आजचं मार्केट – २० ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २० ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७५.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.७८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६६ VIX १८.३६ PCR १.२३ होते.

आज USA मधील तिन्ही निर्देशांक तेजीत होते ( डाऊ जोन्स, NASHDAQ, S & P ) तसेच एशियन मार्केट्सही तेजीत होती. सोने आणि चांदी माफक तेजीत होती. मजबूत रिटेल विक्रीचे आकडे आले.जॉन्सन & जॉन्सन, नेटफ्लिक्स यांचे निकाल चांगले आले.

कोविड संकट निवारण्यासाठी जगातील सगळ्या सेंट्रल बँकांनी मुबलक लिक्विडिटीचा पुरवठा केला. या पैशाचा स्टेरॉइड्स सारखा उपयोग झाला. इंडस्ट्रीला मार्केटमधून पैसा काढता आला. भांडवली गुंतवणूक करता आली. उत्पादन क्षमता वाढवता आली.

थंडीचे दिवस जवळ येत आहेत तसेच जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्था ओपन होत आहेत, प्री कोविड लेव्हलवर येत आहेत त्यामुळे क्रूडसाठी मागणी वाढत आहे. ओपेक+ क्रूडचे उत्पादन/ पुरवठा वाढवावयास तयार नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मिसमॅच असल्यामुळे क्रूडचे भाव वाढत आहेत.

कोळशाच्या मार्केटमध्ये चीनने लक्ष घातले आहे. त्यामुळे एक दिवसात कोळश्याच्या किमती ८% ने कमी झाल्या आहेत.
चांदीच्या किमती वाढत आहेत याचा फायदा हिंदुस्थान झिंकला होण्याची शक्यता आहे.

L & T टेक चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. PMI (प्रॉफिट मार्जिन इन्कम) वाढले US $ रेव्हेन्यू वाढले. ICICI प्रु चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.ताज जी व्ही के ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले PMI वाढले.सेम स्टोअर सेल्स ग्रोथ २६.३% चांगली झाली. स्नोमॅन लॉजिस्टिक या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले कंपनी तोट्यातून फायद्यात आली. टाटा स्टील BSL या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

मूडीजने भारतीय बँकिंग सिस्टीमचा आऊटलूक निगेटिव्हवरून स्टेबल केला. ऍसेट गुणवत्तेत सुधारणा होईल अशी शक्यता व्यक्त केली.

रिलायन्स रिटेल या कंपनीने RITIKA PVT LTD या कंपनीत ५२% स्टेक खरेदी केला.

ASTRAL पॉली ही कंपनी FAUCETS आणि सॅनिटरीवेअर च्या क्षेत्रात उतरणार आहे.

कॅम्स ही कंपनी कॅम्स फिनसर्व या नावाने NBFC क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

RITES या कंपनीने रेल्वेसाठी किमती आणि इतर गोष्टींसाठी स्टॅंडर्ड तयार करण्यासाठी एक रेग्युलेटरी ऑथारिटी तयार करण्यासाठी सरकारला रोडमॅप सादर केला.

DR रेड्डीज च्या FT १०७ आणि FT १०९ या विशाखापट्टणम मधील दुवाडा प्लांटमध्ये USFDA ने १८ ऑक्टोबर २०२१ पासून इन्स्पेक्शन सुरु केले.

भारती एअरटेलने १.३८ लाख तर रिलायन्स जिओने ६.४९ लाख नवीन ग्राहक जोडले. VI ने ८.३३ लाख ग्राहक गमावले.
टाटा पॉवरमध्ये LIC ने ०.७४% स्टेक वाढवला तर गोदरेज इंडस्ट्रीजमधील स्टेक १.७४% पर्यंत कमी केला.

उत्तराखंड राज्यात आलेल्या पुरामुळे टाटा मोटर्स, अशोक लेलँड, बजाज ऑटो या कंपन्यांनी तेथील प्लांट्स बंद केले. हिरो मोटो चा हरिद्वारमधील प्लांट मात्र चालू आहे.

VI ने ४ वर्षे मोरॅटोरियमचा पर्याय निवडल्याचे सरकारला कळवले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१२५९ NSE निर्देशांक निफ्टी १८२६६ बँक निफ्टी ३९५१८ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.