आजचं मार्केट – १ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ७८.४६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५०च्या आसपास US $ निर्देशांक ९४.३६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४८ VIX १७.२५ PCR १.४४ होते.

युरोझोन मधील महागाई १३ वर्षाच्या कमाल स्तरावर तर जर्मनीमधील महागाई २९ वर्षाच्या कमाल स्तरावर होती. आज USA मधील तिन्ही निर्देशांक मंदीत होते. आणि ही मंदी वाढत गेली. युरोपियन मार्केटही मंदीत होती.ओपेक+क्रूडचे उत्पादन वाढवणार आहे.

सरकारने नैसर्गिक गॅसच्या किमती ६२% ने वाढवल्या. याच्यामुळे ONGC, GAIL, OIL इंडिया यांच्यासाठी फायदेशीर तर फर्टिलायझर, सिरॅमिक टाईल्स उत्पादक कंपन्यांसाठी प्रतिकूल असेल. तसेच महानगर गॅस, गुजरात गॅस, इंद्रप्रस्थ गॅस यांच्या जर ते १००% किमतीतील वाढ कंझ्युमरकडे पास ऑन करू शकले नाहीत तर प्रतिकूल परिणाम होईल. डोमेस्टिक गॅस प्राईस US $ २.९ /mmbtu आणि गॅस प्राईस सिलिंग US $ ६.१३ mmbtu ठरवली.

सरकारने जाहीर केले की ड्रोन आणि ड्रोनच्या कॉम्पोनंट्स साठी २०% इन्सेन्टिव्ह ५ वर्षांसाठी मिळेल. यासाठी सरकारने Rs १२० कोटींची तरतूद केली आहे.

चीन मधून आयात होणाऱ्या स्ट्रेट लेंग्थ बार आणि रॉड्स ऑफ अलॉय स्टीलवरील ऍन्टीडम्पिंग ड्यूटीची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवली.याचा फायदा सन फ्लॅग आयर्न, उषा मार्टिन, JSW स्टील यांना होईल.

ज्युबिलण्ट गोल्डनमधील ३९% स्टेक ज्युबिलण्ट फूडने गोल्डन हार्वेस्ट कडून खरेदी करेल.

आज पारस डिफेन्स या शेअरचे NSE वर Rs ४६९ आणि BSE वर Rs ४७५ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १७५ ला दिला असल्यामुळे ज्या अर्जदारांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.

भारतीं एअरटेलला Rs १०५० कोटी आणि ‘VI’ ला २००० कोटींचा दंड DOT ने केला हे दंड तीन आठवड्यात भरायचे आहेत.

हैदराबाद एअरपोर्ट मध्ये डोमेस्टिक प्रवाशांसाठी आणि परदेशी प्रवाशांसाठी ‘UDF'( युजर डेव्हलपमेंट फी) १ एप्रिल २०२२ पासून वाढवायला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा GMR इन्फ्राला होणार असल्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

सप्टेंबर २०२१ या महिन्यासाठी GST कलेक्शन १.१७ लाख कोटी एवढे झाले.

मिडलँड मायक्रोफायनान्स लिमिटेड या कंपनीतील ९.९% स्टेक ICICI बँकेने Rs ५२.४२ कोटींना खरेदी केला.

Sayshore या कंपनीमध्ये २०% स्टेक US $ १२ लाखांना IPCA लॅबच्या US आर्मने खरेदी केला. त्यामुळे IPCA लॅबच्या शेअरमध्ये तेजी होती.

सरकारने साखर निर्यातीसाठी असलेली मुदत दोन महिन्यांनी वाढवली.

एक्स्ट्रा ऑर्डीनरी जनरल मीटिंग बोलावण्यासाठी झी एंटरटेनमेंट ने असमर्थता व्यक्त केली. तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये बदल करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मंजुरी लागेल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
सेमी कंडक्टर चिप च्या टंचाईचा परिणाम टू व्हीलर तसेच फोर व्हीलर वाहनांच्या उत्पादनावर आणि विक्रीवर होत आहे. मारुतीने जाहीर केले की ते त्यांच्या गुजराथ आणि हरयाणामधील प्लांटच्या उत्पादनात कपात करणार आहेत. सप्टेंबर महिन्यासाठी मारुतीचे विक्रीचे आकडे ४६% ने कमी आले. अशोक लेलँड चे विक्रीच्या आकड्यात सुधारणा दिसली.एकूण वाहनविक्री ९५३३ आणि डोमेस्टिक विक्री ८७८७ युनिट एवढी आली. आयशर मोटर्सच्या कमर्शियल वाहनांच्या विक्रीत आणि निर्यातीमध्ये वाढ झाली. बजाज ऑटो, एस्कॉर्टस यांची विक्री कमी झाली

VST टिलर आणि ट्रॅक्टर्स च्या विक्रीत चांगली वाढ झाली. EV ट्रॅक्टरसाठी इंटिग्रेटेड पॉवर ट्रेन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी करार केला.

अतुल ऑटो, टाटा मोटर्स आणि SML इसुझू या कंपन्यांचे ऑटोविक्रीचे आकडे चांगले आले.

आज PMI सप्टेंबर महिन्यासाठी ५३.७% तर ऑगस्ट महीन्यासाठी ५२.३% होता. यामुळे अर्थव्यवस्था दिवसेंदिवस सुधारत आहे असे म्हणावयास हरकत नाही.

सेरा सॅनिटरीवेअर यांनी सांगितले की GAIL गॅसची किंमत वाढवणार नाही पण साबरमती गॅस कडून मिळणाऱ्या गॅसची किंमत ९% ने वाढणार असल्यामुळे प्रत्येक महिन्याला Rs २९ लाख उत्पादनाची कॉस्ट वाढेल.

फिलिप्स कार्बनने आपल्या QIP इशूची प्राईस Rs २५५.८५ एवढी ठेवली आहे.

लिंडे इंडिया २५० TPD क्षमतेचा एअर सेपरेशन प्लांट लावणार आहे.

आज दिवसभर निफ्टी १७५०० च्या लेव्हल्सवर बुल्स आणि बेअर्स यांची झुंज चालू होती असे दिसले.ही लेव्हल तुटल्यानंतर ‘बाय ऑन डिप्स’ च्या ऐवजी ‘सेल ऑन राईज’ चे धोरण ट्रेडर्स अवलंबतील त्यामुळे ही लेव्हल महत्वाची आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८७६५ NSE निर्देशांक निफ्टी १७५३२ बँक निफ्टी ३७२२५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १ ऑक्टोबर २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.