आजचं मार्केट – ७ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८०.९५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.५० च्या आसपास होते.US $ निर्देशांक ९४.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५३ तर नैसर्गिक गॅस US $ ५.८/mmbtu होते. VIX १६.१५ तर PCR १.२१ होते.

आज जागतिक संकेत चांगले होते. रुपयाने ५ महिन्यातील रेट US $१= Rs७४.९८ गाठला कारण US $ मजबूत झाला.USA सिनेट मधील रिपब्लिकन पक्षाने USA च्या DEBT सीलिंगची मुदतवाढ मंजूर केली.USA मध्ये प्रायव्हेट एम्प्लायमेंटचा डेटा अपेक्षेपेक्षा चांगला आला. प्रायव्हेट सेक्टरने ५६८०० लोकांना नोकऱ्या दिल्या. USA आणि एशियातील मार्केट्स तेजीत होती तर युरोप मधील मार्केट्स मंदीत होती.

USA मधील इन्व्हेंटरीजमध्ये अनपेक्षित वाढ झाल्यामुळे क्रूड आज US $ ८० प्रती बॅरेलच्या स्तरावर आले.

मूडीजने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, ICICI बँक, HDFC बँक, ऍक्सिस बँक PNB, कॅनरा बँक एक्सिम बँक या बँकांचा आऊटलूक निगेटिव्ह वरून स्टेबल केला.

नोव्हेम्बर २०२१ पासून ८ कंपन्यांचे शेअर्स F & G सेगमेंटमध्ये समाविष्ट होतील. त्यामुळे आता F & O सेगमेंटमध्ये १८९ शेअर्स ट्रेड होतील. त्यात बिर्ला सॉफ्ट, चंबळ फर्टिलायझर, SBI कार्डस, अतुल लिमिटेड , फर्स्ट सोर्स सोल्युशन्स, लौरास लॅब्स, GSPL,व्हर्लपूल यांचा समावेश आहे.

टायटनचे दुसर्या तिमाहीचे आकडे चांगले आले. ज्वेलरी सेगमेंटमध्ये ७८% तर वॉचेस आणि अपरल्स बिझिनेस मध्ये ७३% वाढ झाली. कंपनीने नवी ४५ स्टोर्स उघडली.टायटनची विक्री प्रीकोविड स्तरावर आली.

टेलिकॉम डिपार्टमेंटने सांगितले की आता कंपन्यांना २०% बँक गॅरंटी द्याव्या लागतील. ८०% गॅरंटीज परत केल्या जातील. त्यामुळे VI चा Rs १०००० कोटी ते १२००० कोटी भारती एअरटेलला Rs ८००० कोटी आणि रिलायन्स जिओला Rs ७०००कोटी ते Rs ८००० कोटींचा फायदा होईल.

LIC ने कॅडीला हेल्थकेअरमधील स्टेक ३.६३% वरून ५.६८% केला. तसेच अंबुजा सिमेंट मधील ३.९९ कोटी शेअर घेऊन आपला स्टेक ४.११% वरून ६,१२% एवढा केला.

शोभाची विक्री वाढली तर टाटा मोटर्सची विक्री कमी झाली.

स्टॉक एक्सचेंजीस नी काही शेअर्सची सर्किट फिल्टर वाढवले. उदा पंजाब अल्कली, RSWM, NACL इंडस्ट्रीज, न्यूरेका, धामपूर शुगर.

सिमेंटच्या किमती Rs १० ते Rs ५० प्रती बॅग वाढवल्या. आंध्र तेलंगाणा कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये Rs ५० प्रती बॅग किंमत वाढवली.

कल्याण ज्वेलर्सची विक्री वाढली. सेम स्टोर्स सेल्स ग्रोथ चांगली झाली.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ७-११ स्टोर्स या USA मधील जपानी कंपनीबरोबर भारतात ७-११ स्टोर्स उघडण्यासाठी करार केला. मुंबईमध्ये शनिवारी पहिले ७-११ स्टोर्स सुरु होईल. ही शपिंग चेन पॅक्ड फूड आणि बिव्हरेजीसची विक्री करते.
WHO ने मलेरियाच्या व्हॅक्सिनसाठी IPCA लॅब आणि GSK फार्माची निवड केली.

सेबी आता IPO मधील HNI सेगमेंटचे विभाजन करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. पहिल्या भागात Rs २ लाख ते Rs १० लाख आणि दुसर्या सेगमेंटमध्ये Rs १०लाख आणि त्यापुढील रकमेसाठीचे अर्जदार अशी विभागणी होईल.

तिरूमलै केमिकल्सच्या CMD ने सांगितले की चीनमधील पॉवर शॉर्टेज आणि उत्पादनातील कपात याचा चांगला परिणाम भारतातील केमिकल उत्पादनावर होत आहे. भारतातील बेसिक केमिकल्सच्या किमती वाढत आहेत.

चीनमधील पॉवर उत्पादन कोळसाबेस्ड असल्यामुळे चीनमध्ये पॉवर शॉर्टेज आहे. त्यामुळे चीन मधून होणारी निर्यात कमी झाली आहे.

इंडियन रेल्वेजनी प्रोटोटाइप कोच ऑटो वाहतुकीसाठी विक्रमी वेळात बनवले.

इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सने त्यांचा ‘ओकनॉर्थ’मधील स्टेक Rs ३०४९ कोटींना विकला.

पिरामल इंटरप्रायझेसने फार्मा बिझिनेसचे डीमर्जर करायला परवानगी दिली. कंपनी दोन विभागात विभागली जाईल पहिली पिरामल फायनान्सियल सर्व्हिसेस आणि दुसरी पिरामल फार्मा

रिअल्टी, ऑटो, मेडिया IT, जेम्स अँड ज्वेलरीज सेक्टरमधील शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९६७७ NSE निर्देशांक निफ्टी १७७९० बँक निफ्टी ३७७५३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.