आजचं मार्केट – ४ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ४ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ७९ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.१० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४९ VIX १६.७३ PCR १.४० होते.

EVERGRANDE या रिअल्टी क्षेत्रातील चिनी कंपनीने बॉण्ड्स वरील व्याजाच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट केला म्हणून हँग सेंग या स्टॉक एक्स्चेंजने त्या कंपनीच्या शेअर्सचे ट्रेंडींग सस्पेंड केले.

ग्रासिम या कंपनीला आय कर खात्याने Rs ८३३४ कोटींचा टॅक्स लावला.

मॅक्रोटेक या कंपनीच्या ‘GROSVENOR’ प्रोजेक्टमध्ये GBP ११ कोटींची विक्री झाली.

HDFC ने १३५% एवढी जास्त कर्ज दिली. Rs ३०२६ कोटींचे Rs ७१३२ कोटी एवढे कर्ज दिले.

D-मार्टने नवीन ८ स्टोर्स उघडले आता त्यांची एकूण २४६ स्टोर्स झाली. त्यांचा रेव्हेन्यू ४६% ने वाढून Rs ७६४९ कोटी होईल असा गायडन्स दिला.

CSB बँकेची डिपॉझिट आणि गोल्ड लोन यांच्यात चांगली वाढ झाली.

येस बँकेचे CASA डिपॉझिट लोन आणि एकूण डिपॉझिट वाढले.

IGL ने PNG चे Rs २.१०/SCM आणि CNG चे रेट Rs २.२८/ SCM असे वाढवले.

PYRETHROID ची टंचाई असल्यामुळे चीनमध्ये शॉर्टेज आहे. युनिट्स बंद पडत आहेत. याचा परिणाम UPL, हेरंबा इंडस्ट्रीज, सुमिटोमो, बेयर या कंपन्यांवर होईल.

NTPC ही कंपनी त्यांच्या समूहातील (१) NEEPCO नॉर्थ इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन
(२) NREL NTPC रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (३) NVVN NTPC विद्युत व्यापार निगम या कंपन्यांच्या IPO ची तयारी करत आहे.

सीएट ही कंपनी क्लिनवीन एनर्जीमधील २६ % स्टेक घेणार आहे. क्लिनवीन एनर्जी ही कंपनी सीएट या कंपनीला पॉवर सप्लाय करेल.

टाटा मोटर्सने टाटा पंच ही SUV लाँच केली.

मारुतीने सांगितले की सेमी कंडक्टर चिपची टंचाई संपल्यावर सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रिक वेहिकल्सची नवीन मॉडेल्स लाँच करू.

मान इन्फ्राने तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर १ बोनस शेअरची घोषणा केली.

GAIT ने E-कॉमर्स कंपन्या नियमभंग करत असल्याची तक्रार केली.

KKR इंडस टॉवर मधील १३ कोटी शेअर्स बल्क डील च्या माध्यमातून विकणार आहे.

एल्प्रो इंटरनॅशनल या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी .कंपनीचा मेटलाईफमधील स्टेक Rs १९०० कोटींना विकण्यासाठी मंजुरी दिली.

कोल इंडियाने सांगितले की कोळशाचे उत्पादन ४०.७ मिलियन टन्स एवढे होईल.

लोक घरात बसून कंटाळले असल्यामुळे रिव्हेंज ट्रॅव्हलचा अवलंब करत आहेत त्यामुळे आज सर्व हॉटेल्स,मद्य आणि खाद्य पदार्थ पुरवणार्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.EIH, इंडियन हॉटेल्स CHALET लेमन ट्री, ताज GVK हे शेअर्स तेजीत होते.
SBI Rs ६००० कोटी भांडवल TIER I बॉण्ड्सच्या रुटने उभारणार आहे.

KNIGHT फ्रॅंक यांच्या रिपोर्टप्रमाणे घरांच्या विक्रीत YOY ९२% वाढ झाली त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

८ ऑक्टोबर २०२१ रोजी TCS आपल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल आणि अंतरिम लाभांशावर विचार करेल.

१९ ऑक्टोबर रोजी HUL आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल आणि अंतरिम लाभांशावर विचार करेल.
एशियन हाऊसिंग या कंपनीने महिंद्रा लाईफ स्टाईल या कंपनीकडून चेन्नईमधील १६ एकर जमीन डेव्हलपमेंटसाठी घेतली.
सिप्ला या कंपनीने ILLI LILLI या कंपनीकडून त्यांच्या मधुमेहावरील ट्रीटमेंटच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला.

अडाणी ग्रीन एनर्जीने S B एनर्जी इंडियाचे US $ ३.५बिलियन मध्ये अक्विझिशन पूर्ण केले. आता अडाणी ग्रीन एनर्जी ही कंपनी जगातील सर्वात मोठी सौरशक्ती उत्पादक कंपनी झाली आहे.

वेदांता भारतामध्ये US $ २० अब्ज एवढी गुंतवणूक करणार आहे. त्यापैकी २५% IT क्षेत्रात तर ७५% इतर उद्योग धंद्यात केली जाईल. वेदांता सरकारी कंपन्यांच्या विक्रीसाठी असलेल्या ब्रीडिंगमध्ये भाग घेईल.

आज डिव्हीज लॅब या कंपनीचा शेअर तेजीत होता. डिव्हीज लॅब ही MSD या कंपनीच्या ‘MOLNUPIRAVIR API’ या औषधाचे अधिकृत उत्पादक आहेत. या औषधामुळे कोविड १९ मध्ये हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू यांच्यात लक्षणीय फरक दिसून आला. जर मर्क या कंपनीला या औषधाच्या इमर्जन्सी वापरासाठी USA मध्ये मंजुरी मिळाली . तर हे तोंडाने घेण्यासारखे पहिले अँटिव्हायरल औषध असेल.

RBI ने श्रेय इन्फ्रा आणि श्रेय इक्विपमेंट फायनान्स या कंपन्यांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रद्द केली आणि ऍडमिनिस्ट्रेटरची नेमणूक केली.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९२९९ NSE निर्देशांक निफ्टी १७६९१ आणि बँक निफ्टी ३७५७९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.