आजचं मार्केट – १२ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १२ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ 1= Rs 75.50 च्या आसपास होते. US$ निर्देशांक 94.31 10वर्षे USA बॉण्ड यील्ड 1.60 VIX 19.56 PCR 1.57 होते

सरकार जानेवारी 2022 मध्ये LIC च्या IPO साठी अर्ज करण्याची शक्यता आहे. मार्च 2022 पर्यंत लिस्टिंग करण्याची योजना आहे. या IPO मधून Rs 60000 कोटी ते Rs 75000 कोटी उभारले जातील.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची लोन ग्रोथ YOY19.6% तर QOQ 11.7% झाली. डिपॉझिट मात्र 5.7%.ने कमी झाले. एकूण डिसबर्समेंट Rs1061 कोटी झाली.

टाटा मोटर्सची ग्लोबल विक्री 24% वाढली.

GM ब्रूअरिजचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले।आले. टाटा मेटालिक्स, कृष्णा डायगणोस्टिक्स,डेल्टा कॉर्पचे दुसऱ्या तिमाहिचे निकाल कमजोर होते.

M & M ने सांगितले की त्यांच्या XUV700 ला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. 3 तासात 50000 पेक्षा गाड्यांचे बुकिंग झाले.

18 ऑक्टोबर 2021पासून प्रवासी विमान कंपन्या 100% क्षमतेवर काम करू शकतील.

TPG Rise क्लायमेट ग्रूप टाटा मोटर्सच्या EV सबसिडीअरीमध्ये US$910 कोटी (Rs 7500 कोटी )ची 11%-13% स्टेक साठी गुंतवणूक करेल.

पॉवर ग्रीड च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने नव्या मुंबईतील EV चार्जिंग स्टेशनसाठी Rs 14.2 कोटी मंजूर केले.

कोळसा मंत्रालय 40 कोळसा खाणींचा तिसऱ्या टप्प्यात लिलाव करेल. आयात कोळशाचे भाव 4 पट वाढले आहेत.

Radiko khaitan 2 नवीन मद्याचे प्रॉडक्ट लाँच करणार आहे.

सरकार US$ 300 कोटींची अतिरिक्त खतांसाठी सबसिडी देण्यावर विचार करत आहे.

युरोप, चीन,USA मध्ये कोळसा,नैसर्गिक गॅस, इलेक्ट्रिसिटी यांची टंचाई आहे. अल्युमिनियमला पॉवर इंटेनसिव कमोडिटी समजले जाते.
क्रूडच्या किमती खूपच वाढायला लागल्या तर USA ओपेक+ देशांबरोबर बोलणी करेल.

पेनलटीच्या बाबतीत TDSAT ने POI(पॉईंट ऑफ इंटरसेक्शन) च्या संबंधात स्टे दिला नाही.VI ला Rs2000 कोटी आणि भारती एअरटेलला Rs1050 कोटींचे पेमेंट 21 ऑक्टोबर 2021 पूर्वी करायचे आहे. याची पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर 2021 रोजी होईल.26 ऑक्टोबर 2021 पर्यंत या कंपन्यांनी दिलेल्या बँक गॅरंटी जप्त होणार नाहीत.

भारत डायनॅमिक्समधील 2.5% स्टेक LIC ने कमी केला.

आज सप्टेंबर 2021 साठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ४.३५%(ऑगस्ट 2021 मध्ये 5.30%) होते. तर ऑगस्ट2021 महिन्यासाठी IIP 11.9%(जुलै 2021 मध्ये 11.5%) होते. याचा अर्थ असा होतो की औद्योगिक उत्पादन वाढत आहे आणि महागाई माफक प्रमाणात कमी होत आहे.

NCL या कंपनीने 1:1 बोनस जाहीर केला. तुमच्या जवळील 1 शेअर मागे तुम्हाला 1 बोनस शेअर मिळेल.

हिरो मोटोने E Pleasure+XTEC ही स्कुटर लाँच केली.

IHFRMS पोर्टल IOB ने लाँच केले.

SCHAEFFLER चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स 28 ऑक्टोबर 2021 रोजी शेअर स्प्लिट वर विचार करेल.
अल्युमिनियम ची किंमत 2008 च्या किमतीवर 2.5% वाढून US$244 प्रती टन एवढी झाली.

आज FMCG, ऑटोमोबाईल, फायनांशीयल, मेटल सेक्टरमध्ये तेजी होती तर IT सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकींग झाले.

IOB ने IFHRMS पोर्टल तामिळनाडू राज्य सरकारसाठी लाँच केले.

जयकुमार यांनी टुरिझम फायनान्स मध्ये स्टेक घेतला.’

राणे मद्रासने स्टीअरींग काम्पोनंट्सचा बिझिनेस विकत घेतला

BSE निर्देशांक सेन्सेक्स 60284 NSE निर्देशांक निफ्टी 17991 बँक निफ्टी 38521 वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.