आजचं मार्केट – १८ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८५.५७ प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५.२६च्या आसपास डॉलर निर्देशांक ९३.९५ .१८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५७ VIX १७.१८ PCR १.७३ होते.

अर्थमंत्र्यांनी USA मध्ये मुलाखतीमध्ये असे सांगितले की आम्हाला स्टिम्युलस अन्वाइन्ड करण्याची घाई नाही. पण क्रूडचे वाढणारे भाव हा काळजीचा विषय आहे.

आज ग्लोबल मार्केट्सचे संकेत चांगले होते. USA मधील मार्केट्स तेजीत होती. कारण IBM, नेटफ्लिक्स, P & G, गोल्डमन सॅक, मॉर्गन स्टॅन्ले, बँक ऑफ अमेरिका आणि सिटी ग्रूप यांचे निकाल सुंदर आले. यामुळे जवळ जवळ ९१५ पाईंट्सची तेजी झाली. त्याविरुद्ध चीनचे GDP ४.९% YOY तर औद्योगिक उत्पादन ३.१% होते.चीनची ग्रोथ कमी झाली.

D – मार्ट, HDFC बँक, अल्ट्राटेक सिमेंट, संगम यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. INEOS STYROLUTION या कंपनीने Rs १९२ प्रती शेअर स्पेशल लाभांश दिला. कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

इंडिया बुल्स रिअल इस्टेट तोट्यातून फायद्यात आली. Rs ७६ कोटी तोटयाऐवजी Rs ५.५ कोटी फायदा झाला.

ACETYL आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हवर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी बसवली. याचा फायदा ज्युबिलण्ट इंग्रेव्हिया, दीपक नायट्रेट, IOL केमिकल्स, लक्ष्मी ऑर्गनिक्स या कंपन्यांना होईल.

मास्क बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेल्ट ब्लोन फॅब्रिक्सच्या निर्यातीवरील नियंत्रणे उठवली.

बायोकॉनला आता स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कारण बायोसिमिलर्ससाठी इतर कंपन्यांनाही मंजुरी मिळू लागली आहे.
मदर ऑफ ऑल कमोडिटीज म्हणजेच कॉपरमध्ये आज खूप तेजी होती खाण मंत्रालयाने हिंदुस्थान कॉपरमध्ये डायव्हेस्टमेन्ट करावी असे सुचवले आहे. मेजॉरिटी स्टेकसकट व्यवस्थापन खरेदीदारावर सोपवले जाईल. सध्या या कंपनीत सरकारचा ६०.४% स्टेक आहे. हिंदुस्थान कॉपरची डायव्हेस्टमेन्ट करणार अशी एक अटकळ मार्केटने बांधली. अल्कोवाचे निकाल चांगले आल्यामुळे झिंक, स्टील, कॉपर,अल्युमिनियम असे सर्व धातू तेजीत होते. हिंदुस्थान झिंक, नाल्को, हिंदाल्को, वेदांता इत्यादी धातूशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

सरकार आता पेट्रोप्रॉडक्ट्सवर सबसिडी देऊ शकणार नाही असे सरकारने सांगितले. सरकारने ऑईलचा ९० दिवसांचा रिझर्व्ह स्टॉक बनवला आहे.

शिल्पा मेडिकेअर ही Rs २९७ कोटींचा प्रेफरंशियल इशू करणार आहे. पण हा ईशु ११% डिस्काऊंटवर म्हणजे Rs ४६४ प्रती शेअर या भावाने होणार आहे.

T-२० वर्ल्ड कप लाईव्ह स्क्रीन साठी PVR ला एक्स्ल्युझिव्ह राईट्स मिळाले. त्यामुळे PVR च्या शेअरमध्ये तेजी होती.
C G पॉवर त्यांची कांजूरमार्ग प्रॉपर्टि Rs ३८० कोटींना विकणार आहे.

Rs ३९० प्रति शेअर या भावाने Rs ४००० कोटींचा प्रेफरंशियल इशू PNB हौसिंग फायनान्स करणार होती तो रद्द झाला.हा इशू कार्लाइल ग्रुप, जनरल अटलांटिक, SSG गुप् अशा गुंतवणूकदारांना करणार होती. त्यामुळे PNB हौसिंगचा शेअर पडला.

डिक्सन टेक्नॉलॉजीनी 5G मिलीमीटर वेव्ज स्मार्ट फोनचे उत्पादन सुरु केले आहे. आणि या स्मार्ट फोनची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी युनिटचा IPO आणणार अशी मार्केटमध्ये खबर आहे. म्हणून टाटा पॉवरचा शेअर तेजीत होता.
मेट्रोपोलीस हेल्थकेअरने HITECH डायग्नॉस्टिक सेंटर आणि तिची सबसिडीअरीच्या अक्विझिशनला मंजुरी दिली.

DGCAने धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीमुळे स्पाईस जेटचे लायसेन्स तात्पुरते रद्द केले. त्यामुळे शेअर मंदीत होता.

MM फोर्जिंगने ‘CAFOMA ऑटो पार्ट्स ही ऑटो कॅम्पोनंट्स बनवणारी कंपनी Rs ३३ कोटींना खरेदी केली.

अल्ट्राटेक सिमेंटचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs १३१३ कोटी तर उत्पन्न Rs १२०१७ कोटी झाले. कंपनीचे व्हॉल्युम्स ८% ने वाढले. अल्ट्राटेक सिमेंटच्या चांगल्या निकालानंतर सिमेंट सेक्टरमध्ये तेजी आली.

इन्फोसिसच्या लाभांशातून टीडीएस कापला जाऊ नये म्हणून फॉर्म नंबर १५G किंवा १५ H फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२१ ही ठरवली आहे.

पारस डिफेन्स हा शेअर टी टू टी मधून बाहेर पडला. त्याचे सर्किट फिल्टर ५% वरून २०% केले.

भगीरथ केमिकल & इंडस्ट्रीजचे NSE वर लिस्टिंग झाले Rs ८४९.९५ ला शेअर लिस्ट झाला याचा लो Rs ७६१.३० होती तर Rs ९४३ ही हाय प्राईस होती.

टाटा मोटर्सने नवीन सबकॉम्पॅक्ट SUV मॉडेल ‘PUNCH’ Rs ५.४९ लाख किमतीला लाँच केले.

उद्या नेस्ले आणि HUL तसेच नवीन फ्ल्युओरीन आणि L & T टेक्नॉलॉजी या कंपन्या त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१७६५ NSE निर्देशांक निफ्टी १८४७७ बँक निफ्टी ३९६८४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.