आजचं मार्केट – ६ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८२.७३ प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१=Rs.७५ च्या आसपास होते. US $निर्देशांक ९४.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५४ VIX १६ तर PCR १.२० होते.

आज USA मधील तसेच युरोप मधील मार्केट्स तेजीत होती. चीनमधील मार्केट्स बंद होती.

चीनच्या रिअल्टी सेक्टरमधील दोन नंबरची दिग्गज कंपनी ‘FANTASIA होल्डिंग ही पेमेंटमध्ये डिफॉल्ट करण्याची शक्यता आहे.

मूडीजने भारताविषयी आऊटलूक निगेटिव्ह वरून स्टेबल केला आणि रेटिंग Baa3 केले.

आज मेरीकोने सांगितले की व्हॉल्यूममध्ये २०% ग्रोथ होईल पण इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे मार्जिन प्रेशरमध्ये राहू शकते.

सरकारने सांगितले की ज्या कंपन्यांकडे कॅप्टिव्ह कोळशाच्या खाणी आहेत त्या कंपन्या त्यांच्या कोळसा उत्पादनाच्या ५०% उत्पादन मार्केटमध्ये विकू शकतात. याचा फायदा टाटा स्टिल, JSPL, SAIL, NLC यांना होईल.

आज महानगर गॅसने CNG ची किंमत Rs २.२७ आणि PNG ची किंमत Rs २.५९ ने वाढवली.

गोदरेज कंझ्युमरने सांगितले की डोमेस्टिक व्हॉल्युममध्ये डबल डिजिट ग्रोथ होईल पण एक्स्पोर्ट मार्केट्सचा थोडा थंडा प्रतिसाद असेल. इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे मार्जिन प्रेशरमध्ये असेल.

AU स्मॉल फायनान्स बँकेची लोन्स आणि डिपॉझिटमध्ये YOY चागली ग्रोथ आहे.

RBL बँकेच्या डिपॉझिट आणि लोन्स मध्ये माफक ग्रोथ झाली. CASA रेशियो मात्र ३५.३७ झाले.

केम्प्लास्ट सनमार या कंपनीने सांगितले की FY २१-२२ च्या पहिल्या सहामाहीत व्हॅल्यूम ३०% ते ३५% ने वाढेल. .

बजाज फायनान्सची लोन संख्या ६३ लाख झाली.लोनच्या रकमेत ७५% तर डिपॉझिट्समध्ये ३२% वाढ झाली.

रेमंड त्यांच्या ठाणे कॉम्प्लेक्स मध्ये ९.५ एकर्समध्ये कमर्शियल प्रोजेक्ट तर १० लाख SQUARE फीट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट उभारणार आहे.

आज ऊर्जा मंत्रालयानें REC आणि PFC या कंपन्यांना सांगितले की तुम्ही तुमची फंड रेजिंगची कॉस्ट कमी करावी. म्हणजे ते वीज उत्पादन आणि वितरण कंपन्यांना स्वस्त कर्ज देऊ शकतील.

आज टेलिकॉम सेक्टरमध्ये ऑटोमॅटिक रुटने १००% FDI मंजूर करणारे नोटिफिकेशन जाहीर केले.

सरकारने देशात ७ मेगा टेक्सटाईल पार्क बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याच फायदा बॉम्बे डाईंग, सतलज टेक्सटाईल्स, वर्धमान टेक्सटाईल्स, अंबिका कॉटन यांना होईल.

TCS ने SBI बरोबरचा डिजिट सोल्युशनसाठी असलेलया कराराची मुदत ५ वर्षाने वाढवली.

सूर्य रोशनीचे रेटिंग ICRA ने A+वरून AA- असे वाढवले.

आज पासून RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरु झाली. RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण ८ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करेल.

वेदांता हिंदुस्थान कॉपरमधील सरकारचा स्टेक अकवायर करण्याची शक्यता आहे.

रिलायन्सचे वेटेज वाढण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या पार्टली पेड शेअर्सच्या शेवटच्या कॉलचे पेमेंट नोव्हेम्बरमध्ये ड्यू आहे.

आज दुपारपर्यंत वेगात असलेल्या तेजीला शेवटच्या १ तासात जबरदस्त खीळ बसली. मार्केट सेन्सेक्स ६०० पाईंट पडले.
FMCG सेक्टरमध्ये मात्र माफक तेजी राहिली.

सप्टेंबर २१ अखेर पुऱ्या झालेल्या वर्षात साखर उत्पादक कंपन्यांनी ७.२३ मिलियन टन्स साखरेची निर्यात केली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९१८९ NSE निर्देशांक निफ्टी १७६४६ आणि बँक निफ्टी ३७५२१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.