Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०२१
आज क्रूड US $ ८४.५९ प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.७५ च्या आसपास US $ निर्देशांक ९३.५० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६० VIX १८ च्या आसपास PCR ०.९७ होते.
USA मध्ये स्टारबक्स, अँपल यांचे निकाल चांगले होते पण अँपलचा आऊटलूक खराब होता. अमेझॉनचे निकाल निराशाजनक होते. USA चे GDP ग्रोथ २% ( अपेक्षा २.७%ची होती) राहिली. काल सर्व मेटल्सच्या किमती कमी झाल्या. काल निफ्टी १८००० च्यापेक्षा कमी झाल्यावर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी ( FII ) विक्री केली.
आज DLF चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. सुपर लक्सझरी सेगमेंटमध्ये चांगली ग्रोथ दिसली.
AU स्मॉल फायनान्स बँक, फोसेको, ALLSEC टेक्नॉलॉजी ( तोट्यातून फायद्यात), BEL PIM वाढले ( प्रॉफिट, इन्कम, मार्जिन),.वोल्टास( PIM वाढले), टी व्ही टूडे, वरूण बिव्हरेजीस,कॅडीला हेल्थकेअर, HT MEDIA ( तोट्यातून फायद्यात), LT फूड्स( मार्जिन कमी झाले.), कोलते पाटील, GAIL ( PIM वाढले) DR रेड्डीज, अतुल ऑटो( प्रॉफिट मार्जिन कमी झाले उत्पन्न वाढले.), अजंता फार्मा ( कंपनीने Rs ९.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला हा लाभांश १६ नोव्हेंबर किंवा त्यानंतर खात्यात जमा होईल.), चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
शिल्पा मेडिकेअर, अडाणी पॉवर, बंधन बँक (प्रॉफीटमधून तोट्यात, तोटा Rs ३००८ कोटी) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते
हिरो मोटोने यमाहाबरोबर इलेक्ट्रिक व्हेईकल साठी करार केला. केवल किरण क्लोदिंग या कंपनीची २८ ऑक्टोबर २०२१रोजी बोनस इशूवर विचार करण्यासाठी बैठक झाली. त्यात एका शेअरला ४ बोनस शेअर देण्याचा निर्णय झाला.
आजपासून GSPL, अतुल लिमिटेड, फर्स्ट सोर्स, SBI कार्ड्स, चंबळ फर्टिलायझर्स, बिर्ला सॉफ्ट, लौरस लॅब्स या कंपन्यांचा F & O सेगमेंटमध्ये नोव्हेंबर सिरीज पासून समावेश होणार आहे.सध्या F & O सेगमेंटमध्ये १८८ शेअर्स ट्रेड होत आहेत.
RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या कार्यकालाची मुदत पुढील ३ वर्षांसाठी वाढवली.
SAPPHIRE ही ‘YUM’ ब्रॅण्डची फ्रँचाइजी KFC ऑपरेटर चा १७.५७ मिलियन शेअर्सचा IPO ( ही सर्व OFS आहे ८.५० लाख शेअर्सQSR मॅनेजमेंट, ५.५७ लाख शेअर्स SAPPHIRE फूड्स आणि ४.८५ लाख शेअर्स WWD रुबी लिमिटेड ) ९ नोव्हेंबरला ओपन होऊन ११ नोव्हेंबर २०२१ रोजी बंद होईल. ही कम्पनी २०४ OWNED आणि ऑपरेटेड KFC रेस्टारंट भारत, श्रीलंका आणि मालदीव्ज मध्ये चालवते. भारत आणि श्रीलंकेमध्ये २३१ पिझ्झा हट्स चालवते. तर श्रीलंकेमध्ये २ TACO बेल रेस्टारंट चालवते.या शेअर्सचे लिस्टिंग २२ नोव्हेम्बरला होईल.
रिलायन्स इंडस्टीज लिमिटेड या कंपनीचा Rs ६२८.५० चा PP पार्टली पेड शेअर्सवरचा फायनल कॉल नोव्हेंबर १५ २०२१ ते नोव्हेंबर २९ २०२१ या दरम्यान भरायचा आहे. ज्या शेअरहोल्डर्सच्या डिमॅट अकाउंटवर १० नोव्हेंबर २०२१ रोजी PP शेअर्स असतील त्यांना फायनल कॉलची रक्कम भरावी लागेल. PP शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२१ असेल. ९ नोव्हेंबर पासून PP शेअर्समध्ये ट्रेडिंग बंद होईल.जर तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या PP शेअरवरच्या फायनल कॉलचे पेमेंट करायचे नसेल तर तुम्ही ८ नोव्हेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी हे शेअर्स विकून टाकायला हवेत अन्यथा तुम्हाला फायनल कॉल भरणे अनिवार्य होईल.
आज IRCTC च्या शेअरमध्ये मार्केटने वोल्टालिटीचे सार्थ दर्शन घडवले. सरकारकडून असे जाहीर झाले की IRCTC ला तिकीट विक्रीच्या कन्व्हिनियन्स चार्ज म्हणून जे उत्पन्न मिळते त्याच्या ५०% रक्कम रेल्वेला द्यावे लागतील. ही बातमी कळल्याबरोबर शेअर २५%पडला. गुंतवणूकदारानी शेअर विकून टाकले. काही चतुर आणि मार्केटमध्ये खूप काळ काम करणारयांनी हे शेअर्स विकत घेतले. ही बातमी आल्यानंतर २-३ तासांत दीपमच्या अध्यक्षांनी सांगितले की आम्ही ही ऑर्डर मागे घेतली आहे. आता IRCTC कडून रेल्वे सध्या तरी कोणतेही चार्जेस घेणार नाही. ही बातमी येताच IRCTC मध्ये गुंतवणूकदारांनी सावध प्रतिक्रिया दिली आणि शेअर Rs ८५० पर्यंत सुधारला. पण ज्यांनी घाईघाईत निर्णय घेऊन शेअर विकले त्यांचे मात्र थोडे फार नुकसान झाले.
सरकारने टॉवर कंपन्यांना एरियल ऑप्टिकल फायबर वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे 5G मध्ये ट्रान्सफॉर्मेशन सोपे होईल आणि त्याची कॉस्टही कमी होईल.
DR रेड्डीजच्या दुवाडा युनिटला USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९३०६ NSE निर्देशांक निफ्टी १७६७१ बँक निफ्टी ३९११५ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!