड केली आहे.

कल्पतरू पॉवरला रवांडा एनर्जी ग्रुप बरोबरच्या केसमध्ये Rs २३६ कोटींचे आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.

मूडीज ही आंतराष्ट्रीय ख्यातीची रेटिंग एजन्सी भारताचे रेटिंग वाढवणार आहे.

पारस डिफेन्स & स्पेस या कंपनीचा IPO २३३ वेळा भरला.

सरकार लवकरच पर्यटन धोरणाची घोषणा करेल. हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्सना इंफ्राचा दर्जा मिळेल. सरकार ५ लाख पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचा विचार करत आहे. विमान कंपन्यांना ८५% क्षमतेवर काम करायला परवानगी दिली. जुलै २०२१ नंतर ऑक्युपन्सी रेट मध्ये वाढ झाली आहे.

टाटा एअरबस उत्पादन करण्यासाठी उत्तर प्रदेशात प्लांट उभारणार आहे. टाटा भारतीय लष्कराला ५६ एअरबस पुरवतील. टाटांबरोबर सरकारने हे Rs २६००० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट केले.

JBM ऑटोला ५०० इलेक्ट्रिक आणि CNG बसेसची ऑर्डर मिळाली.

एशियन पेंट्स ही कंपनी त्यांच्या VIZAG येथील प्लांटची क्षमता ५ लाख किलोलिटरपर्यंत वाढवणार आहे.

हिरो इलेक्ट्रिक त्यांची उत्पादन क्षमता १लाख युनिटवरून २०२२ पर्यंत ५ लाख युनिट करणार आहे.

ज्युबिलण्ट इंग्रेव्हियाची सबसिडीअरी ज्युबिलण्ट लाईफ त्यांचा ‘सेफ फूड कॉर्प’ मधील १०% स्टेक Rs १३४.२० कोटींना विकणार आहे. ज्युबिलण्ट फूड्स ही कंपनी ‘WELLVERSED हेल्थ’ मधील २५% स्टेक खरेदी करणार आहे.

IRCTC एअरपोर्टच्या धर्तीवर १२ शहरात एक्झिक्युटिव्ह लाउंज बांधणार आहे. तसेच फूड प्लाझा बांधणार आहे. या एक्झिक्युटिव्ह लाउंज मध्ये लायब्ररी, MULTICUSIN असेल. IRCTC या वर प्रती लाउंज Rs २ कोटी ते Rs ४ कोटी खर्च करेल. पाटणा, बनारस आणि चंदीगड यांचा यात समावेश असेल.

सरकार तीन वर्षात ७ मेगा टेक्सटाईल पार्क्स बनवणार आहे. हा प्रत्येक पार्क १०० एकर जागेत बनवला जाईल.

KPIT टेक ही कंपनी ‘फ्युचर मोबिलिटी’ या कंपनीत २५% स्टेक घेणार आहे.

USA मध्ये ‘AFFLE’ या कंपनीला ड्रायव्हिंग APP इन्स्टालेशन टेक्नॉलॉजी साठी पेटंट मिळाले.

कुबोटा ही जपानी कंपनी एस्कॉर्टस मधील आपला स्टेक वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनी एस्कॉर्टसबरोबर R & D सेंटर चालू करणार आहे.

GR इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला NHAI कडून ९३० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

टेलिकॉम कंपन्यांना कोणतेही उपकरण लावण्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. GRM ओव्हरसीज या कंपनीने आपल्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट केले.

आज भारतीय मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी होती. निफ्टीने १७८४३ तर सेन्सेक्सने ५९९५७ हे इंट्राडे ऑल टाइम हाय रेकॉर्ड केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८८५ NSE निर्देशांक निफ्टी १७८२२ तर बँक निफ्टी ३७७७१ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.