आजचं मार्केट – १३ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १३ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८३.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.२५ च्या आसपास US $ निर्देशांक ९४.४४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५७ VIX १७.६१ PCR १.२८ होते. IMF ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) ने भारताच्या ग्रोथचे FY २२ साठी अनुमान ९.५% केले.

चीप शॉर्टेजमुळे ‘I’ फोनचे उत्पादन कमी होईल.३१ कंपन्यांकडून ४ वर्षात Rs ३३०० कोटी गुंतवणूक PLI अंतर्गत होईल. तसेच ४०,००० लोकांना रोजगार मिळेल. यामध्ये १६ मायक्रो, स्माल आणि मेडीयम इंटरप्रायझेस, ७ बहुदेशीय, ८ डोमेस्टिक कंपन्या आहेत. नोकिया, फॉक्सकॉन, फ्लेक्सट्रॉनिक, COMMSCOPE, जबीलसर्किट, HFCL, तेजस, डिक्सन, ITI, VVDN टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

रिलायन्स ग्रुपच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलार लिमिटेडने जर्मनीच्या Nexwafe Gmbh या कंपनीत युरो २५ मिलियनची गुंतवणूक केली. ही कंपनी ‘हाय एफिशियंसी मोनोक्रिस्टल सिलिकॉन वेफर्स’ बनवते.सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेससाठी सेमी कंडक्टर चिप लागतात. या चिप बनवण्यासाठी सिलिकॉन वेफर हे मटेरियल वापरले जाते. ८६८८७ सिरीज ‘C’ प्रिफर्ड शेअर्स युरो २८७.७३ प्रती शेअर या भावाने घेणार आहे. आणि ३६२०१ वॉरंट इशू करणार आहे याची किंमत प्रती वॉरंट १ युरो आहे. हा सर्व व्यवहार ऑक्टोबर महिन्याअखेरीला पूर्ण होईल.

RNECL (रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड) या कंपनीने STIESDAL A /S या ‘कलायमेट चेंज मिटिगेशन’ यासाठी लागणारे तंत्रज्ञान तयार करून ते प्रगत करण्याच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॅनिश कंपनीबरोबर हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर मॅन्युफॅक्चरिंग आणि डेव्हलपमेंट साठी करार केला. RNECL ला याचे लायसेन्स दिले आहे. या करारामुळे २०३० पर्यंत १०० GW रिन्यूएबल एनर्जी तयार करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत होईल.

PFC या भारत सरकारच्या PSU ला ‘महारत्न’ चा दर्जा मिळाला. यामुळे व्यवस्थापनाला बरेच अधिकार  ळतात.सरकारच्या परवानगीशिवाय काही प्रमाणात खर्च करता येतो.

आज इन्फोसिसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. उत्पन्न Rs २९६०२.०० कोटी , प्रॉफिट Rs ५४२१ कोटी US $ रेव्हेन्यू US $ ३९९.८ कोटी EBIT Rs ६९७२ कोटी EBIT मार्जिन २३.६% कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ६.३% होती. कंपनीने ग्रोथसाठी FY २२ साठी १६.५% -१७.५% गायडन्स दिला तर आम्ही FY २२ मध्ये ४५००० लोकांना नोकऱ्या देऊ असे सांगितले. कंपनीने Rs १५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

आज विप्रो या कंपनीने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला IT सर्व्हिसेसकडून Rs १९७६० कोटी उत्पन्न झाले.आणि प्रॉफिट Rs २९३०.७ कोटी झाले. EBIT Rs ३४९२ कोटी झाले. EBIT मार्जिन १७,७% होते. US $ रेव्हेन्यू US $ २५८ कोटी झाला. US $ रेव्हेन्यू ग्रोथ ६.९% तर कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ८.१% होती. कंपनीने US $ १०० मिलियन +चे २ US $ ५० मिलियन+चे २ क्लायंट मिळाले.

आज माईंड ट्री या IT क्षेत्रातील तिसऱ्या कंपनीने त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला एकूण उत्पन्न Rs २५८६.२० कोटी तर प्रॉफिट Rs ३९९ कोटी झाले. US $ रेव्हेन्यू US $ ३५ कोटी झाला. EBIT Rs ४९६.७० कोटी झाले तर EBIT मार्जिन १८.१% राहिले.

आज टाटा ग्रुपचे शेअर तेजीत होते.त्याचबरोबर ऑटो आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. D-मार्ट आणि इंडिया मार्ट या कंपन्यात लक्षणीय तेजी होती. इलेक्ट्रिक व्हेइकल्सशी संबंधीत ऑटो अँसिलिअरी कंपन्यांमध्ये तेजी होती. सेंट्रम कॅपिटल आणि भारतपे यांना स्मॉल फायनान्स बँकेसाठी लायसन्स मिळाल्यामुळे सेंट्रम कॅपिटलचा शेअर तेजीत होता. मंगळवारी ‘इन्फिबीम’ हा शेअर १०% वाढला. कारण रिलायन्स जिओ आणि इन्फिबीम यांच्यात स्टेक सेलसाठी चर्चा चालू आहे.

अशोक लेलँडने तारण म्हणून ठेवलेले १.५५ कोटी शेअर्स सोडवले.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गती शक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत १६ मंत्रालयांमध्ये एकवाक्यता, सामंजस्य, सहकार्य असेल त्यामुळे दळणवळण खर्च, कार्गो हँडलिंग क्षमता वाढेल..आणि वेळेची बचत होईल. हा मल्टिमोडल मास्टर प्लान आहे. US $ ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल आहे.त्यामुळे परदेशी गुंतवणुकदारांसाठी भारत एक आकर्षक देश बनेल.यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित सर्व शेअर्समध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०७३७ NSE निर्देशांक निफ्टी १८१६१ बँक निफ्टी ३८६३५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.