आजचं मार्केट – ११ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ११ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US$83.०० च्या आसपास तर रुपया US$१=Rs75.25च्या आसपास होते. US$ निर्देशांक 94..08 VIX16.19 होते. दक्षिण कोरियाचे cospi मार्केट आज बंद होते. USA मधील मार्केटही आज थोडी मंदीत होती. SGX निफ्टीही थोडी मंदी दाखवत होते.पण भारतीय मार्केटने मुसंडी मारली आणि18041.95 हा निफ्टीचा इंट्राडे हाय तर सेन्सेक्सने 60476 हा इंट्राडे high गाठला

रिलायन्स न्यू एनर्जी REC सोलर होल्डिंगमध्ये US$७७.१ कोटी ( Rs 5792 कोटी) खर्च करून ह्या कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक चायना नॅशनल ब्ल्यू स्टार या कंपनीकडून खरेदी करणार आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलार ltd. Rs 375 प्रती शेअर या भावाने प्रेफरन new Energy Limited शीयल रुटने स्टर्लिंग आणि विल्सन मधील 15.46% स्टेक घेणार. तसेच प्रमोटरकडून 9.7% स्टेक Rs 375 प्रती शेअर या भावाने घेणार. या मुळे रिलायन्स न्यू एनर्जी ltd ला ओपन ऑफर आणावी लागेल.कंपनी पब्लिक कडून 25.9% स्टेक ओपन ऑफरमध्ये खरेदी करेल . जर ओपन
ऑफरमध्ये पब्लिक शेअर होल्डर्सनी शेअर्स ऑफर केले नाहीत आणि 40% शेअर्स खरेदी झाले नाही तर प्रमोटर्स हा फरक भरून काढतील. आता प्रमोटर्सकडे 69.36% स्टेक आहे . आता स्टर्लिंग अँड विल्सन सोलारच्या शेअर्सचा भाव Rs434.80 आहे.

कोळशाची टंचाई असल्यामुळे कोल इंडियाकडून सोलार इंडस्ट्रीजला Rs 1471 कोटी आणि GOCL ला Rs 592 कोटींची दोन वर्षात बल्क एक्सप्लोजीव सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे आज GOCL अपर सर्किटला होता.
अल्ट्राटेक सिमेंटला मध्य प्रदेशातील Ramsthan G hunchihai लाईम स्टोन माईनसाठी प्रेफर्ड बिडर म्हणून घोषित केले आहे.

ब्रिगेड एनटरप्रायझेसला SG कंप्लायन्स अवॉर्ड मिळाले. म्युच्युअल फंड्स आतां हे अवॉर्ड मिळालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतील. त्यामुळे हे अवॉर्ड मिळालेल्या कंपन्यांकडे लक्ष ठेवावे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे डिपॉझिट 40%ने वाढले आणि CASA रेशीयोमध्ये लक्षणीय वाढ झाली.

बंधन बँकेच्या डिपॉझिट 24% ने वाढले. क्रेडिट ग्रोथ मात्र माफक होती. धनूका ऍग्रीटेक ड्रोन सेक्टर आणि त्याच्या शेतीला उपयोगी असणाऱ्या अप्लिकेशनमध्ये पदार्पण करणार आहे.

आता टेलिकॉम कंपन्यांकडे केलेले अर्ज सांभाळून ठेवण्याची गरज नाही. त्यांची स्कॅन कॉपी ठेवली तरी चालेल. हे ‘इज ऑफ डूइंग बिझिनेस’ वाढवण्यासाठी केलेली तरतूद आहे.

GMR इन्फ्रा वर्ष 2024 पर्यंत Rs 6300 कोटींची गुंतवणूक राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळात करणार आहे. त्यामुळे ऐरोड्रोम क्षमता 34 million प्रवासी एवढी वाढेल. म्हणून GMR चा शेअर तेजीत होता.

TCS या कंपनीने आपले दुसऱ्या तिमाहिचे निकाल जाहीर केले. पण ते मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी होता. त्यामुळे TCS चा शेअर पडला आणि त्याबरोबरच IT क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअर्समधेही प्रॉफिट बुकिंग झाले.

आदित्य बिर्ला सन लाईफ AMC या कंपनीचे Rs715 वर NSE वर तर BSEवर Rs 712 वर 8लिस्टिंग झाले. हा शेअर Rs 695 ते Rs 722 या रेंजमध्ये ट्रेड होऊन Rs 699/-वर बंद झाला.

तीळ आणि इतर खाद्यतेलावर सरकारने स्टॉक लिमिट लावले.

भारतात साखरेचे उत्पादन कमी झाले. या वर्षी 70 लाख टन साखरेची निर्यात झाली.

अर्थमंत्र्यानी आपल्या आर्थीक रिव्ह्यूमध्ये सांगितले की सप्टेंबर 2021 महिन्यामध्ये आर्थिक विकासाची गती वाढली. अर्थव्यवस्था पूर्व कोविड लेव्हलच्या 90%.स्तरावर आली. FPI गुंतवणूक वाढून US$ 300 कोटी झाली. या वित्तीय वर्षांत FPI गुंतवणूक US$ 720.कोटी एवढी झाली. नवीन Demat।अकौंटस रेकॉर्ड स्तरावर ओपन झालें. विकसनशील देशात भारतात सर्वात जास्त गुंतवणूक आली.

पॉवर ग्रीडने Rs 1033 कोटी तर NTPC ने Rs1560 कोटी लाभांश सरकारला दिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स 60135 NSE निर्देशांक निफ्टी 17945 बँक निफ्टी 38293 वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.