आजचं मार्केट – ५ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ५ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८१.५०प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.५० च्या आसपास US $ निर्देशांक ९३.९८ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५० VIX १६.५० च्या आसपास तर PCR १.४२ होते.

आज क्रूड ३ वर्षांच्या कमाल स्तरावर होते. अर्थव्यवस्था ओपन होत असल्यामुळे वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मागणीत सतत वाढ होत आहे. पण ओपेक+ने आपला ४०००००बॅरेल्स प्रती दिवस उत्पादन वाढवायचा निर्णय कायम ठेवला. ओपेक+ची पुढील बैठक ४ नोव्हेम्बरला होईल. २०११ ते २०१४ या सालात क्रूड US $ १०० प्रती बॅरेल्स च्या वर होते.

चीनमधून आयात होणाऱ्या सिरॅमिक टेबलवेअर आणि किचनवेअर वर अँटी डम्पिंग ड्युटी लावली. याचा फायदा ला ओपाला,ग्लास, स्टोव्हक्राफ्ट, बोरोसिल यांना होईल.

M & M ने XUV ७०० ची दोन व्हरायंट्स लाँच केली. एक्स-७ लक्ज्युरी MT आणि AX ७ लक्झरी -AT + AWD यातील पहिल्या मॉडेलची किंमत Rs१९.९९ लाख ठेवली आहे.

आज सुप्रीम कोर्टात OTSC ( वन टाइम स्पेक्ट्रम चार्जेस) संबंधित सुनावणी होती. पण सरकारने OTSC संबंधात सरकार टेलिकॉम कंपन्यांबरोबर सेटलमेंट करायला तयार आहे असे ऍफिडेव्हिट सादर केले. Rs ४०००० कोटींची थकबाकी संबंधात भारती एअरटेल आणि ‘VI’ ला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज भारती आणि VI च्या शेअर्समध्ये तेजी होती.

सरकारने सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या लायसेंसफीसाठी अटी सोप्या केल्या आणि व्याज,दंड इत्यादींच्या बाबतीतही सूट दिली.
पेपरच्या किमती Rs २००० ते Rs ३००० प्रती टन एवढ्या ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी वाढवल्या.वाहतूक खर्च, रद्दी, कोळसा यांच्या किमती वाढल्यामुळे पेपरच्या किमती वाढवण्यात आल्या. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था तसेच ऑफिसेस अनलॉक होत असल्यामुळे पेपरला मागणी चांगली येईल. यामुळे JK पेपर मालू पेपर, स्टार पेपर,शेषशायी पेपर, वेस्टकोस्ट पेपर, TNPL, ओरिएंट पेपर आणि इतर पेपर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय तेजी होती.

TVS मोटर्सने E-चार्जिंग साठी टाटा पॉवर बरोबर करार केला.

NMDC ने आयर्न ओअर लम्प च्या किमती Rs २०० प्रती टन आणि आयर्न ओअर फाईन च्या किमती Rs ४०० प्रती टन कमी केल्या.

IDFC I st बँकेच्या डिपॉझिटमध्ये २०.८०% वाढ होऊन ती Rs ८३७९० कोटी झाली. CASA रेशियो ४०.३ वरून YOY ५१.९० झाला.

४ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ६-१५ ते ७-१५ दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग होईल. ६ ते ६-०८ या दरम्यान प्री ओपन सेशन होईल.

मॅन्युफॅक्चरिंग PMI सप्टेंबर २०२१ महिन्यासाठी ५३.७ ( ऑगस्ट २०२१मध्ये ५२.५ होता) तर सर्व्हिस PMI ५५.२ ( ऑगस्टमध्ये ५६.७ होता). अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले चिन्ह आहे.

ग्लॅन्ड फार्मा RDIF बरोबर स्पुटनिक V लाईट व्हॅक्सिनचे उत्पादन करून निर्यात करेल.

आज पासून भारती एअरटेलचा राईट्स इशू सुरु झाला. या इशूसाठी राईट्स एंटायटलमेण्टचे लिस्टिंग होऊन ट्रेडिंग सुरु झाले. राईट्स एंटायटलमेंट ट्रेड टू ट्रेड कॅटेगरीत ठेवले आहे. या मध्ये ट्रेडिंग १४ ऑक्टोबर पर्यंत ओपन राहील. जे राईट्स एंटायटलमेंट होल्डर्स राईट्स साठी अर्ज करणार नाहीत किंवा राईट्स रिनाऊन्स करणार नाहीत त्यांचे राईट्स एंटायटलमेंट लॅप्स होईल. एंटायटलमेंट टू राईट फक्त राईट्स इशूमध्ये सहभागी होण्याचा हक्क देतो. याचा अर्थ तुम्हाला १ राईट्स साठी अर्जाबरोबर राईट्स एंटायटलमेंटची किंमत अधिक Rs १३३.७५ अप्लिकेशन मनी एवढा खर्च येईल. आज RE Rs १९१ वर ओपन झाला आणि ४०% सर्किटवर Rs २०४.५० वर बंद झाला. तुम्हाला या RE मध्ये ट्रेडिंग करायचे असल्यास ट्रेड टू ट्रेड कॅटेगरीत आहे हे लक्षात ठेवावे. जर तुम्ही वेळेत RE विकू शकला नाहीत आणि राईट्स साठी अर्ज केला नाही किंवा रिनाउन्स केले नाही तर ते लॅप्स होतील.

वाढत्या क्रूड गॅसच्या किमतींमुळे तेल गॅस पॉवर आणि TCS आणि इन्फोसिस आणि इतर IT क्षेत्रातील कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येण्याची शक्यता असल्यामुळे IT क्षेत्रात खरेदी झाली.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९७४४ NSE निर्देशांक निफ्टी १७८२२ बँक निफ्टी ३७७४१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.