आजचं मार्केट – १९ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १९ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८४.०० प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७५.२५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.८६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.५७ VIX १७.५१ PCR १.६७ होते.

आज USA ची मार्केट्स NASHDAQ आणि S & P तसेच एशियन मार्केट्स तेजीत तर डाऊ जोन्स किंचित मंदीत होते. USA मधील औद्योगिक उत्पादन १.३% ने कमी झाले. आज करन्सी मार्केट बंद होते.

सप्टेंबर महिन्यात हवाई प्रवाशांच्या संख्येत ५.४% वाढ झाली.

३० ऑक्टोबर २०२१ रोजी IEX या कंपनीची बोनस इशूवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

TTK प्रेस्टिज या कंपनीची २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शेअर स्प्लिटवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

DR रेड्डीज ला REVLIMID च्या जनरिक साठी FDA ची मंजुरी मिळाली आणि १८० दिवसांचे एक्स्ल्युझीव्हिटी राईट्स मिळाले.

रिलायन्स रिटेल व्हेंचरला NCLT ने फ्युचर ग्रुप बरोबरच्या डील मधील प्रक्रियेसाठी परवानगी दिली. अमेझॉनने घेतलेल्या हरकती प्रीमॅच्युअर आहेत असे सांगून त्या बाजूला ठेवल्या.

टाटा कॉफी, हडसन ऍग्रो, रूट मोबाईल, हिंदुस्थान युनिलिव्हर, TV १८ ब्रॉडकास्टिंग, शक्ती पंप्स, नेटवर्क १८, DCM श्रीराम, L & T इन्फोटेक, SVP ग्लोबल व्हेंचर, लग्नम स्पिनटेक्स, या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
HUL च्या डोमेस्टिक व्हॅल्यूममध्ये ११% वाढ झाली. कंपनीला Rs २१८७ कोटी प्रॉफिट झाले. उत्पन्न Rs १२७२४ कोटी झाले. ऑपरेटिंग मार्जिन २४.६% राहिले.कंपनीने Rs १५ प्रती शेअर लाभांश दिला. तसेच L & T इन्फोटेकने Rs १५ प्रती शेअर तर DCM श्रीराम ने Rs ४.८० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

हैडलबर्ग सिमेंट आणि रॅलीज इंडियाचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल साधारण आले. ज्युबिलण्ट इंग्रेव्हियाचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

भारती एअरटेल व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी एन्ड टू एन्ड प्लॅटफॉर्म लाँच करण्यासाठी बांगलादेश श्री लंका, मिडलईस्ट या देशात करार करण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी करत आहे. या बिझिनेसमधून कंपनीला US $ १०० मिलियन उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे आज शेअर तेजीत होता.

सरकारने VI आणि भारती एअरटेल यांना ४ वर्षाच्या मोरॅटोरियम संबंधात निर्णय घेण्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला.
PNB हौसिंग फायनान्स Rs १५०० ते Rs २००० कोटींपर्यंत राईट्स इशू आणण्याची शक्यता आहे.

मार्केट आज सकाळी जागतिक संकेत सकारात्मक असल्यामुळे गॅप अप उघडले. आज IT क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. पण मार्केट गेले ७ दिवस तेजीत असल्यामुळे ओव्हरबॉट झोन मध्ये गेले होते. ट्रेडर्स निफ्टीने १८५०० ओलांडल्यानंतर निर्णायक ट्रेड घेण्याच्या अवस्थेत नव्हते. आज FMCG सेक्टरमधील डाबर, कोलगेट, ब्रिटानिया, मेरिको, एशियन पेंट्स,HUL या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१७१६ NSE निर्देशांक निफ्टी १८४१८ बँक निफ्टी ३९५४० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.