आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०२१

आज क्रूड US $ ७८.७५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.३२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५० VIX १८.५० PCR ०.८७ होते.

आज मार्केट F & O च्या एक्स्पायरीमुळे खूपच वोलटाइल होते. चीनमध्ये EVERGRANDE या दोन नंबरच्या कंपन्यांबरोबरच इतर रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थीक अडचणी वाढत आहेत. चीनच्या स्थानिक सरकारने खूप कर्ज घेतले आहे. हे कर्ज बॅलन्स शीटमध्ये दाखवत नाहीत.सरकार खर्च भागवण्यासाठी विजेचे दर वाढवत आहेत.
तसेच चीनमध्ये मेटल अलॉईजची टंचाई जाणवत आहे. विशेषतः फेरो सिलिकॉन आणि फेरो मँगेनीजची टंचाई जाणवत आहे. या मुळे भारतात फेरो सिलिकॉन आणि फेरो मँगेनीज बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. उदा. श्याम मेटॅलिक्स, मैथॉन अलॉयज

चीनमधून आयात होणाऱ्या डेकोर पेपरवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावण्याची DGTR ने शिफारस केली आहे. याचा फायदा ITC ला होईल.

USA च्या फायनान्स सेक्रेटरीनीही इशारा दिला आहे की त्यांच्याकडे आता जेमतेम १५ ते २० दिवस प्रशासकीय खर्च चालविण्याइतकी कॅश आहे. त्यामुळे त्यांनी हाउस ऑफ रिप्रेझेंटीव्ह्जना अंदाज पत्रक वाढवण्याची विनंती केली आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी RBI ने ७.९५ बेस रेट ठरवला.

भारती एअरटेलने आज NXTRA च्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. येत्या दोन ते तीन वर्षांत भारती एअरटेल ७ मोठ्या डेटा सेंटर्सवर Rs ५००० कोटी एवढी गुंतवणूक करेल.

सणासुदीच्या मौसमात निर्यात वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. या साठी ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग असिस्टंसची मर्यादा वाढवणात आहेत. या अंतर्गत लेदर. टेक्सटाईल्स, ज्वेलरी इत्यादी सेक्टर येतील.

ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की हायड्रोजन प्लांटच्या जवळपास रोड. पूल इत्यादी इंफ्रासाठी सरकार मदत करेल.
सरकार साखरेपासून बनवलेल्या एथॅनॉलच्या दरात Rs १.५० प्रती लिटर वढी वाढ करण्याची शक्यता आहे. सरकारचे इथेनॉल उत्पादन आणि त्याचे ब्लेंडींग वाढवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. १ डिसेम्बरपासून इथेनॉल सप्लाय सुरु होईल.
दिलीप बिल्डकॉनला दिलेला मनाई हुकूम हटवल्यामुळे ते आता NHAI च्या प्रोजेक्टसाठी बीड करू शकेल.

१ ऑक्टोबर ( ऑक्टोबर सिरीज) पासून अबॉट लॅबोरेटरीज, इंडिया सिमेंट, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, दालमिया भारत, डेल्टाकॉर्प, JK सिमेंट, ओबेराय रिअल्टीज, पर्सिस्टंट सिस्टिम्स ह्या आठ कंपन्यांचे शेअर्स F & O सेगमेंटमध्ये समाविष्ट होतील.

इन्व्हेस्को या झी एंटरटेनमेंटच्या शेअरहोल्डरने कंपनीची एक्स्ट्रा ऑर्डीनरी जनरल मीटिंग बोलावण्यासाठी कंपनीला विनंती केली होती. कंपनीने ही EGM २१ दिवसांच्या आत बोलवायला पाहिजे होती. कंपनीने EGM बोलावली नाही त्यामुळे इन्व्हेस्कोने NCLT कडे धाव घेतली . NCLT ने सांगितले की शेअरहोल्डर्सच्या EGM बोलावण्याच्या विनंतीला कंपनी नकार देऊ शकत नाही.

संरक्षण मंत्रालयाने आज Rs १३१६५ कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली. यात ४९६२ रॉकेट्स, २५ मार्कंड हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे डीझोल्युशन करून त्यांचा कर्मचारी वर्ग आणि मालमत्ता वेगवेगळ्या PSU कडे वर्ग केले.

RBI ने काही अटीवर इंडियन ओव्हरसीज बँकेला PCA मधून बाहेर काढले. त्यामुळे या बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.
JK सिमेंटने त्यांच्या राजस्थानमधील क्लिंकर उत्पादन प्लांटची क्षमता ६५५० टन केली.

SRF या कंपनीने त्यांच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट १४ ऑक्टोबर २०२१ तर IRCTC ने आपल्या शेअर स्प्लिटसाठी २९ ऑक्टोबर २०२१ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली.

इनोव्हेशन, नवीन क्षेत्र आणि नवीन तंत्रज्ञान यामुळे ऍडव्हान्स एन्झाईम या कंपनीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अडानी ग्रीन ही कंपनी व्हेंटो एनर्जी या कंपनीला खरेदी करणार आहे.

‘RYALTRIS’ च्या मार्केटिंगसाठी युरोपियन युनियनमधील १३ देशात आणि UK मध्ये ग्लेनमार्क फार्माला परवानगी मिळाली.

PLI योजनेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना LOI ( लेटर ऑफ इन्टेन्ट) द्यायला DOT ने सुरुवात केली आहे. या कंपन्यांना २% ते ६% इन्सेन्टिव्ह दिली जाईल. ही Rs १२१९५ कोटींची योजना आहे. ITI, तेजस नेटवर्क, डिक्सन, अंबर
टाटा स्टीलने त्यांचा NatSteel होल्डिंग pte मधील आपला स्टेक Rs १२७५ कोटींना विकला. याचा विनियोग कर्ज फेडण्याकरता करू असे व्यवस्थापनाने सांगितले.

पर्सिस्टंट सिस्टिम्स ही कंपनी सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन इंटरनॅशनल आणि श्री इन्फोसॉफ्ट या दोन्ही कंपन्या US $ ६० मिलियनना खरेदी करणार आहे . बँकिंग फायनान्सियल सर्व्हिसेस आणि इन्शुअरन्स यांना सेवा पुरवण्यात मदत होईल. या क्षेत्रात क्लाउड आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर मधील क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यामुळे कंपनीचा शेअर लक्षणीय तेजीत होता.

सरकारचा टॅक्स रेव्हेन्यू Rs १.६४ लाख कोटी झाला. रेव्हेन्यू गॅप कमी होऊन Rs ३.११ लाख कोटी झाली. फिस्कल डेफिसिट ४.६८% झाली.

शिपिंग कॉर्पोरेशनमधील नॉनकोअर ऍसेट वेगळे काढून त्याची एक वेगळी कंपनी बनवली जाईल. SCI च्या शेअरहोल्डर्सना या डीमर्ज्ड एंटिटीचा त्यांच्या कडे असलेल्या १ शेअरमागे १ शेअर मिळेल. ही नवीन कंपनी नंतर स्टॉक एक्सचेंजीसवर लिस्ट केली जाईल.

वेदांता SCI साठी बीड देण्याची शक्यता आहे.

इनॉक्स लेजर आणि ITC मध्ये इनॉक्सच्या थिएटर्समध्ये फूड इटेम्स , रेडी टू इट, GOURMET ब्रँड किचन्स मधून पुरवण्यासाठी करार झाला. त्यामुळे दोन्ही शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९१२६ NSE निर्देशांक निफ्टी १७६१८ बँक निफ्टी ३७४२५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.