आजचं मार्केट – २१ ऑक्टोबर २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ ऑक्टोबर २०२१

आज क्रूड US $ ८५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७५ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९३.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६७ VIX १८ च्या आसपास PCR ०.७७ होते.

आज RBI ने सांगितले की ते ‘OMO ( ओपन मार्केट ऑपरेशन)’, आणि ‘ऑपरेशन ट्विस्ट’करण्याचा विचार करत आहे.
सरकारने फिनाईलवरील अँटी डम्पिंग ड्युटी रद्द केली. याचा प्रतिकूल परिणाम दीपक नायट्रेट वर होईल.

UPL इंडोनेशियन कम्पनी ‘PT EXCEL’ या US $ २.५ कोटींचे व्हॅल्युएशन असलेल्या कंपनीमध्ये ८०% स्टेक खरेदी करणार आहे, २०२३ पर्यंत उर्वरित २०% स्टेक खरेदी करण्याचा हक्क खरेदी केला.

आज कोर्टाने झी इंटरप्रायझेस आणि इंव्हेस्को संबंधित केसमध्ये सांगितले की शेअरहोल्डर्सचा EGM बोलावण्याचा डेमोक्रॅटिक हक्क कसा हिरावता येईल पण CEO बदलण्याविषयी EGM काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही.

आज बँक ऑफ महाराष्ट्र आणि IDBI बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. IIFL सिक्युरिटीज, बोरोसिल रिन्यूएबल्स, JSW स्टील, हेरिटेज फूड्स, CG पॉवर, TVS मोटर्स यांचे निकाल चांगले आले. स्टरलाईट टेक्नॉलॉजीचे उत्पन्न वाढले,पण प्रॉफिट कमी झाले.

एशियन पेंट्सचे निकाल चांगले आले डोमेस्टिक डेकोरेटिव्ह पेन्ट्सच्या विक्रीत ३४% वाढ झाली.उत्पन्न Rs ७०९६ कोटी झाले पण क्रूडच्या आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने मार्जिनवर दबाव येऊन १२.७५% राहिले त्यामुळे प्रॉफिट Rs ६०५ कोटी झाले. मार्केटला हे निकाल पसंत न पडल्यामुळे शेअर पडला.कंपनीने Rs ३.६५ प्रती शेअर लाभांशजाहीर केला

सरकार वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत अंदाजपत्रकातील तरतुदींप्रमाणे राष्ट्रीयीकृत सरकारी बँकांमध्ये प्रत्येक बँकेच्या गरजेप्रमाणे एकूण Rs २०००० कोटींपर्यंत रिकॅपिटलायझेशन करेल या अपेक्षेने आणि चांगल्या निकालांमुळे बँक निफ्टी तेजीत होती.

KPIT ने ZF ग्रुपबरोबर middleware सोल्युशनसाठी करार केला.

आज मार्केटमध्ये विकली एक्स्पायरीमुळे वोलतालीटी होती. मार्केट पडायला सुरुवात झाली आणि ते थोडे वाढून पुन्हा पडते या लयीत पडतच गेले. बँक निफ्टीने ४००००चा टप्पा ओलांडून रेकॉर्ड प्रस्थापित केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०९२३ NSE निर्देशांक निफ्टी १८१७८ तर बँक निफ्टी ४००३० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २१ ऑक्टोबर २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.