आजचं मार्केट – ८ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८२.९३ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९४.२० USA बॉण्ड यिल्ड १.५९ नैसर्गिक गॅस US $ ५.७४ /mmbtu, VIX १६च्या आसपास PCR १.५९ होते. रिलायन्सची मार्केट कॅप आज Rs १८ लाख कोटी एवढी झाली.

आज USA मध्ये शॉर्ट टर्म कर्ज वाढवण्यासाठी मंजुरी मिळाली. बेकारी भत्ता घेणाऱ्यांची संख्या कमी झाली. गेल्या चार आठवड्यात प्रथमच ही संख्या कमी झाली. चीनमध्ये सर्व्हिसेस PMI ५३.४ होते. अनुमान ४९.२ चे होते.

या आणि पहिल्या तिमाहीत बहुतेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. सेंटीमेंट्स चांगल्या असल्या तरी त्याला सपोर्ट करणारा डेटा मजबूत नाही. डेटा आणि सेंटीमेंट यांच्यात तफावत आहे. प्रत्येक देश लिक्विडीटी कमी करण्याचे संकेत देत आहे. आता सेंट्रल बँकेकडून अर्थव्यवस्थेत पैसा घातला जाणार नाही उलटपक्षी लिक्विडीटी शोषून घेण्याचे जे मार्ग आहेत ते अवलंबले जातील.

कंपन्यातील ऍट्रिशन वाढत आहे. कंपनीला चांगल्या कुशल कामगारांची उणीव भासत आहे. लॉजिस्टिक, कच्च्या मालाच्या किंमती , पॉवर खर्च यात वाढ होत असल्यामुळं मार्जिनकडे कंपन्यांचे लक्ष असेल. कंपनीने किती आणि कोणती मोठी डील्स केली याकडे लक्ष असते .तसेच कंपनी किती नवीन भरती करत आहे याकडेही लक्ष असावे.

JSW स्टीलने सांगितले की कोळशाच्या किमती वाढत असल्यामुळे स्टीलच्या किमती वाढवाव्या लागतील. कंपनी आता JSW पेंट हा पेन्ट्सचा ब्रँड लाँच करून पेंट उत्पादन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

ओबेराय रिअल्टीजचे दुसऱ्या तिमाहीचे अपडेट्स चांगले आले.

आयर्न ओअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनर्सची टंचाई आहे. बाल्टिक ड्राय निर्देशांक वाढला आहे. याचा फायदा SCI. GE शिपिंग यांना होईल.

X PULSE २०० ही हिरो मोटो आणि JUPITER १२५ TVS मोटर्सने लाँच केली.

टाटा मोटर्सनेफोर्डचे चेन्नई आणि गुजरातमधील प्लांट्स खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच TPG टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेईकल डिव्हिजनमध्ये US $ १०० कोटी गुंतवणार आहे.

आज RBI ने आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. RBI ने CRR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट किंवा इतर रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्ववत होत आहे. RBI लिक्विडीटी समाधानकारक स्तरावर असेल यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजेल. वाढती निर्यात, चांगला सुगीचा हंगाम, वाढती मागणी यामुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे. खाद्य तेले, पॉवर, इंधन, अन्नधान्य, औषधे यांच्या किमती वाढत आहेत. पण तिसऱ्या तिमाहीत शेतीचे चांगले पीक, सरकारने केलेली खाद्य तेलाची आयात, यामुळे ही महागाई कमी होईल. RBI ने सांगितले की बहुतेक देशांतील सेंट्रल बँका लिक्विडीटी व्यवस्थापनासाठी अचूक वेळ आणि लिक्विडिटीचा स्तर साधता येत नसल्याने त पेचात पडल्या आहेत. बहुतेक सेंट्रल बँका महागाई आणि ग्रोथ याचा मेळ घालताना त्रस्त होत आहेत. काही बँकां रेट वाढवण्याचा आणि लिक्विडीटी इंजेक्ट करणे थांबवण्याचा विचार करत आहेत. सुधारणाऱ्या अर्थव्यवस्थांमुळे आता EASY मनी पॉलिसी फार कमी देशात पाळली जात आहे.

RBI ने रिअल GDP ग्रोथ रेटचे FY २१-२२ साठी ९.५% अनुमान केले आहे त्याच प्रमाणे दुसऱ्या तिमाहीत ७.९% तिसऱ्या तिमाहीत ६.८% चौथ्या तिमाहीत ६.१% आणि FY २२-२३ च्या पहिल्या तिमाहीत १७.२% चे अनुमान केले आहे.
RBI ने महागाईचे FY २१-२२ साठी ५.३% अनुमान केले आहे.

FY २१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत ५.१% तिसऱ्या तिमाहीत ४.५% आणि चौथ्या तिमाहीत ५.८% महागाईचे अनुमान केले आहे. FY २२-२३ च्या पहिल्या तिमाहीत ५.२% चे अनुमान केले आहे.

RBI ने सांगितले की आम्ही ओपन मार्केट ऑपरेशन्स, ऑपरेशन ट्विस्ट, आणि इतर उपायांचा अवलंब करून लिक्विडीटी समाधानकारक स्तरावर राहील याची काळजी घेऊ. पण आता त्यासाठी आधी वेळापत्रक जाहीर करण्याची जरुरी नाही. वेळ येईल तसे आम्ही निरनिराळ्या उपायांचा अवलंब करू.

सरकारने सांगितले की आता खतांसाठी दिली जाणारी सबसिडी वाढवली जाणार नाही किंवा खतांची किंमत वाढवायला परवानगी दिली जाणार नाही. कारण सरकारला यात कार्टलायझेशनचा संशय येत आहे. ही बातमी आल्यावर खत उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी आली.

१५ नोव्हेम्बरपासून विदेशी पर्यटकांना टुरिस्ट व्हिसा दिला जाईल. याचा फायदा हॉटेलकंपन्या विमानकंपन्या तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधी कंपन्यांना होईल.

LINCOLN फार्माच्या गुजरात युनिटलाऑस्ट्रेलियन रेग्युलेटर कडून क्रीम, टॅबलेट, कॅप्सूल्स, ऑइन्टमेन्ट यांच्याकरता जून २०२३ पर्यंत GMP ( गुड मॅन्युफॅक्चरिग प्रॅक्टिसेस) ची मान्यता मिळाली.

कॅडीलाच्या EPIBUO FORTE यांच्या जनरिकला USFDA कडून मंजुरी मिळाली.

मदर्सन सुमी बंगलोरच्या CIM Tools PVT. लिमिटेड मध्ये ५५% ते ६० % पर्यंत स्टेक घेणार आहे. एअरोस्पेस सप्लाय चेनला सप्लाय करते. त्यामुळे मदर्सनसुमीचे या क्षेत्रात पदार्पण होईल

सेंट्रम कॅपिटल आणि BHARATPE यांनी स्माल फायनान्स बँकेसाठी अर्ज केला आहे.

४ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आज त्याची अधिकृत चोषणा झाली. ६८ वर्षांनंतर एअर इंडिया टाटांकडे परत आली. सरकारने Rs १.१० लाख कोटींची मदत एअर इंडियाला केली तरीही एअर इंडियालाRs ६१५६२ कोटी एवढे कर्ज झाले. त्यापैकी Rs १५३०० कोटी कर्ज टाटा टेकओव्हर करणार आहेत. आणि Rs ४६२६२ कोटी कर्ज एअर इंडिया ऍसेट होल्डिंग लिमिटेड या SPV ला ट्रान्स्फर केले जाईल. जिच्याकडे नॉनकोअर ऍसेट्स आणि जमीन ट्रान्स्फर केलेली आहे. Rs १२९०६ कोटी ही रिजर्व प्राईस होती. टाटांनी Rs १८००० कोटींना एअर इंडिया घेतली. यापैकी Rs २७०० कोटी कॅशमध्ये द्यायचे आहेत. एक वर्षापर्यंत स्टाफला काढले जाणार नाही. एक वर्षांनंतर VRS ची ऑफर दिली जाईल.PF ग्रॅच्युइटी दिली जाईल. आणि ब्रँड आणि लोगो ५ वर्षापर्यंत बदलता येणार नाही.

TCS या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट १४.१%(QOQ) आणि (YOY २९%) ने वाढून Rs ९६२४ कोटी झाले. रेव्हेन्यू Rs ४६८६७ कोटी झाला. EBIT मार्जिन २५.६०% होते. कंपनीने Rs ७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीने ५ US $ १०० मिलियन+ नवीन क्लायंट्स मिळवले ,US $ ५० मिलियन+ १७ नवीन क्लायंट्स मिळवले. ऍट्रिशन रेट ११.९% होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६००५९ NSE निर्देशांक निफ्टी १७८९५ बँक निफ्टी ३७७७५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.